Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या

चक्क एका भारतीय कंपनीने एके-47 ला अधिक अपग्रेड केले आहे.

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या
कशी आहे नवी रायफल?Image Credit source: The Print
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:49 PM

एके-47 हे नावदेखील काढल्यास दुश्‍मनांच्या मनात धडकी भरत असते. त्यात हे शस्त्र भारतीय सेनेच्या (Indian Army) हातात असल्यास भारतीय सिमेकडे नजर उठवून बघण्याचीही हिंमत शस्त्रूची होत नाही. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला अधिक बळ देण्याचे काम एके-47 असॉल्ट रायफलच्या (AK-47 assault rifle) माध्यमातून होत आहे. आता एका भारतीय कंपनीने या एके-47 ला अधिक अपग्रेड केले आहे. ज्यामुळे ही रायफल पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झाली आहे. शत्रूला धुळ चारण्यासाठी भारतीय सेनेच्या हातात ही रायफल आल्याने आपल्या शक्तीत अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये इस्रायलच्या एका कंपनीला मागे टाकत बेंगलुरुमधील एसएसएस डिफेंस या कंपनीने (SSS Défense Company) हा करार मिळवला आहे. याअंतर्गत कंपनीने एके सिरीजच्या रायफल्सना अपग्रेड करुन सेनेच्या हवाली केले आहे.

एका रिपोर्टनुसार, अपग्रेड झाल्यानंतर एके-47 अजून जास्त खतरनाक झाली आहे. या रायफलचा एक नवीन फोल्डेबल बट स्टॉक बनवण्यात आले आहे. ज्यामुळे सेनेचे जवान आता अजून चांगल्या पध्दतीने रायफलचा वापर करुन शकणार आहेत. या नवीन रायफलमध्ये डस्ट कव्हरलाही सहभागी करुन घेतले आहे. ज्याच्या मदतीने भारतीय जवानांना आपल्या लक्ष्यावर निशाना लावणे अधिक सोपे होणार आहे.

हे सर्व फिचर्स जुन्या एके-47 मध्ये नव्हते. रायफलच्या फ्रंट एंडमध्ये देखील बरेच बदल केले आहेत. यामुळेच ही रायफल पुर्वीपेक्षा अधिक खतरनाक बनली आहे. या रायफलला गरज पडल्यास चाकू लावूनही त्याचा वापर केला जाउ शकतो.

नवीन अपग्रेड किटमध्ये नवीन हँड गार्ड आणि व्हर्टीकल ग्रिप देण्यात आली आहे. यामुळे जवानांना एक चांगली फायरिंग पोझिशन मिळणार आहे. ‘द प्रिंट’ने रक्षा आणि सुरक्षा प्रतिष्ठानाच्या सूत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले, की एके-47 हे आपल्या विश्‍वसनियता आणि वापर करण्याच्या सोप्या व सरळ पध्दतींमुळे प्रसिध्द आहे. याला अपग्रेड केल्यामुळे भारतीय जवानांना एक चांगली ग्रीप मिळाली आहे.

एका रिपोर्टनुसार, नवीन एके-47 रायफलला संपूर्ण नवीन लूक देण्यात आला आहे. ही रायफल अपग्रेड करण्यासाठी आतापर्यंत इस्रायलच्या कंपन्यांनाच प्राधान्यक्रम दिला जात होता. परंतु आता भारतीय कंपनी एसएसएस डिफेंसने देखील या क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.