26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होण्याआधी हा दिवस भारताचा स्वातंत्रदिन होता, खरंच!

26th January Republic Day of India: त्यावेळी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची घोषणा झाली. संकल्प केला गेला. तेव्हा आलेला तो रविवार, ज्या रविवारची तारीख होती 26 जानेवारी 1930.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होण्याआधी हा दिवस भारताचा स्वातंत्रदिन होता, खरंच!
पंडित नेहरु आणि तिरंगा (Photo Source - Google Images)
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:15 AM

26 जानेवारी (26th January, Republic Day of India) आपण साजरा करतो. तिरंग फडकवतो. त्याला सलामी देतो. दिल्लीतील परेड पाहतो. या सगळ्यात अनेकदा एक मुलभूत प्रश्न अनेकांना पडतो. 26 जानेनावारीच का बुआ प्रजासत्ताक दिन असतो. यामागचं नेमकं कारण आहे? लॉजिक काय आहेत, हे अनेकदा समजून घेताना वेगवेगळे दावे केले जातात. अनेकजण याबाबत गंमतीदार तर्क वितर्कही याबाबत लढवताना दिसता. 26 नोव्हेंबरापसून दोन महिने संविधानाची कॉपी पोहोचायला लागतील, म्हणून 26 नोव्हेबंर हा संविधान दिन जरी साजरा केला जात असला, तरीही प्रजासत्ताक दिन हा दोन महिन्यांपासून 26 जानेवारीला साजरा केला जातो, असा एक युक्तिवाद (Interesting facts of 26th January) केला जातो. पण हा तर्क काही खरा नाही. अनेकांना जानेवारीची 26 तारीख सोयीची वाटली म्हणून त्यांना तो दिवस प्रजासत्ताक दिनासाठी निवडला गेला असावा, असं वाटतं. पण हा तर्कही खरा नाही. नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या तारखेचं कारण काय आहे, हे त्यामुळेच समजून घेणं गरजेचं आहे. यासाठीचा इतिहास हा अत्यंत देदिप्यमान आणि उज्ज्वल असा आहे. तो जाणून घेतल्याशिवाय 26 जानेवारीचं नेमकं महत्त्व भारतीय म्हणून कळणं निव्वळ अशक्य आहे.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाआधी होता स्वातंत्र्यदिन…

तो काळ 1920-1930चा होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच हा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. लॉर्ड एडविन तेव्हा व्हॉईसरॉय होते. ब्रिटिशांच्या अंतर्गत तेव्हा स्वातंत्र्य घेण्याबाबत तेव्हा विचार सुरु होता. पण पूर्ण स्वातंत्र्य तेव्हा भारताला हवं, असा विचार तेव्हा नव्हता. अशा अपूर्ण स्वातंत्र्याला डॉमिनियन्स स्टेटस असं म्हणतात..

ते मिळावं म्हणून तेव्हा देशात आंदोलन सुरु होतं. भारतीय तेव्हा संपूर्ण स्वातंत्र्यासाठी मुळात लढतच नव्हते. 1920 ते 1930च्या काळात तेव्हा याबाबत आंदोलनही करण्यात आलं. अहकार चळवळीमुळे एक मोठं आंदोलन गांधीजींच्या नेतृत्त्वात उभं राहिलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताला पूर्ण स्वातंत्र मिळावं अशी बहुतांश जणांची भूमिका नव्हती, असंही सांगितलं जातं. खरंतर तेव्हा लॉर्ड एडविन हे भारताला डॉमिनियन्स स्टेटस द्यायला तयार होते.

लोकशाही देशच भारताल गुलाम करत होता…

व्हॉईसरॉय यांनी भारताला डॉमिनन्स स्टेटची घोषणा केल्यानंतर ब्रिटनमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. ब्रिटनमधील लोकांनी भारताला डॉमिनियन्स स्टेटस देण्याला तीव्र विरोध करत आंदोलन केलं होतं. लोकशाही असलेल्या ब्रिटन या देशातील नागरीकच दुसऱ्या देशाला गुलाम बनवण्यासाठी तेव्हा आंदोलन करत होते. हा एक प्रकारचा विरोधाभास तेव्हा दिसून आला होता. अखेर लॉर्ड एडविन यांना माघार घ्यावी लागली.

यावरुन काँग्रेस संतप्त झाली. काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी सायमन कमिशनचा अहवाल आला होता. भारताला संविधानासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्या होत्या, याचा अभ्यास सुरु केला गेला. त्यावेळी मोतीलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली. या समितीनं आपला अहवाल दिली. 1927-28मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन सुरु झालं होतं.

आणि ठिणगी पेटली….

लाहोरमध्ये तेव्हा लाला लचपत राय सामयन कमिशनविरोधात लाहोर रेल्वे समोर आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. लाला लजपचराय यांच्या मृत्यूनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. इथून कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्मची मागणी जोर धरु लागली. अखेर याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेस अखेर संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या पावित्र्यात आली होती.

लाहोरमध्ये काँग्रेसनं अधिवेशन घेऊन इंग्रजांविरोधात 1929 मध्ये एक ठराव घेतला. तेव्हा अधिवेशन बराच वेळ चालायचं. 19 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीनं तेव्हा पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला. हाच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव होय. त्यावेळचा भारत, म्हणजे आजचा बांगलादेश आणि आजचा पाकिस्तान यांना मिळून तेव्हा संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव घेतला गेला. पण हा ठराव घेतला गेलाय, हे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्याच पोहोचायला वेळ लागला.

म्हणूनच अखेर जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार हा आपण स्वातंत्र्यदिन साजरा करायला असं तेव्हा ठरलं. हे सगळं ठरवण्यात आलं 1929च्या डिसेंबर महिन्यात. हा निरोप देशभर पोहोचवण्यात आला. येणाऱ्या वर्षातल्या जानेवारी महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रत्येकानं आपआपल्या गावागावत, शहरात, परिसरात, चौकात भारताचा तिरंगा फकडवून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा, असं तेव्हा ठरलं. 1930 साली आजच्या सारखाच तिरंगा तेव्हा फडकवायचा,असं ठरवण्यात आलं होतं. फक्त तेव्हा तिरंग्यात हलकासा बदल होता. आज जिथं अशोकचक्र तिरंग्यात दिसतं, तिथं तेव्हा चरखा होता. चरखा चला चला के लेंगे आझादी, असं तेव्हा गांधी म्हणायचे. हेच त्यामागचं कारण होतं.

तिरंगा अखेर फडकला…

31 डिसेंबर 1929च्या मध्यरात्री तेव्हा पहिल्यांदा लाहोरमध्ये तिरंगा फडकला होता. रावी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर हजारो लोकांच्या साक्षीनं पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी तिरंगा फडकावला होता. याचवेळी पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प घेण्यात आला होता. संपूर्ण स्वातंत्र मिळायला हवं, यासाठी तेव्हा गांधी आणि इतरांपेक्षाही जवाहरलाल नेहरु हे जास्त आग्रही होते. सुभाषचंद्र बोस यांच्यासह तेव्हा अनेकांनी नेहरुंच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर लावून धरली होती. अवघ्या चाळीसाव्या वर्षी तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या जवाहरलाल नेहरु यांच्यासोबत तेव्हा संपूर्ण देश उभा राहिला होता. पूर्ण स्वराज्याचा म्हणजेच संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव तेव्हा पहिल्यांदा नेहरुंनी वाचून दाखवला.

त्यावेळी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची घोषणा झाली. संकल्प केला गेला. तेव्हा आलेला तो रविवार, ज्या रविवारची तारीख होती 26 जानेवारी 1930. याच दिवशी देशभरात पहिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची ज्योत पेटली. याचाच अर्थ असा की तेव्हा तिरंगा रावी नदीच्या किनारी पहिल्यांदा फडकल्यानंतर देशभर जल्लोष झाला होता. ज्या दिवशी संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यदिन साजरी करण्याचा दिवस योगायोगानं ठरला गेला, तो रविवार 26 जानेवारी असा आला होता. ही तारीख ठरवून आलेली नव्हती. हा निव्वळ योगायोग होता.

त्या वर्षापासून भारतात प्रत्येक वर्षात 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात होता. 26 जानेवारीलाच भारताला स्वातंत्र्य मिळावं, अशी तेव्हा काँग्रेस नेत्यांची मागणी होती. तेव्हा 26 जानेवारी 1948 या दिवशी स्वातंत्र मिळणार, असं जवळपास नक्की झालं होतं. पण इंग्रजांनी घाई केली. रामचंद्र गुहा यांनी याबाबतचा एक नवा पैलू शोधून काढला असून, याचा संबंध हा दुसऱ्या महायुद्धाशी जोडला आहे. जपानच्या सैनिकांनी 15 ऑगस्ट या दिवशी इंग्रजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे या दिवशी इंग्रज भारत सोडून गेले होते. आम्ही श्रेष्ठ आहोत, हा अहंकार सुखावणारा दिवस इंग्रजांसाठी होता, याची आठवण ठेवण्यासाठी त्यांनी 15 ऑगस्टला देश सोडून गेले.

आपली, स्वतःची राज्यघटना!

पण 26 जानेवारीची ओळख तेव्हा पुसली जाणं निव्वळ अशक्य होते. या दिवसाची आठवण कायम राहावी, यासाठी आपल्या संविधान साकारणाऱ्यांनी तो दिवस गणतंत्र दिवस म्हणून निवडला. स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला. आपल्या देशाची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात आली. आम्ही आमची राज्यघटना ठरवू, अशी भूमिका गांधींनी घेतली होती.

इंग्रजांच्या राजवटीत तेव्हा अनेक देशात होते. यापैकी अनेक देशांची राज्यघटना ही इंग्रजांनी तयार केली होती. श्रीलंका हे त्याचंच एक उदाहरण आहे. पण भारतीयच भारतीयांची राज्यघटना लिहितील आणि मगच ती स्वीकारली जाईल, अशी भूमिका स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च सेनापती गांधीजींनी ती घेतली होती. 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत भारतीय संविधान सुरु करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. राज्य कोणती असशील, कशी असतील, विधानसभा कशी असेल इतर सर्व बाबींचा विचार केला गेला. भाषेच्या आधारावर प्रांत रचना करण्यात आली. या सगळ्यात एक कालावधी गेला. हे संविधान तयार करुन आपण ते 26 जानेवारीला स्वीकारलं. म्हणूनच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं.

संबंधित बातम्या :

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

कोणाला दिला जातो शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार कधीपासून प्रदान करण्यात येतोय?…तर परमवीर आणि महावीर चक्र पुरस्कारबद्दलही घ्या जाणून

गाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे? जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.