GK Quiz | संत्र्यांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते?
जगातील सर्वात लांब पुस्तक कोणते? भारतातील सर्वात पवित्र नदी कोणती? समुद्राखाली पहिली रेल्वे सेवा कोणी सुरू केली?
मुंबई: करिअरचा विचार केला तर सर्वात आधी अभ्यास केल्यानंतर चांगली नोकरी कशी मिळवायची म्हणजे आयुष्य सेट होईल असा विचार मनात येतो. आज आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी तुमचे जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काही प्रश्न सांगत आहोत. हे आपल्याला आपला जीके वाढविण्यास तसेच देश, जग आणि इतिहासाबद्दल माहिती मिळविण्यात मदत करतील. या प्रश्नांची उत्तरं येत असतील तर उत्तम, नसतील येत तर ही उत्तरं लक्षात ठेवा.
प्रश्न – भारतात सौरऊर्जेचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
उत्तर – भारतात सर्वाधिक सौर ऊर्जेचे उत्पादन राजस्थानमध्ये होते.
प्रश्न – माणसाने बनवलेले पहिले अवजार कोणते?
उत्तर – माणसाने बनवलेले पहिले अवजार म्हणजे कुऱ्हाड.
प्रश्न – समुद्राखाली पहिली रेल्वे सेवा कोणी सुरू केली?
तुर्कस्तानने इस्तंबूलच्या आशियाई आणि युरोपियन भागांना जोडणारी पहिली समुद्राखालील रेल्वे सेवा सुरू केली.
प्रश्न – संत्र्यांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर – संत्र्यांचे सर्वाधिक उत्पादन तेलंगणात होते.
प्रश्न – भारतातील सर्वात पवित्र नदी कोणती?
उत्तर – गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. हिमालयातून उगम पावणारी ही नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमार्गे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते.
प्रश्न – भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक उष्णता आहे?
उत्तर – राजस्थानमध्ये सर्वाधिक उष्णता आहे.
प्रश्न- देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मीठाचे उत्पादन होते?
उत्तर – गुजरात हे मीठाचे सर्वात मोठे उत्पादन करणारे राज्य आहे.
प्रश्न – महात्मा गांधींचा जन्म कोणत्या शहरात झाला?
उत्तर – महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे झाला.
प्रश्न – जगातील सर्वात लांब पुस्तक कोणते?
उत्तर – ‘ए ला रीचर्चे डु टेम्प्स पेर्डु’ (A la recherche du temps perdu) हे पुस्तक मार्सेल प्रोस्ट यांनी लिहिले होते. पुस्तकाच्या नावाचा अर्थ भूतकाळाचे स्मरण असा आहे आणि हे जगातील सर्वात लांब पुस्तक आहे.
प्रश्न – कोणत्या वनस्पतीमुळे साप येत नाहीत?
उत्तर – सर्पगंधा नावाची वनस्पती वनस्पती सापांची शत्रू मानली जाते आणि त्याच्या भोवती साप येत नाहीत. घराभोवती ही वनस्पती लावली तर साप कधीच येणार नाहीत आणि सर्पदंशाची भीतीही राहणार नाही. केवळ सापच नव्हे तर इतर विषारी जीवही या वनस्पतीमुळे घरात प्रवेश करत नाहीत.
प्रश्न – कागद तयार करताना कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते?
उत्तर – कागद तयार करताना बांबूच्या लाकडाचा वापर केला जातो.