कोरोना काळात लॉकडाऊन पृथ्वीवर पण चंद्रावरसुद्धा दिसले परिणाम…शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा

Moon temperature dipped: पृथ्वीच्या किरणोत्सर्गातील बदल आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील बदल यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता आहे, असे या संशोधनातून दिसले आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन पृथ्वीवर पण चंद्रावरसुद्धा दिसले परिणाम...शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
Moon
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 4:07 PM

corona impact on moon: तीन, चार वर्षांपूर्वीचा कोरोना काळात पृथ्वीवर प्रथमच लॉकडाऊनचा प्रयोग राबवला गेला. या लॉकडाऊनमध्ये उद्योग, कारखाने बंद होते. त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीच्या तापमानात झाला होता. पृथ्वीवरील प्रदूषणात घट नोंदवली गेली होती. परंतु हा परिणाम फक्त पृथ्वीपुरता मर्यादीत नव्हता. त्याचा प्रभाव चंद्रापर्यंत दिसल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. भारतीय संशोधकांनी चंद्राचा अभ्यास केला आहे. त्यात 2020 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात कडक लॉकडाऊन पृथ्वीवर असताना चंद्राचे तापमानही सामान्यपेक्षा कमी झाल्याचे म्हटले आहे. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

काय म्हटले संशोधकांनी

भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे के दुर्गा प्रसाद आणि जी अंबिली यांनी म्हटले आहे की, आमच्या ग्रुपने अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. आणि हे एक वेगळे संशोधन आहे. 2017 ते 2023 या कालावधीत चंद्रावरील विविध ठिकाणच्या तापमानाचा तपशील गोळा केला. त्यात इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या वर्षातील तापमान सामान्यपेक्षा 8 ते 10 केल्विनने कमी असल्याचे आढळून आले. पृथ्वीवर लॉकडाऊन असल्यामुळे किरणोत्सर्ग कमी झाला. त्याचा परिणाम चंद्रावरही दिसून आला, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 2020 मध्ये चंद्रावरील तापमानात घट झाली होती. पुढील दोन वर्षात तापमानात पुन्हा वाढ झाली कारण पृथ्वीवर लॉकडाऊन नव्हते.

अभ्यासासाठी असा डेटा जमवाला

नासाच्या लूनर ऑर्बिटरकडून डेटा घेतल्यानंतर हा अभ्यास करण्यात आला. प्रसाद यांनी म्हटले की, या अभ्यासासाठी सात वर्षांचा डेटा घेण्यात आला. यापैकी तीन वर्षे 2020 पूर्वीची आणि तीन वर्षे नंतरची आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी झाल्याचे दिसले. यानंतर पृथ्वीच्या वातावरणातील किरणोत्सर्गामुळे चंद्राच्या तापमानावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

अधिक संशोधनाची गरज

चंद्र पृथ्वीच्या किरणोत्सर्गाचा एक ॲम्प्लीफायर म्हणून कार्य करतो. या संशोधनातून चंद्राच्या तापमानावर मानव कसा प्रभाव टाकू शकतो हे सिद्ध होत आहे. ते म्हणाले की, सौर क्रियाकलाप आणि हंगामी प्रवाह भिन्नतेमुळे चंद्राच्या तापमानावरही परिणाम होतो. पृथ्वीच्या किरणोत्सर्गातील बदल आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील बदल यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता आहे, असे या संशोधनातून दिसले आहे.

आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.