लॉयर, बॅरिस्टर आणि ॲडव्होकेट… यातील फरक माहीत आहे काय? नसेल तर आताच जाणून घ्या!

तुम्ही कधी ना कधी कोर्टात गेला असाल. त्या ठिकाणी वकिलांना पाहिलं असेल. किंवा प्रत्यक्षात वा सिनेमात वकिलांना पाहिलं असेल. तुम्ही लॉयर, बॅरिस्टर आणि ॲडव्होकेट हे तीन शब्द ऐकलेही असतील. पण या तिन्ही शब्दांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. ते तिन्ही वेगवेगळे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे काय?

लॉयर, बॅरिस्टर आणि ॲडव्होकेट... यातील फरक माहीत आहे काय? नसेल तर आताच जाणून घ्या!
AdvocateImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 7:50 PM

पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळा कोट घातलेले वकील तुम्ही नेहमीच पाहिले असतील. सिनेमात तर वकिलांचं नेहमीच दर्शन होतं. एखाद्या केसेसवरील सिनेमा असेल तर वकिलांचे युक्तिवादही पाहिला असेल. पण तुम्हाला लॉयर, बॅरिस्टर आणि ॲडव्होकेट यातील फरक माहीत आहे काय? अनेकांना या तिन्ही गोष्टी म्हणजे एकच वाटतात. तिघेही कायद्याशी संबंधित व्यवसायात आहेत. पण तिघेही एकच नाहीये. तिघांमध्येही मोठा फरक आहे. तोच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

लॉयर कुणाला म्हणावे?

जी व्यक्ती एलएलबी करत आहे, म्हणजे कायद्याचं शिक्षण घेत आहे, त्याला लॉयर म्हणतात. जोपर्यंत बार कौन्सिलची जोपर्यंत परीक्षा पास होत नाही, जोपर्यंत त्याला पास झाल्याचं सर्टिफिकेट (सनद) मिळत नाही, तोपर्यंत लॉयर कोर्टात केस लढत नाही. लॉयर केवळ कायदेशीर प्रकरणात सल्ला आणि मदत देऊ शकतो. कायदेशीर सल्ला देणं, खटल्याची तयारी करणं, दस्ताऐवजांचा मसुदा तयार करणं आणि कधी कधी कोर्टात प्रतिनिधित्व करणं आदी कामे लॉयरला करावी लागतात.

ॲडव्होकेट कोण असतो?

ॲडव्होकेट हा कायदेशीर व्यवसायाशी संबंधित व्यक्ती आहे. कायद्याची पदवी आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा ज्याने पूर्ण केलेली असते. तसेच त्याला बार कौन्सिलकडून सनद मिळालेली असते. तो ॲडव्होकेट असतो. ॲडव्होकेटला कोर्टात केस लढण्याची परवानगी असते. आपल्या क्लाइंटची कोर्टात बाजू मांडण्याचा त्यांना अधिकारही असतो. ॲडव्होकेट थेट आपल्या क्लाइंटशी चर्चा करू शकतो. ॲडव्होकेट शब्दाचा प्रयोग इंग्लंड आणि अन्य राष्ट्रमंडळ (कॉमनवेल्थ) देशांमध्ये केला जातो. विशेष म्हणजे ॲडव्होकेट लॉयर होऊ शकतो. पण लॉयर ॲडव्होकेट होऊ शकत नाही.

बॅरिस्टर कोण?

जी व्यक्ती इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेते आणि पदवी घेते, त्याला बॅरिस्टर म्हटलं जातं. भारतात बॅरिस्टर ही सन्मानजनक उपाधी आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंडमध्येच कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे या दोघांनाही बॅरिस्टर म्हटलं जायचं. बॅरिस्टर व्यक्ती खटले चालवण्यात आणि युक्तिवाद करण्यात एक्सपर्ट असतात. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशात बॅरिस्टरला कोर्टात उपस्थित राहून न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करण्याचा विशेष अधिकार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.