तुम्ही वापरत असलेल्या सेफ्टी पिनचा इतिहास माहितीय काय, जाणून घ्या ही मजेशीर गोष्ट…

सेफ्टी पिनचा वापर अनेक ठिकाणी केला जात असतो. जवळपास सर्वच घरांमध्ये अगदी सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन आहे. अनेक वेळा आपली मोठी कामेदेखील किरकोळ अशा सेफ्टी पिनमुळे अडून बसलेली आपण अनेकदा अनुभवले आहे. परंतु बहुउपयोगी या सेफ्टी पिनचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काय.

तुम्ही वापरत असलेल्या सेफ्टी पिनचा इतिहास माहितीय काय, जाणून घ्या ही मजेशीर गोष्ट...
safety-pin-history
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 9:59 AM

मुंबई : सेफ्टी पिन (Safety Pin) ही अशी गोष्ट आहे, जी अनेक प्रकारे वापरली जाते. लोक त्याचा वापर कपड्यांपासून ते दात साफ(clean teeth) करण्यापर्यंत करतात, पण सेफ्टी पिन बनवण्यामागचा इतिहास (History) तुम्ही एकला नसेल. सेफ्टी पिनच्या नावासोबत ‘सेफ्टी’ जोडलेले असते, पण लोक त्याचा वापर अनेक प्रकारे करतात. कान आणि दात स्वच्छ करण्यापासून ते कपडे किंवा बटणे म्हणून लोक सेफ्टी पिनचा वापर करीत असतात. एका तारेने बनवलेली ही अतिशय छोटी वस्तू रोजच्या वापरात अतिशय उपयुक्त ठरत आहे. एवढेच नाही तर सेफ्टी पिनसह पेन, स्टोन, चाकू धारदार उपकरण, स्पिनर आदींचाही शोध लावला. त्याने शिलाई मशीनही बनवले आहे. त्यांच्या सेफ्टी पिन बनवण्याबाबतही अनेक कथा इंटरनेटवर दिसत असल्या तरी ती बनविण्या मागची कहाणी खुपच रंजक आहे.

वॉल्टर हंट यांनी सेफ्टी पिनचा शोध लावला होता. वॉल्टर हंट या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी प्रसिद्ध होते. असे म्हटले जाते की त्याच्यावर खूप कर्ज होते आणि ते कर्ज फेडण्यासाठी ते नवनवीन गोष्टी शोधत होते आणि त्यात सेफ्टी पिनचाही समावेश होता. यानंतर, जेव्हा त्यांना आपण शोध लावलेली वस्तू अत्यंत उपयुक्त आहे असे कळले, तेव्हा त्यांनी त्याचे मालकी हक्क घ्यायचे ठरवले. त्यातून त्यांना तब्बल 400 डॉलर मिळाले. असे सांगितले जाते की, त्यांच्या पत्नीच्या ड्रेसचे बटण तुटले होते, त्यावेळी त्यांनी एका वायरचा बटन म्हणून वापर करुन ते ड्रेसला लावले होते. यानंतर त्यांनी ही सेफ्टी पिन वायरपासूनच बनवली, ज्याला ड्रेस पिन असे म्हणतात. त्यावेळी तारांच्या जागी सेफ्टी पिन वापरल्या जात होत्या तारेच्या तुलनेत सेफ्टी पिनमुळे लोकांच्या बोटांना कमी इजा होत होती. पिनमुळे बोटांना होणारी दुखापत खूप कमी झाली होती, म्हणून याला सेफ्टी पिन म्हटले जाऊ लागले. सेफ्टी पिनचे महत्त्वाचे कार्य केवळ कपड्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या ड्रेस पिनसाठी होते तरी, आता लोक त्याचा वापर अनेक प्रकारे करतात.

विविध प्रकारात उपलब्ध

सेफ्टी पिन आता विविध प्रकारात उपलब्ध आहेत. अनेक महिला आपल्या साडीच्या रंगानुसार सेफ्टी पिनांचा संग्रह करीत असतात. त्यात विविध व्हरायटीज्‌ उपलब्ध आहेत. अनेक सेफ्टी पिनांवर विविध प्रकारचे नक्षीकाम करण्यात आलेल असते. ते महिलांच्या साडीवर अधिकच उठून दिसत असते. त्यामुळे विविध रंगबेरंगी सेफ्टी पिनांची महिलांना मोठ्या प्रमाणात भुरड पडताना दिसत असते. मुख्यत्वे साडी चोपून चापून घालण्यासाठी सेफ्टी पिनांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे महिलांकडून सेफ्टी पिनांना मोठी मागणी असते.

इतर बातम्या :

साबुदाणा नेहमी प्रश्नांच्या तावडीत का सापडतो? जाणून घेऊया साबुदाणा बनवण्याबाबतच्या प्रक्रिये बद्दलची सत्यता

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली\

कंगनाची लवकरच ओटीटीवर एंट्री; डेटिंग रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.