भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जुन्या काळात लपवून ठेवलेली संपत्ती सापडलीय. त्यामुळे या ठिकाणांविषयी सर्वसामान्यांमध्ये चांगलीच उत्सूकता असते. यात काही मंदिरांचा समावेश आहे तर काही किल्ल्यांचा. तेथील संपत्ती पाहूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे अशा ठिकाणी कुणाला एखादा खजाना सापडला तर ती व्यक्ती रात्रीतून अब्जाधीश होऊ शकते. भारतातील अशा 5 जागांविषयी माहिती.
बिहारमधील सोन भंडारच्या गुहांमध्ये सोन्याचा खजाना आहे. बिहारच्या राजगीर येथे अशा दोन गुहा आहेत. या खजान्याचा गुप्त दरवाजा खूपच सुरक्षित आहे. तुम्हाला गुफेत लिहिलेली गुप्त लिपी वाचता आली तर तुम्हाला तो दरवाजा उघडता येईल, असंही बोललं जातं.
केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर हे तेथील सोन्याच्या खजान्यासाठी ओळखलं जातं. तिरुवनंतपुरममधील हे मंदिर भारतातील त्या मोजक्या मंदिरांपैकी आहे जेथे अब्जावधींची संपत्ती आहे. 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर या मंदिराच्या खजान्याचा दरवाजा उघडण्यात आला. या खजान्यातील दागिणे, मूर्ती, मुकुट, सोनं पाहून अनेकांना धक्का बसला.याची किंमत जवळपास 22 अब्ज म्हणजेच जवळपास 1.3 लाख कोटी रुपये आहे.
हैदराबादमधील किंग कोठीचाही या ठिकाणांमध्ये समावेश आहे. हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अलीची फोर्ब्स मॅगझीनने 210.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक सांगत जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद केली. मीर उस्मान अलीने आपली संपूर्ण संपत्ती हैदराबादच्या किंग कोठीत लपवून ठेवली.
आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदी ही हिऱ्यांचा खजाना मानली जाते. जगातील सर्वात मौल्यवान आणि प्रसिद्ध हिरा येथेच मिळाला. हिऱ्याची खान सापडणारी ही सर्वात मोठी चौथी आहे. एकेकाळी ही नदी जगभरासाठी हिऱ्यांचा मुख्य स्त्रोत होती. जगातील प्रत्येक 10 पैकी 7 हिरे या नदीतून येत होते.
राजस्थानमध्ये किल्ल्यांची कमतरता नाही. त्यात जयगड किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे. या किल्ल्यात गुप्त खजाना असल्याचं सांगितलं जातं. मानिसंह - 1 हे जयपुरचे राजा आणि अकबराच्या सैन्याचे सेनापती होते. अफगाण जिंकल्यावर मानसिंह-1 ने अकबराला लुटलेला खजान्याचा हिस्सा दिला. तो जयगड किल्ल्यात लपवल्याचं सांगितलं जातं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी हा खजाना शोधण्यास सांगितल्याचंही सांगितलं जातं.