केदारनाथ ते काश्मीर, ज्या MI 17 मुळे रावतांना जीव गमवावा लागला ते शत्रूचा कर्दनकाळ आहे हे माहितीय?

2008 मध्ये मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी एनएसजीचे कमांडो याच हेलिकॉप्टरनं मुंबईत पोहोचले. पंतप्रधान मोदींसह अनेक व्हीव्हीआयपींच्या मुव्हमेंटवेळी MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्सच सर्वात आधी गिरट्या घालतात.

केदारनाथ ते काश्मीर, ज्या MI 17 मुळे रावतांना जीव गमवावा लागला ते शत्रूचा कर्दनकाळ आहे हे माहितीय?
केदारनाथची ढगफुटी असो की काश्मीरचा बर्फ, एमआय 17 नं चोख कामगिरी बजावलीय
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 8:22 PM

जगातले 60 देश जे हेलिकॉप्टर वापरतात, तेच हे MI 17 V5 हेलिकॉप्टर दुश्मनांचा कर्दनकाळ म्हटलं जातं. अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सपैकी MI सेव्हन्टिंनचं नाव अग्रस्थानी आहे. केदारनाथ आणि इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीवेळी याच हेलिकॉप्टरनं असंख्य लोकांचे प्राण वाचवले. नेपाळ भूकंपावेळी भारताचे दोन MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्स तातडीनं मदतीला धावले. 2008 मध्ये मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी एनएसजीचे कमांडो याच हेलिकॉप्टरनं मुंबईत पोहोचले. पंतप्रधान मोदींसह अनेक व्हीव्हीआयपींच्या मुव्हमेंटवेळी MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्सच सर्वात आधी गिरट्या घालतात. स्वतः पंतप्रधान मोदी अनेकदा MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरनंच प्रवास करतात. कोणत्याही तापमानात गगनचुंबी पहाडांच्या उंचीची स्पर्धा करणारं हेलिकॉप्टर म्हणून MI सेव्हन्टिंनची ख्याती आहे, कारगिलचे 18 हजार फुटांपर्यंतचे पर्वत असोत, की मग हाडं वितळवणारी केदारनाथची थंडी, MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर प्रत्येक आव्हानावर खरं उतरलंय. श्रीनगरपासून कारगिलपर्यंत,  कारगिलपासून लडाखपर्यंत, लडाखपासून केदारनाथ आणि पुढे केदारनाथापासून ईशान्य भारतापर्यंत. जोखमीच्या मोहिमा असोत किंवा नैसर्गिक आपत्ती. MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरच भारतीय वायुसेनेचं सर्वात भरवशाचं हत्यार राहिलंय. मात्र कुन्नूरचा पहाड या भरवश्याच्या MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरसाठी अपवाद ठरला.

  1. MI सेव्हन्टिंन व्ही फाईव्ह हेलिकॉप्टर मेड इन रशिया आहे

2. डबल इंजिन आणि बहुउपयोगी कामासाठी त्याची निर्मिती केली गेलीय

3. MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरमध्ये एस- 8 रॉकेट, शट्रम व्हि मिसाईल आणि 23 एमएमची मशीन गन सुद्धा असते.

4. धावत्या हेलिकॉप्टरमधून तब्बल 8 ठिकाणाहून फायरिंग होऊ शकेल, अश्या पोस्ट आहेत

5.स्थिर आणि धावत्या टार्गेटला काही सेकंदात खाक करण्याची क्षमता आहे

6.आधुनिक रडार, अँटी फ्लेअर सिस्टिमनं MI सेव्हन्टिंन तयार केलं गेलंय

7. सिंगल रोटर एमआय सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर ताशी 250 किलोमीटर वेगानं धावतं

8. कॉकपीटमध्ये पायलट, को-पायलट आणि फ्लाईट इंजिनिअर असे एकूण 3 क्रू मेंबर असतात

9. कार्गो कॅबिनमध्ये एकूण 36 लोकांना घेऊन एमआय सेव्हन्टिंन उड्डाण करु शकतं

आता भारताकडे किती MI 17 हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांची कितीला खरेदी झाली, आणि खरेदीमागचं कारण काय होतं, ते ही समजून घेऊयात.

  • कारगिलचे अनेक पर्वत 15 ते 18 हजार फुट उंचीचे आहेत.
  • जिथं चिता आणि इतर काही मोजकेच हेलिकॉप्टर वापरात येतात
  • मात्र चिता हेलिकॉप्टर बहुतांशवेळा सैनिक आणि सामानांच्या ने-आण साठीच वापरात येतं
  • पण एमआय सेव्हन्टिन हेलिकॉप्टर सैनिकांबरोबरच शस्रं सुद्धा कॅरी करतं
  • शिवाय 15 हजार फुटांहून जास्तीच्या उंचीचा पल्ला एमआय सेव्हन्टिन सहजपणे पार करतं

रशियासोबत करार

  • 2008 मध्ये रशियासोबत भारतानं 80 एमआय सेव्हन्टिन हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार केला.
  • 2011 मध्ये प्रत्यक्षात रशियानं 80 पैकी काही हेलिकॉप्टर्स भारताला सोपवले.
  • नंतर 2013 मध्ये एमआय मालिकेतले एकूण 36 विमान भारतात पोहोचले.
  • आणि तिसऱ्या टप्प्यात 2018 मध्ये काही हेलिकॉप्टर भारताला मिळाली.

याआधी केदारनाथमध्येही एमआय सेव्हंटिन क्रॅश झालं होतं. बहुतांश वेळी लँडींगदरम्यानच एमआय सेव्हनिंटचे अपघात घडले आहेत.. त्यामुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातलं सर्वात हुकमी हत्यार, जे आकाशासोबत स्पर्धा करण्यासाठी माहिर आहे, ते नेमकं कुन्नूरमध्ये कोसळलं कसं, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे..

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.