Home Loan घेणारे अनेक जण करतात ही चूक, 25 वर्षांत फिटणारे लोन 40 वर्ष फेडत बसतात

home loan : होम लोन घेऊन घर खरेदी केल्यानंतर अनेक जण फक्त इएमआय भरत राहतात. पण अनेक जण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे त्यांना अधिक पैसे भरावे लागतात. कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला व्याज अधिक भरावे लागते. कोणती आहे ती चूक जी अनेक ग्राहक करतात जाणून घ्या.

Home Loan घेणारे अनेक जण करतात ही चूक, 25 वर्षांत फिटणारे लोन 40 वर्ष फेडत बसतात
home loan
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 7:20 PM

Home Loan : आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण नवीन घर खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जावरच अवलंबून असतात. सर्वसामान्य लोकांना होम लोन शिवाय घर खरेदी करणे शक्य नसते. परंतू होम लोन घेतल्यानंतर बहुतेक लोक एक चूक करतात. ज्यामुळे त्यांचे कर्ज जे 25 वर्षांत फेडता आले असते, ते परतफेड करण्यासाठी त्यांना 40 वर्षे लागतात.

गृहकर्जाचा कालावधी कसा वाढतो?

RBI ने रेपो रेट वाढवला की बँकाचे व्याजदर देखील वाढतात. व्याजदरात वाढ झाली की, बँका तुमच्या ईएमआय वाढवत नाही तर गृहकर्जाची परतफेड करण्याची मुदत वाढवतात. याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. पण जेव्हा मुदतवाढ वाढते तेव्हा तुमचे व्याज देखील वाढते.

तुम्ही जर २५ वर्षांसाठी ६.६५ टक्क्याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला जवळपास २७ हजाराचा हप्ता बसेल. परंतु बँकांकडून जेव्हा व्याजदर वाढवला जातो तेव्हा ते समजा ९.२५ टक्क्यांवर गेले तर कर्ज २५ वर्षाऐवजी ४० वर्षांपर्यंत जाते. बहुतांश बँका हे फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज देतात.

सुरुवातीच्या वर्षांच्या EMI मध्ये, व्याजाचा वाटा जास्त असतो, तर मूळ रकमेचा वाटा कमी असतो. त्यामुळे व्याज अधिक जाते. 5 वर्षांनंतरच्या परिस्थितीत, तुम्हाला असे वाटेल की आता २० वर्षेचे EMI भरायचे बाकी असेल. परंतु असे होत नाही. जसजसा व्याजदर वाढतो, तसतसा तो तुमच्या कर्जाच्या कालावधीनुसार समायोजित होतो. ग्राहकांवर जास्त ईएमआयचा भार पडू नये म्हणून हे केले जाते. बँकांनाही तेच करायचे असते. कारण तुम्ही जितका जास्त वेळ EMI भरत राहाल तितकी बँक तुमच्याकडून कमाई करेल.

अशा परिस्थितीत काय करावे?

व्याजदर जर वाढले तर तुम्ही बँकेत जावून ईएमआयची रक्कम वाढवू शकता. त्यामुळे तुमचा कालावधी तितकाच राहतो. ज्यामुळे व्याजही जास्त जात नाही. यासाठी जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा तुम्ही बँकेसोबत बोलून कर्जाची पुनर्रचना करुन घ्यावी. शक्य असेल तितक्या कमी कालावधीचे लोन घेणे कधीही फायद्याचे असते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.