HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली, पण प्रक्रिया नेमकी कशी? फसवणूक टाळण्यासाठी जाणून घ्या A to Z माहिती
HSRP Number Plate New Deadline: HSRP नंबर प्लेटसंदर्भात फसवणूक करणाऱ्या अनेक वेबसाईट गुगल सर्चमधून समोर येत आहे. त्यामुळे शासकीय वेबसाईटवर नोंदणी करुनच पैसे भरावे. बनावट वेबसाईटमधून पैसे भरल्यास तुमचे पैसही जाणार अन् नंबर प्लेटही मिळणार नाही. तसेच तुमचे बँक खातेही सायबर गुन्हेगार रिकामे करु शकतात.

High-Security Registration Plates Process: उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे हाय सिक्युरीट रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांना बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेसाठी आधी 30 मार्च मुदत होती. परंतु महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त वाहने आहेत. या मुदतीत सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अशक्य होते. त्यामुळे आता मुदत वाढवून 30 जून 2025 करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या नंबर प्लेट यूनिक असणे, वाहनांची सुरक्षितता, फसवणूक टाळणे, गुन्हेगारी रोखणे अशा अनेक कारणांमुळे एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया काय? कुठे अन् कशी करावी नोंदणी, किती शुल्क आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या… ...