AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाहुबली’तलं ‘माहिष्मती’ काल्पनिक नाही! वाचा कुठे वसलंय ‘हे’ अनोख राज्य आणि त्याची सध्याची स्थिती

माहिष्मतीबद्दल काहीही जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, बाहुबली चित्रपटात दाखवलेले हे साम्राज्य काल्पनिक नव्हते, तर वास्तव होते. आता प्रश्न असा पडतो की, जर माहिष्मती काल्पनिक नसेल तर, हे साम्राज्य भारतात नेमके कुठे आहे?

‘बाहुबली’तलं ‘माहिष्मती’ काल्पनिक नाही! वाचा कुठे वसलंय ‘हे’ अनोख राज्य आणि त्याची सध्याची स्थिती
माहिष्मती
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:06 AM

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘बाहुबली’ (Baahubali) या चित्रपटाचे नाव अग्रक्रमी आहे. प्रभासच्या या चित्रपटाने केवळ कमाईचे अनेक विक्रम मोडले नाहीत, तर देशासह जगाच्या कानाकोपऱ्यातही आपली छाप सोडली. ‘बाहुबली’ व्यतिरिक्त या चित्रपटात अशी अनेक पात्रं होती, जी लोकांच्या कायम लक्षात राहिली. यामध्ये ‘कटप्पा’, ‘देवसेना’, ‘भल्लालदेव’, ‘शिवगामी’, ‘अवंतिका’, ‘बिजलादेव’ इत्यादी पात्रांचा समावेश आहे. याखेरीज या चित्रपटाची कहाणी माहिष्मती या राज्याला केंद्रास्थानी ठेवून तयार केली गेली आहे (Know about real Mahishmati and where is it situated).

लोकांमध्ये माहिष्मतीबद्दल दोन प्रकारची चर्चा आहे. काहींनी माहिष्मतीला ‘बाहुबली’ चित्रपटात चित्रित केलेले काल्पनिक साम्राज्य मानले आहे, तर काहींनी या साम्राज्याला वास्तविक म्हटले आहे. जर ‘बाहुबली’त दाखवलेली माहिष्मती खरी असेल, तर हे साम्राज्य सध्या कुठे आहे? हा देखील एक मोठा प्रश्न आहे, जो लोकांच्या मनात येतो. आज आम्ही तुम्हाला ‘बाहुबली’ चित्रपटात दाखवलेल्या माहिष्मती राज्याविषयी महत्वाची माहिती देणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितक नसेल…

‘बाहुबली’मध्ये दाखवलेली ‘माहिष्मती’ काल्पनिक नाही!

माहिष्मतीबद्दल काहीही जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, बाहुबली चित्रपटात दाखवलेले हे साम्राज्य काल्पनिक नव्हते, तर वास्तव होते. आता प्रश्न असा पडतो की, जर माहिष्मती काल्पनिक नसेल तर, हे साम्राज्य भारतात नेमके कुठे आहे? इतिहासात नोंदवलेल्या नोंदीनुसार, ‘बाहुबली’ चित्रपटाचे केंद्र असलेल्या माहिष्मती मध्य भारतात स्थित एक मोठे शहर होते (Know about real Mahishmati and where is it situated).

हे शहर आता मध्य प्रदेशात आहे. इतिहासाच्या अनेक नोंदी आणि कथांमध्ये माहिष्मतीचा उल्लेख आहे. त्यावेळी हे शहर एक सामाजिक आणि राजकीय केंद्र होते. इतिहासात नोंदवलेल्या माहितीनुसार, त्या काळात माहिष्मती अवंती साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होती.

‘बाहुबली’चे माहिष्मती राज्य सध्या ‘या’ राज्यात

भारतकोशच्या म्हणण्यानुसार माहिष्मती चेदी जनपत जिल्ह्याची राजधानी असायची. हे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले होते. माहिष्मतीबद्दल असे सांगितले जाते की, सध्या ते मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आहे, जे आता महेश्वर म्हणून ओळखले जाते. खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू यासाठी प्रसिद्ध आहे.

इथला ‘महेश्वर’ किल्ला, ‘विट्ठलेश्वर’ मंदिर, ‘अहिलेश्वर’ मंदिर अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. खरगोनचे महेश्वर हे इंदूरपासून सुमारे 91 कि.मी. अंतरावर आहे, जिथे सहज पोहचता येते. आशा आहे की, तुम्हाला तुमच्या आवडत्या ‘बाहुबली’मधील माहिष्मती राज्याला एकदा तरी भेट देणे नक्कीच आवडेल.

(Know about real Mahishmati and where is it situated)

हेही वाचा :

Super Blood Moon Explainer | आज आकाशात दोन चमत्‍कार अनुभवायला मिळणार, जाणून घ्या असं का आणि कधी होतं?

देशातील कानाकोपऱ्यात दिसणाऱ्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे महत्त्व काय? कसे करते काम?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.