नुसतं EMI भरत बसू नका, होमलोन संबंधित या 6 गोष्टी तुम्हाला माहित हवीत

Home Loan : सर्वसामान्य लोकांच्या नावावर नक्कीच होमलोन असेल. कारण कर्ज घेतल्याशिवाय सर्वसामान्य माणूस हे घर खरेदी करु शकत नाही. पण होम लोन घेतल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भातील काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

नुसतं EMI भरत बसू नका, होमलोन संबंधित या 6 गोष्टी तुम्हाला माहित हवीत
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 6:31 PM

Home Loan Closure List : सर्वसामान्य लोकांना घर खरेदी करण्यासाठी होमलोनच घ्यावे लागते. कारण सर्वसामान्य लोकांकडे इतके पैसे जमा नसतात की ते रोख रक्कम घेऊन पैसे देऊ शकतील. होमलोन घेऊनच घर खरेदी करावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का की, लोन पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून काही महत्त्वाची कागदपत्र मागितली पाहिजे. अनेकांना ही गोष्ट माहितच नसते. आपण लोन घेताना बँक आपल्याकडून अनेक गोष्टी लिहून घेते. अनेक कागदपत्र मागते. ते दिल्यानंतरच आपल्याला लोन दिलं जातं. पण हेच लोन संपल्यानंतर आपण मात्र ही कागदपत्र पुन्हा मागून घ्यायला विसरुन जातो. होमलोन संपल्यानंतर काय केलं पाहिजे जाणून घ्या.

बँकेकडून पोस्ट-डेटेड चेक मागून घेणे

कर्ज घेताना बँक आपल्याकडून काही चेक घेते. पुढील देय तारखेसह हे चेक घेतलेले असतात. जेणेकरून आपला ईएमआय जर चुकला तर बँक त्या धनादेशाचा वापर करून त्यांचे पैसे वसूल करू शकतो. अशा वेळी जर तुम्ही कर्ज पूर्ण भरले असेल तर तुम्हाला बँकेकडून हे चेक मागून घेतले पाहिजे.

बँकेकडून ‘नो ड्यूज सर्टिफिकेट’ मागणे

लोन संपल्यानंतर तुम्ही बँकेकडून कोणतीही थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र मागून घेणे फार महत्त्वाचे असते. तसे न केल्यास कधी कधी तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे कर्ज भरुन झाल्यानंतर बँकेचे तुमच्याकडे एक रुपयाही देणे बाकी नाही असं प्रमाणपत्र मागून घेणे आवश्यक असते.

या प्रमाणपत्रात खालील माहिती असणे आवश्यक आहे.

कर्जदाराचे नाव मालमत्ता पत्ता कर्ज खाते क्रमांक कर्जाची रक्कम कर्ज सुरू होण्याची तारीख कर्ज परतफेड तारीख

मालमत्तेवरून बँकेचे धारणाधिकार काढून टाकणे

बँकेकडून गृहकर्ज घेतो, तेव्हा कर्जाची परतफेड न झाल्यास बँक आपल्या घराचा ताबा घेण्याचे अधिकार आपल्याकडून घेते. त्यामुळे जेव्हा तुमचं लोन संपेल तेव्हा तो अधिकार तुम्ही बँककडून काढून घेणे महत्त्वाचे असते. कधी कधी बँकेचा हा अधिकार तुम्हाला भविष्यात घर विकण्यापासून रोखू शकते. त्यामुळेच हे खूर महत्त्वाचे आहे. गृहकर्ज फेडल्यानंतर आठवणीने हे काम करुन घ्या. यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्यासह निबंधक कार्यालयात जावे लागेल.

अद्ययावत गैरभार प्रमाणपत्र घेणे

प्रत्येक बँकेत कायदेशीर सल्लागार असतात. जे तांत्रिक तपशील समजून घेतल्यानंतर अहवाल तयार करतात. या दस्तऐवजात तुमच्या घराचे संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांचे तपशील असतात. मालमत्ता कधी घेतली, कोणाकडून घेतली आणि किती किंमतीला विकली गेली. या मालमत्तेवर कर्ज कधी व कोणत्या रकमेसाठी घेतले होते? या अहवालात मालकाने चूक केल्यास बँक जमीन विकण्याच्या स्थितीत आहे का याचाही उल्लेख असतो.

गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून अपडेटेड प्रमाणपत्र मागणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तुमचे कर्ज बंद केल्याची माहिती देखील लिहिली जाते.

बँकेकडून कर्ज परतफेडीचे संपूर्ण स्टेटमेंट मागा

कर्ज परतफेड केल्यानंतर तुम्ही बँकेकडून कर्ज परतफेडीचे संपूर्ण विवरण मागून घ्यावे, ज्यामध्ये तुमच्या पहिल्या पेमेंटपासून शेवटच्या पेमेंटपर्यंतचा तपशील असेल.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट अपडेट करुन घेणे

गृहकर्ज भरुन झाल्यानंतर ही अनेक वेळा बँका कर्ज बंद झाल्याची माहिती क्रेडिट कंपनीला देत नाहीत, त्यामुळे हे गृहकर्ज आमच्या क्रेडिट अहवालात सक्रिय असल्याचे दिसते. ज्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. भविष्यात कर्जाची गरज भासल्यास कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून कर्ज फेडून झाल्यानंतर क्रेडिट रिपोर्ट अपडेट करुन घ्यावा.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.