रात्री रस्त्यावर चकाकणाऱ्या दिव्यांमागची इंटरेस्टिंग गोष्ट! वीज कनेक्शनविनाच लुकलुकतात दिवे?
आपल्यापैकी अनेकांनी रस्त्याच्या आजू बाजूला काही लुकलुकणारे दिवे पाहिले असतील आणि हे दिवे रात्री आपल्याला चकाकताना पाहायला मिळतात परंतु कधी असा विचार केला आहे का? रात्री रस्त्यावर चकाकणारे हे दिवे रात्रभर विजेच्या कनेक्शन शिवाय कसे जळतात?
मुंबई : आपल्यापैकी अनेक जण रात्रीच्या वेळी प्रवास करतात. रात्री नॅशनल हायवेवर (National Highway) प्रवास करत असताना अनेकांनी पाहिले असेल की, रस्त्याच्या बाजूला आपल्याला काही दिवे नजरेस पडतात. हे दिवे (Street Light) रात्रभर चमकत असतात. काही विशिष्ट अंतरावर हे दिवे आपल्याला लुकलुक करताना पाहायला मिळतात. काही वेळा तर आपल्या गाडीची लाईट या दिव्यांवर पडताच आपल्याला उजेड दिसून येतो. परंतु काही रस्त्यांवर हे दिवे आपल्याला एलईडी प्रमाणे लुकलुक करताना पाहायला मिळतात किंवा रात्रभर लाईट चकाकताना दिसते. या दिव्यांमुळे (Road Reflectors) आपला प्रवास सहज सोपा होतो आपण कोणत्याही दुर्घटनेशिवाय आपला प्रवास पूर्ण करू शकतो. अशातच अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, हे जे रस्त्याच्या दुतर्फा दिवे लावलेले असतात त्यामध्ये कोणतेही विजेच्या कनेक्शनशिवाय वीज कशी येते? कोणतेही वीज कनेक्शन नसताना देखील हे दिवे कसे लुकलुकतात?या दिव्यांमध्ये आपल्याला रात्रीच लाईट पाहायला मिळते. दिवसा या दिव्यांमध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळत नाही. आजच्या लेखामध्ये आपण या दिव्यांच्या मागील एक इंटरेस्टिंग माहिती जाणून घेणार आहोत. हे दिवे कशा पद्धतीने काम करतात. या दिव्यांमध्ये विजेचे कोणत्याही कनेक्शन शिवाय कशी वीज येते याबद्दल सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
कसे चकाकतात हे दिवे?
रस्त्याच्या बाजूला लागलेल्या दिव्यांमुळेच हे दिवेदेखील चमकतात ज्याला आपण स्टड असेदेखील म्हणतो. हे दिवे दिसायला सायकलच्या पेडल प्रमाणे दिसतात आणि यावरच दिवे लागतात. या दिव्यांमध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात ज्यामध्ये एक ऍक्टिव्ह रिफ्लेक्टर असतात आणि दुसरे पॅसिव्ह रिफ्लेक्टर असतात. यातील एका दिव्यामध्ये रेडियम मुळे लाईट दिसू लागते त्याचबरोबर एका लाईटमध्ये एलईडी लावलेली असते.
जे पॅसिव रिफलेक्टर्स असतात ते रेडियम दिवे असतात. या दिव्यांच्या दोन्ही बाजूला रेडियम पट्टी लावलेली असते. जेव्हा अंधारामध्ये वाहनांचा प्रकाश या दिव्यावर पडतो तेव्हा आपोआप लाईट दिसू लागते व हे दिवे लुकलुकत असतात. या दिव्यांमध्ये कोणताच प्रकाश आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत नाही त्याचबरोबर यामध्ये कोणतेच विजेचे कनेक्शन देखील नसते.
जे अॅक्टिव रिफलेक्टर्स असतात ते विजेच्या सहाय्याने काम करतात म्हणजेच या दिव्यांमध्ये एलईडी मार्फत दिवे लुकलुकत असतात. रात्र झाल्यावर ते स्वतः प्रकाश पुरवतात आणि दिवसा बंद होतात. हे दिवे विजेच्या आधारावर नाही तर एलईडी च्या मार्फत आपल्याला प्रकाश पुरवतात.
कुठून येते विजेचे कनेक्शन?
या रिफलेक्टर्स मध्ये सोलार पॅनल लावलेले असतात आणि एक बॅटरी देखील असते त्यामुळे दिवसभर हे दिवे सोलार पॅनल मुळे चार्ज होतात आणि रात्री स्वतः प्रकाश देऊ लागतात. सोलार पॅनल असल्यामुळे यांना कोणतेही तारेचे किंवा विजेची आवश्यकता भासत नाही.
रात्री कसे दिवे लुकलुक करत असतात?
अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, रात्री या दिव्यांना कोण चालू करते आणि सकाळी झाल्यावर या दिव्यांना बंद कोण करते. आपणास सांगू इच्छितो की, या दिव्यांच्या बाबतीत अशी कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. म्हणजेच कोणतीच व्यक्ती हे दिवे बंद करण्यासाठी ठेवलेली नसते. ते दिवे स्वतःच कार्य करतात. खरे तर या दिव्यांमध्ये एल डी आर l-dr लावलेला असतो, जो सेन्सर चे काम करतो. हे सेन्सर जशी रात्र होते किंवा आजूबाजूला अंधार पसरतो अशा वेळी स्वतः सुरु होऊन जातात. आजूबाजूला प्रकाश निर्माण झाल्यावर म्हणजेच सकाळ झाल्यावर हे दिवे आपोआप बंद होतात. अनेक ठिकाणी सिस्टम रोडवर अशा प्रकारच्या दिव्यांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
इतर बातम्या
असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी
प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !
हक्काच्या कारमध्ये बसून दारू पिणं का ठरतं बेकायदेशीर? ‘हे’ आहे यामागचं नेमकं कारण!