तुम्हीही कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर करताय; शरीराला आहे घातक…

आपल्या घरातील कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत की नाही याबाबत ‘नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर’(National capital poison center)चे निरीक्षण समोर आले आहे. त्यात सांगितलेय की, जर तुमच्या घरातील बटाट्यांना कोंब आले असतील तर ते फेकून देणे गरजेचे आहे, त्याच्या वापराने शरीरावर घातक परिणाम होउ शकतात.

तुम्हीही कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर करताय; शरीराला आहे घातक...
Sprouted Potatoes
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 11:00 AM

घरात अनेक वेळा आपणास कोंब फुटलेले बटाटे नजरेस पडत असतात. परंतु तरीदेखील घरातील गृहिणी त्याचा वापर करतानाही आपण पाहिले आहे. परंतु या कोंब आलेल्या बटाट्यांचा वापर शरीराला किती घातक ठरु शकतो याचा आपण कधीही विचार करीत नसतो. खर तर कुठल्याही अन्नघटकांना वेळेत संपवणे महत्वाचे मानले जाते. फार काळ पडून राहिल्याने त्याची पोषकमुल्य कमी होण्याचा धोका असतो. जास्त साठवण्यात आलेले कांदा, बटाटे कालांतराने त्यांना कोंब येतात. तीव्र वासही येतो. दरम्यान, कोंब आलेल्या बटाट्यांच्या संदर्भात ‘नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर’ चे (National capital poison center)एक निरीक्षण समोर आले आहे. या अहवालानुसार कोंब आलेले बटाटे (Sprouted Potatoes) फेकून देणे योग्य आहे. कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) का आहे, त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, याबाबत अभ्यासातून उत्तरे देण्यात आली आहेत.

शरीराला ठरेल घातक

‘नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर’च्‍या अहवालानुसार, बटाट्यांमध्ये निसर्गत: सोलेनिन आणि चाकोनाइन हे विषारी गुणधर्म असलेले घटक असतात. त्यांचे प्रमाण खूप नसले तरी, त्याच्या पानांमध्ये हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे बटाट्याला जसे कोंब फुटू लागतात तसेतसे त्यामध्ये हे दोन्ही विषारी घटकांचे प्रमाणदेखील वाढू लागते. त्यामुळे असे बटाटे कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यानंतर ते घटक शरीरात पोहोचू लागतात. अहवालानुसार, असे बटाटे एक किंवा दोनदा खाल्ल्याने फारसे नुकसान होत नाही, परंतु जर तुम्ही अशा बटाट्यापासून बनवलेले अन्न सतत खात राहिलात तर, विशेषत: पोटाशी संबंधित समस्या निर्माण होउ शकते.

ही लक्षणे दिसल्यास सावध

1) बटाट्यातील विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात पोहोचू लागले तर अनेक लक्षणे दिसतात. उदा. उलट्या, जुलाब आणि पोटदुखी. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे सौम्य असू शकतात तर काहींमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूपात असतात.

2) स्थिती अधिक गंभीर झाल्यास, कमी रक्तदाब, ताप आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.

कोंब न येण्यासाठी हे करा

1) जर बटाट्याला हिरवा रंग येत असेल किंवा आधीच कुठेतरी कोंब फुटला असेल तर तो काढून टाका.

2) जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाहीत अशा ठिकाणी बटाटे साठवा. ते साठवताना नेहमी कांद्यासारख्या घटकांपासून वेगळे ठेवा कारण त्यांनी सोडलेल्या गॅसमुळे बटाट्यांमध्ये कोंब येउ शकतात.

3) जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बटाटे घेतले असतील तर तुम्ही ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. त्यातून हवा खेळती रहावी.

Video | राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Corona and Omicron | देशात 24 तासात 3.17 लाखापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉनचे 9 हजारपेक्षा जास्त

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही काही नेत्यांची छुपी नीती : योगेश कदम

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.