अंडरवर्ल्ड विश्वात एखाद्याचा मर्डर करताना “सुपारी” दिली असे का म्हंटले जायचे ? जाणून घ्या या सुपारी शब्दामागे लपलेला अर्थ आहे तरी काय?
Supari Word History : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अंडरवर्ल्डमधील लोक एखाद्या व्यक्तीचा मर्डर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतात, तेव्हा त्यासाठी "सुपारी" या शब्दाचा प्रामुख्याने वापर करत असतात परंतु या शब्दाचा नेमका अर्थ आहे तरी काय आणि हाच नेमका शब्द का वापरला जातो? जाणून घेऊया या मागील कारण.
आपल्यापैकी अनेकांना चित्रपट पाहायला आवडतात. असा क्विंंचितच एखादा व्यक्ती असेल जो चित्रपट पाहत नसेल जेव्हा कधी चित्रपटामध्ये एखादा गुंड व्यक्ती सुपारी ’ (Supari) घेण्याची बोलणी करत असतो किंवा बातचीत करत असतो तेव्हा आपल्याला समजुन जाते की त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा मर्डर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किंवा पैसे घेतलेले आहे. सुपारी या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारल्यावर त्याबदल्यात मिळालेले पैसे असा त्याचा अर्थ लावला जातो परंतु आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंडरवर्ल्डमध्ये सुपारी (Supari In Underworld) या शब्दाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का? या सगळ्या गैरव्यवहार व बेकायदेशीर कामांना सुपारी (History Of Supari) असे का म्हटले जाते व सुपारी या शब्दाचा वापर का केला जातो. तसे पाहायला गेले तर सुपारी खाण्यासाठी उपयोगात आणली जाते परंतु अंडरवर्ल्ड मध्ये या सुपारीला नकारात्मक अर्थाने का वापरले जाते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मर्डर संबंधित घटनांमध्ये सुपारी या शब्दाचा प्रामुख्याने वापर का केला जातो यानंतर तुम्हाला कळून जाईल की एखाद्या व्यक्तीला मारल्यानंतर किंवा त्याचा काँट्रॅक्ट घेतल्यावर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो.
ही आहे सुपारी मागील कहाणी
आपल्या सांगू इच्छितो की फक्त मर्डरसाठी घेण्यात आलेल्या कॉन्ट्रॅक्ट पूर्ताच सूपारी हा शब्द वापरला जात नाही तर याशिवाय सुपारी या शब्दाचा अनेकदा वापर केला जातो ज्यात एखादी बोलणी जर पक्की झाली असेल तर त्या वेळी ऍडव्हान्स किंवा टोकण म्हणून सुद्धा या शब्दाचा उल्लेख केला जातो. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार,मुंबई पोलीपिब्स ू५,४४हे विभागाचे निवृत्त एसीपी वसंत ढोबळे सांगतात की, महाराष्ट्रामध्ये एखाद्या पाहुण्याला आमंत्रित करण्यासाठी पाने सुपारीचा वापर केला जातो, या सोबतच कोणत्याही प्रकारची डील किंवा कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठीसुद्धा या शब्दाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
कोणत्याही गोष्टीवर सहमती दर्शवण्यासाठी किंवा एखादी डील पक्की झाल्यावर मराठी मध्ये कामाची सुपारी आली आहे असे म्हटले जाते. कामाची सुपारी आली आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे म्हणूनच सुपारी शब्द अन्य कामांसाठी सुद्धा वापरला जाऊ लागला आणि चित्रपटांमध्ये महाराष्ट्रातील या कारणामुळे सुपारी हा शब्द जास्त वापरला जाऊ लागला. चित्रपटांमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डशी संबंधित एखादी घटना चित्रित केली जाते तेव्हा या शब्दाचा प्रामुख्याने उच्चार आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळतो याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा मर्डर करण्यासाठी आपल्याला काम मिळाले आहे याचा संदर्भ तेथे लावला जातो.
काय आहे इतिहास?
आता आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुपारी शब्दाबद्दलची एक महत्वाची कहाणी सांगणार आहोत. Dongri to Dubai: Six Decades of the Mumbai Mafia’या पुस्तकात लेखक एस हुसैन जैदी यांनी सुपारी मागील इतिहास सांगितला आहे. या पुस्तकामध्ये असे सांगितले आहे की, माहेमी ट्राइबचे प्रमुख भीम च्या परंपरेमुळे दैनंदिन जीवनात या शब्दाचा समावेश केला गेला. या पुस्तकाच्या अनुसार जेव्हा कधीही भीम समोर कोणताही अवघड प्रसंग यायचा तेव्हा अशावेळी सैनिकांची एक मिटिंग बोलावले जात असे आणि त्यानंतर एका ताटलीत सुपारी किंवा पान ठेवले जात असायचे त्यानंतर जो कोणी त्या पान सुपारीच्या विड्याला उचलायचा त्याला ते काम करावे लागायचे यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पान इत्यादी देऊन कॉन्ट्रॅक्ट किंवा डील स्वीकारली जायची यानंतरच सुपारी हा शब्द व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येऊ लागला.
आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ,अशा अनेक घटना घडल्या आहेत त्या घटनामध्ये अंडरवर्ल्डमधील एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी एखाद्याला पैसे देऊ केले गेले आणि पैशाच्या बदल्यात मर्डर करणे याबद्दल जो कॉन्ट्रेक्ट केला जात असे अशावेळी केला गेलेला कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच सुपारीच मानली जात असे त्याचबरोबर पोलीस सुद्धा सर्वसामान्य भाषेमध्ये सुपारी या शब्दाचा प्रामुख्याने वापर करत असे.
संबंधित बातम्या
इनकम टॅक्स भरण्याआधी टॅक्स रेजिम म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं महत्त्वाचंय!
कलम 144, कर्फ्यू आणि लॉकडाउन म्हणजे आहे तरी काय? या तिघांमधील असा जाणून घ्या फरक!
मिरची खाल्ल्यावर नाका-डोळ्यांतून पाणी का येऊ लागतं? कारण इंटरेस्टिंग आहे!