मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग… भारतच नव्हे तर जगभरात भडकतोय महागाईचा आगडोंब; कारण काय?

भारतात मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग झालं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पण महागाईचा हा आगडोंब केवळ भारतातच उसळलेला नाही तर संपूर्ण जगात उसळला आहे.

मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग... भारतच नव्हे तर जगभरात भडकतोय महागाईचा आगडोंब; कारण काय?
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 7:09 PM

नवी दिल्ली: भारतात मिठापासून पिठापर्यंत सर्वच महाग झालं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पण महागाईचा हा आगडोंब केवळ भारतातच उसळलेला नाही तर संपूर्ण जगात उसळला आहे. जगभरातील लोकांना महागाईचे चटके बसत आहेत. अमेरिकेत मुद्रा स्फीतीचा दर गेल्या 30 वर्षात सर्वात अधिक झाला आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक महागाई वाढली आहे. इतर देशांचीही हीच परिस्थिती आहे. भारतातील महागाईबाबत तुम्ही वाचलं असेल. करप्रणालीच्या हिशोबानेही तुम्ही महागाई वाढण्याचं कारण समजून घेतलं असेल. भारतातच नव्हे तर वैश्विक स्तरावरही महागाई का वाढत आहे? याचाच घेतलेला हा मागोवा.

महागाई किती वाढलीय?

अमेरिकेत महागाईचा दर 6.2 टक्के झाला आहे. 1990नंतरचा हा सर्वात मोठा दर आहे. गेल्या तीस वर्षात वाढली नव्हती एवढी महागाई अमेरिकेत वाढली आहे. कोर इन्फ्लेशन सुद्धा 4.6 टक्क्यावर आहे. सप्टेंबरमध्ये हा महागाई दर 5.4 टक्के होता. जगातील वाढत्या महागाईचा परिणाम आता शेअर बाजारावरही जाणवू लागला आहे.

महागाई का वाढतेय?

वाढत्या महागाईची अनेक कारणं आहेत. महागाई वाढण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. पुरवठा व्यवस्थित न झाल्याने सप्लाय चेनमध्ये गडबड होणं हे सुद्धा वाढत्या महागाईचं एक कारण आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मागणी बंद झाली. पुरवठाही ठप्प झाला. त्यानंतर लाखो ऑर्डर रद्द करण्यात आल्या. उत्पादनही कमी करण्यात आलं. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर वेगाने मागणी वाढली. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने महागाई वाढली आहे. जस जसं उत्पादन वाढेल. पुरवठा आणि मागणीतील समतोल साधला जाईल, तसतशी महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार जागतिक पातळीवर पुरवठ्याची साखळी तुटल्याने उत्पादनावर खूप परिणाम झाला आहे. हवाई वाहतूक, रेल्वे सेवा बंद झाल्यानेही पुरवठ्यात परिणाम झाला होता. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर अधिक झाला आहे. एकीकडे पुरवठा कमी होत आहे. दुसरीकडे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाची मागणीही वाढत आहे. ही कारणेही वाढत्या महागाईला कारणीभूत आहेत.

>> कोरोनाच्या काळात रेशनच्या दुकानात काही वस्तुंची कमतरता होती. दुकानदार मर्यादित प्रमाणात समान खरेदी करत होते. आता उत्पादनापासून ते पुरवठ्यापर्यंत आणि वाहतुकीपासून दुकानापर्यंत… प्रत्येक विभागात कामगारांची कमी आहे.

>> महामारी शिवाय जलवायूतील बदलांमुळेही बाजारावर परिणाम दिसत आहे. त्यामुळे जगातील अनेक भागातील पिकं नष्ट झाली आहेत. त्यामुळेही महागाई वाढली आहेत.

>> आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दोन वर्षाची मागणी तीन महिन्यात वाढली आहे. त्यामुळे बाजार आणि अर्थव्यवस्थेचं सर्वच गणित कोलमडलं आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते.

संबंधित बातम्या:

NASA Moon Mission: चंद्र मोहीम पुन्हा पुढे ढकलली, जेफ बेझोसची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ बनली मोठं कारण?

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

PHOTO | तुम्हीही प्लॅस्टिकच्या भांड्यात जेवता का? जाणून घ्या तुमच्या आरोग्याला कसे पोहोचवते हानी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.