Code of TV Screen : टीव्ही स्किनवर दिसणारे हे कोड कॅमेराचं काम करतात, कसं? वाचा…
टीव्ही स्क्रिनवर दिसणारा कोड कोठून येतो, तो का दिसतो, त्याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा खास प्रयत्न.
मुंबई : प्रत्येकाला टीव्हीवर आपला आवडता चित्रपट, मालिका अथवा इतर कार्यक्रम पाहण्याची आवड असते. आपला आवडीचा चित्रपट पाहताना पाहणाऱ्याचं संपूर्ण लक्ष त्या स्क्रिनवर खेळून राहतं. मात्र, तेवढ्यात तुम्हाला स्क्रिनवर एक कोड प्लेट दिसते. काही लोक याकडे दुर्लक्ष करुन आपलं चित्रपट पाहण्याचं काम सुरू ठेवतात. मात्र, काही जणांना हा कोड चित्रपट पाहण्यातील अडथळा वाटतो. कारण तो कधीकधी हिरो किंवा हिरॉईनच्या चेहऱ्यावरही दिसतो. तर असा हा टीव्ही स्क्रिनवर दिसणारा कोड कोठून येतो, तो का दिसतो, त्याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा खास प्रयत्न (Know why code appears on Television screen while watching movie or serial).
टीव्ही स्क्रिनवर दिसणारा कोड काय असतो?
टीव्ही स्क्रिनवर दिसणारा हा कोड एक खास प्रकारचा ट्रॅकिंग कोड असतो. त्याचा उपयोग चित्रपट, मालिका किंवा कोणताही कॉपी राईट असलेल्या व्हिडीओचं ट्रॅकिंग करण्यासाठी वापरतात. हा कोड टीव्ही ऑपरेटरकडून येत नाही, तर तो टीव्ही चॅनलकडून तयार केला जातो. मुंबईत दिसणाऱ्या माणसाचा कोड दिल्लीतही दिसेल असं होत नाही. प्रत्येक भागात दिसणारा हा कोड वेगळा असो. हा कोड चॅनल अल्गोरिदमचा उपयोग करुन तयार केला जातो. प्रत्येक कोडला विशिष्ट ओळख असते.
या कोडचा उद्देश काय?
प्रत्येक कोडमध्ये त्याचं भौगोलिक ठिकाणाची माहिती असते. म्हणजेच तो कोणत्या भागात, शहरात दिसतो ते समजतं. याचा उपयोग करुन चित्रपटाची पायरसी होण्यापासून रोखण्यासाठी करतात. टीव्हीवर किंवा कोणत्याही स्क्रिनवर चित्रपटाची रेकॉर्डींग करुन त्याची चोरी म्हणजेच पायरसी होऊ नये म्हणून हा नंबर मोठी भूमिका काम करतो. कारण जेव्हा कुठेही स्क्रिनवरील चित्रपट रेकॉर्ड केला जातो तेव्हा त्यात अधेमधे हा कोडही दिसतो. त्यामुळे पायरसी करुन असे व्हिडीओ बाहेर शेअर झाले तर हा व्हिडीओ कोठे रेकॉर्ड केलाय हे लगेचच समजते. त्यामुळे व्हिडीओची चोरी कुठे होते हे शोधून त्यावर तातडीने कारवाई करता येते.
हेही वाचा :
कसा नोंदवला जातो FIR? काय आहेत आपले हक्क? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा ? लस प्रभावी आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?
Toothbrush Day | जगातील पहिला टूथब्रश कोणी आणि कसा बनवला? जाणून घ्या याबद्दलची रंजक माहिती…
व्हिडीओ पाहा :
Know why code appears on Television screen while watching movie or serial