घरात विष्णूची आवडती ‘ही’ वनस्पती लावा; आरोग्यासोबतच रखडलेली कामे होतील पूर्ण

घरात विष्णूची आवडती अन् पवित्र असणारी वनस्पती घरात लावल्याने अनेक फायदे होतात. या वनस्पतीमुळे रखडलेली कामे तर होतातच पण सोबतच आरोग्य सुधारण्यासही मदत होते. पाहुयात मग कोणती आहे ही चमत्कारीक वनस्पती.

घरात विष्णूची आवडती ‘ही’ वनस्पती लावा; आरोग्यासोबतच रखडलेली कामे होतील पूर्ण
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 12:42 PM

ज्योतिषशास्त्रानुसार वनस्पतींचेही अनेक फायदे सांगितलेले आहेत. त्यातील काही वनस्पती या आपल्या घरी नेहमी असाव्या असही सांगितलं जातं. घरात आणि आजूबाजूला झाडे लावणे शुभ मानले जाते. यामुळे अनेक फायदे होतात. यातील अनेक झाडे आणि वनस्पती अतिशय पवित्र मानल्या जातात. ज्यांची सनातन धर्मानुसार पूजाही केली जाते.

अशाच एका पवित्र वनस्पतीबद्दल आज जाणून घेणार आहोत. या वनस्पतीची घरामध्ये प्रतिष्ठापना करून विधीनुसार पूजा केल्यास चमत्कारी फायदे नक्कीच दिसून येतात. तसेच ही वनस्पती भगवान विष्णूला खूप प्रिय असल्याचही म्हटलं जातं.

या वनस्पतीचे नाव आहे कणेर. या वनस्पतीवर फुलणाऱ्या फुलांचा रंग पिवळा असून तो भगवान विष्णूंचा आवडता रंग मानला जातो तर. हे फूल देवी महालक्ष्मीलाही अतिशय प्रिय मानले जाते. जर आपण हे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावले तर ते सकारात्मकतेसोबतच सुख-समृद्धी आणते तसेच जीवनात शांतता राहते असं म्हटलं जातं.

कणेरचे रोप कोणत्या दिशेला लावायचे?

वास्तुशास्त्राच्या मते, घरामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची फुले देणारे कणेरचे रोप लावताना दिशा महत्त्वाची ठरते. यासाठी पूर्व किंवा पश्चिम दिशा शुभ मानली जाते. यापैकी कोणत्याही एका दिशेने तुम्ही हे रोप लावू शकता. घरामध्ये लाल रंगाची फुले देणारे कणेर रोप लावू नये. याची विशेष काळजी घ्या.

कणेर वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे

कणेर वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक फायदेही आहेत. जर तुम्हाला दाद, किंवा अॅलर्जी, अंगाला खाज येण्याची समस्या असेल तर तुम्ही कणेरचे मूळ गोमूत्रात चोळून लावल्याने केल्याने खाज येण्यापासून खूप आराम मिळतो.

जर एखाद्याला साप, विंचू किंवा इतर कोणताही विषारी किडा चावला असेल तर पांढऱ्या कणेरच्या मुळ चोळून लावल्यास. तात्काळ आराम मिळेल पण त्याचवेळी जवळच्या डॉक्टरांशीही संपर्क साधून उपचार घ्यायला विसरू नका.

शरीराच्या कोणत्याही भागात खाज येत असल्यास कणेरची पाने लवंगाच्या तेलात मिसळून शिजवा. यानंतर, मिश्रण थंड झाल्यावर खाज येत असलेल्या भागावर लावा. असे केल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

संपत्तीत होते वाढ

कणेरच्या झाडाला वर्षभर फुले राहतात. घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केल्याने घरात नेहमी धनसंपत्ती येते. इतकेच नाही, तर कणेरची वनस्पती घरातील वातावरण शांत ठेवते. याशिवाय घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवते. ते ठेवण्यासाठी योग्य दिशा पूर्व किंवा पूर्व-उत्तर कोन आहे. या दिशेला ठेवल्याने लक्ष्मीचा वास होतो. पिवळ्या फुलांचे कणेरचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच संपत्तीतही भरपूर वाढ होते. याचा वापर केल्याने शुभ कार्यात कोणताही अडथळा येत नाही असंही म्हटलं जातं.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.