भारतात पॉर्न चित्रपटात काम करणारे कलाकार किती पैसे कमावतात? जाणून घ्या A टू Z माहिती

बॉलिवूडमध्ये किंवा चित्रपटात काम करायचं स्वप्न घेऊन अनेक तरुण-तरुणी मुंबईत दाखल होतात. पण सगळ्यांनाच या क्षेत्रात काम करणं शक्य होत नाही.

भारतात पॉर्न चित्रपटात काम करणारे कलाकार किती पैसे कमावतात? जाणून घ्या A टू Z माहिती
चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 9:11 PM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा गेल्या वर्षभरापासून तपास सुरु आहे. गेल्यावर्षी या प्रकरणाची चौकशी करताना अनेक नामांकित व्यक्ती चर्चेत आले होते. त्यावेळी महाराष्ट्र सायबर सेलने सर्वांचे जबाब नोंदवून घेतले होते. मात्र, कुणाच्याही विरोधात कारवाई किंवा कुणालाही अटक झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास सुरुच होता तेवढ्यात याच क्षेत्राशी संबंधित दुसरं प्रकरण बाहेर आलं आहे. या प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला अटक झाली आहे. आता या प्रकरणाशी संबंधित रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

गुन्हे शाखेचा याप्रकरणी तपास सुरु असताना राज कुंद्राच्या कंपनीला या काळ्या धंद्यातून कोट्यवधी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राज कुंद्राचे काही व्हाट्सअॅप चॅटही समोर आले आहेत. आता आम्ही या क्षेत्रात मुख्य पात्र म्हणून पडद्यावर आणि कॅमेऱ्यासमोर काम करमाऱ्या कलाकारांना नेमके किती पैसे दिले जातात याची माहिती देणार आहोत.

कलाकारांना किती पैसे मिळतात?

नवभारत टाईम्सने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पॉर्न क्षेत्रात काम करणाऱ्या 150 ते 200 स्ट्रगलर महिला मॉडेल आहेत. तर 15-20 पुरुष मॉडेल आहेत. यापैकी अनेकजण वेगवेगळ्या पॉर्न वेबसाईटसाठी शूट करतात. यांपैकी काहीजण हे नवोदित कलाकार असतात ज्यांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपला खर्च भागवण्यासाठी हे काम करावं लागतं. काही महिला मॉडेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या नवनवीन चित्रपटांचे पोश्टर शेअर करत असतात. त्यांना चांगला फॅन फॉलोविंग असल्याने पॉर्न चित्रपट निर्माते त्यांना दिवसाचे 30 हजार ते 50 हजार रुपये देतात. तर पुरुषांना 10 ते 20 हजार रुपये दिले जातात.

खर्च भागवण्यासाठी करावं लागतं काम

बॉलिवूडमध्ये किंवा चित्रपटात काम करायचं स्वप्न घेऊन अनेक तरुण-तरुणी मुंबईत दाखल होतात. पण सगळ्यांनाच या क्षेत्रात काम करणं शक्य होत नाही. काही तरुण मेहनत करुनही यश मिळत नाही म्हणून आपला मार्ग बदलतात. तर काही तरुण मन घट्ट करुन परिस्थितीला झुंज देवून काम करत राहतात. पण त्यांना तरीही यश मिळत नाही. शेवटी ते आपला मोर्चा मॉडेलिंगच्या दिशेला वळवतात. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना त्यांची पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या निर्मित्यांसोबत भेट होते. ते त्यांना कामासाठी ऑफर करतात. काही तरुण-तरुणी त्याला विरोध करतात. पण काही जण खर्च भागवण्यासाठी या मार्गाचा अखेर अवलंब करतात.

भारतात ‘या’ प्लॅटफॉर्मवर पॉर्न दाखवले जातात

महाराष्ट्र सायबर सेलच्या माहितीनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मवर उल्लू, नियो फ्लिक्स, अल्टबालाजी, हॉटशॉट, कूकू, होटमास्टी, प्राईम फ्लिक्स, चिक्कू फ्लिक्स, वेटफ्लिक्स, फ्लिज मूवी, फिनिओ आणि आणखी काही वेबसाईट्सवर पॉर्न फिल्म दाखवले जातात. या अॅप्सवर ग्राहकांकडून वर्षभराच्या सब्सक्राईबसाठी 250 ते 300 रुपये घेतले जातात. त्याचबरोबर तीन आणि सहा महिन्यासाठी देखील सब्सक्राईबचे ऑप्शन आहेत. विशेष म्हणजे भारतात पॉर्नोग्राफीचे सब्सक्रायबर कमी होते. पण लॉकडाऊन काळात सब्सक्रायबरची संख्या झपाट्याने वाढली. ही संख्या लॉकडाऊन काळात तब्बल 95 टक्क्यांनी वाढली अशी माहिती समोर आली आहे.

भारतात पॉर्नोग्राफीवर बॅन आहे का? कायदा काय सांगतो

भारतात पॉर्नोग्राफीवर बॅन आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या संदर्भात ‘बीबीसी’ने सायबर तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, IT Act च्या सेक्शन 67 नुसार जर कुणी ऑब्सीन किंवा अश्लील मटेरियल प्रकाशिक केला किंवा त्यासाठी हातभार लावला तर 5 वर्षांपर्यंत दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे 67 A हा अजामिनपात्र आहे. पहिल्यांदा चूक केली तर पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10 लाख दंड, दुसऱ्यांदा चूक केली तर दंडाची रक्कम 7 लाखांपर्यंत आहे. हाच नियम पॉर्नोग्राफीसाठी लावला जातो. तर 67 B हा कायदा चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी आहे. 18 वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी यांच्या संबंधित ऑब्सीन कंटेट प्रकाशिक केला तरी गु्न्हा दाखल होऊ शकतो. पॉर्न बघणं हा गुन्हा नसला तरी तसा कंटेट प्रकाशित करणं हा गुन्हा आहे. या प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा होते.

हेही वाचा : अश्लिल चित्रपटांसाठीचं जगातलं पहिलं विद्यापीठ, दरवर्षी अ‌ॅडमिशनसाठी झुंबड, प्रशिक्षणासोबतच येथे काय काय होतं ?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.