हा आहे भारताचा सर्वात छोटा जिल्हा, संपूर्ण जिल्हा पायी फिरु शकता..
भारत देश अनेक राज्यांनी बनलेला आहे आणि ती सर्व राज्ये अनेक जिल्ह्यांनी बनलेली आहेत. भारतात अनेक मोठी राज्ये, जिल्हे आणि शहरे आहेत. ज्यांची स्वतःची वेगळी स्वतंत्र ओळख आहे. प्रत्येक शहर वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचे असते...

काही शहरं अशी असतात की तेथील रहाणीमान एकदम महागडे असते. तर काही शहरात जीवनमान एकदम साधं असते. सर्वांना परवडणारे तेथील दर असतात. काही शहरं ही उद्योगांसाठी ओळखली जातात. तर काही शहरात लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. काही शहरांना शिक्षणाचे केंद्र मानले जाते. तर काही शहरं अशीही असतात जी पर्यटनस्थळांसाठी देखील प्रसिद्ध असतात.
देशातील कोणते शहर राहण्यासाठी महागडे आहे हे आपण मुंबई शहराला म्हणू शकतो. परंतू मुंबईतील खाद्यपदार्थ स्वस्त असल्याने येथे साध्या वडा पाववरही दिवस काढता येतो. आज आपण भारताचा सर्वात छोटा जिल्हा म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते हे पाहणार आहोत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ इतकं लहान आहे की येथे आपण पायी देखील संपूर्ण जिल्हा फिरु शकतो.
भारताचा सर्वात छोटा जिल्हा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण ४००० हून अधिक शहर आहेत. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जमेस धरुन भारतात एकूण ७९७ जिल्हे आहेत. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा विचार करता येथे सर्व सोयी सुविधा आहेत. आज आपण देशातील सर्वात छोटा जिल्हा कोणता पाहणार आहोत. यासंदर्भात सामान्य ज्ञान म्हणून ही माहीती असणे गरजेचे आहे.




माहे जिला (Mahe District)
वास्तविक भारताचा सर्वात छोटा जिल्हा पुडुचेरीचा माहे जिल्हा आहे. पुडुचेरी एक केंद्र शासित प्रदेश आहे. क्षेत्रफळाच्या हिशेबात हा देशाचा सर्वात छोटा जिल्हा आहे. जे केवळ ९ चौरस किलोमीटर पसरलेले आहे. या जिल्ह्याच्या एका बाजूला अरबी समुद्र आहे. तर दुसऱ्या बाजूला केरळ राज्याच्या सीमा आहे.
भारताची फ्रेंच शहर (French City of India)
येथे राहणारे स्थानिय लोक मळ्याळम सह फ्रेंच भाषेत देखील बोलतात. या शहराला भारताचे फ्रान्सीसी शहर देखील म्हटले जाते. या शहरातील इमारतींना फ्रान्सच्या धर्तीवर बनविले आहे. यामुळे येथे देशी आणि विदेशी दोन्ही संस्कृतीचा संगम झाल्याचे म्हटले जाते.