Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवघरात वापरला जाणारा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य! जाणून घ्या याचे महत्त्वपूर्ण फायदे

कापूरचे मोठे फायदे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला कापूरची काही सामान्य वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे. कापूर एक अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. याशिवाय त्याचा वासही खूप तीव्र असतो, जो दूरवरुन जाणवू शकतो.

देवघरात वापरला जाणारा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य! जाणून घ्या याचे महत्त्वपूर्ण फायदे
कापूर
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 12:40 PM

मुंबई : साधारणत: आपण दोन प्रकारचे कापूर पाहिले असतील. एक कापूर पूजेमध्ये वापरला जातो आणि दुसरा कपड्यांत. पूजेमध्ये वापरला जाणार कापूर नैसर्गिक आहे, त्याला भीमसेनी कापूर म्हणतात. तर कपड्यांमध्ये ठेवलेला कापूर कृत्रिम आहे, जो अनेक प्रकारच्या रसायनांपासून बनवला जातो. कापूरचे हे अगदी सोपे उपयोग आहेत. पण इतकेच नाही तर त्याचे आणखी बरेच मोठे फायदे देखील आहेत. ज्याबद्दल आपल्याला कदाचित माहितीच नसेल (Know the amazing health benefits of camphor).

कापूरचे मोठे फायदे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला कापूरची काही सामान्य वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे. कापूर एक अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. याशिवाय त्याचा वासही खूप तीव्र असतो, जो दूरवरुन जाणवू शकतो.

कापूर अनेक रोगांमध्येही जबरदस्त फायदेशीर ठरतो. हे जाणून आपल्याला आश्चर्यच वाटेल की, कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्येही वापरला जातो. पूजेमध्ये कापूरच्या वापराबद्दल तुम्ही ऐकले असेलच की, यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होते. परंतु, आज आम्ही तुम्हाला कापूरचे असे काही फायदे सांगणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात मोठे बदल आणू शकतात. वास्तविक, अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांमध्ये कापूर वापरल्याने खूप आराम मिळतो. चला तर, नैसर्गिक म्हणजेच भीमसेनी कापूरचे मोठे फायदे जाणून घेऊया…

जाणून घ्या याचे महत्त्वपूर्ण फायदे :

  1. डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समान प्रमाणात वाटून त्याची पेस्ट बनवा. हे पेस्ट डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरते.
  2. कापूर डोळ्यांच्या समस्येमध्ये देखील मोठा आराम प्रदान करतो. यासाठी वडाच्या झाडातून निघणाऱ्या दूध सदृश्य द्रवात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजळाप्रमाणे लावल्यास डोळ्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
  3. तारुण्यात प्रवेश करताना चेहऱ्यावर खूप मुरुम येतात. बर्‍याच लोकांसाठी ही मुरुम खूप त्रासदायक ठरतात. या मुरुमांवर कापूर तेल लावल्याने खूप फायदा होतो. हे मुरुमांच्या पुनरावृत्तीस प्रतिबंध करते.
  4. मुरुमांमुळे किंवा इतर पुळ्यांमुळे चेहऱ्यावर बर्‍याच वेळा दाग येतात. अशा परिस्थितीत नारळाच्या तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होतात. यासह, हे चेहऱ्यावरील कोरडी त्वचा कमी करण्यास देखील मदत करतो.
  5. कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियाल गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे ते केवळ पुळ्यांवरच नियंत्रण ठेवत नाही तर, ते बरे करण्यासही उपयुक्त ठरतात.
  6. प्रदूषण आणि इतर कारणांमुळे सध्या बहुतेक लोकांचे केस गळतात आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. नारळाच्या तेलात मिसळून कापूर केसांमध्ये लावल्याने डोक्यातील कोंडा आणि केस गळतीपासून आराम मिळतो.
  7. खोकला झाल्यास मोहरी किंवा तीळ तेलात कापूर मिसळा आणि थोडा वेळ मिश्रण तसेच ठेवा. मग, या तेलाने पाठीवर आणि छातीवर हलक्या हाताने मसाज करा, हे खूप फायदेशीर ठरेल.
  8. गरम पाण्यात कापूर घालून वाफ घेतल्यास सर्दी आणि तापामध्ये खूप आराम मिळतो.

(टीप : कोणत्याही उपचारपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know the amazing health benefits of camphor)

हेही वाचा :

Anjeer Benefits : दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खा, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Healthy Heart Yoga Poses : हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 योगासन करा!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.