जानेवारी नव्हे ‘या’ महिन्यांपासून सुरू व्हायचं नवीन वर्ष; वर्षाला किती दिवस आणि किती महिने असायचे माहित्ये का?

या खगोल शास्त्रज्ञांनी त्यांना सूर्यमालेचं रहस्य सांगितलं. पृथ्वीला सूर्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस आणि सहा तास लागतात, असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं.

जानेवारी नव्हे 'या' महिन्यांपासून सुरू व्हायचं नवीन वर्ष; वर्षाला किती दिवस आणि किती महिने असायचे माहित्ये का?
जानेवारी नव्हे 'या' महिन्यांपासून सुरू व्हायचं नवीन वर्षImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 12:11 PM

नवी दिल्ली: सरत्या वर्षाला निरोप देत आपण नवीन वर्षाचं स्वागत केलं. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जातो अन् 1 जानेवारी रोजी नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. संपूर्ण जगाचं नव वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होतं. त्यामुळे जगभरात दरवर्षी त्यानिमित्ताने जल्लोष केला जातो. पण पूर्वी जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होत नव्हतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी जानेवारी हा महिनाच कॅलेंडरमध्ये नव्हता. तसेच वर्षाचे दिवसही 365 नव्हते. आणि वर्षाला बारा महिनेही नव्हते. या आणि अशा रोचक गोष्टींवर टाकलेला हा प्रकाश.

पूर्वी जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरुवात होत नव्हती. दुसऱ्याच महिन्यापासून नव्या वर्षाची सुरुवात होत होती. तसेच नव्या वर्षाची तारीख ही 1 तारीख नसायची. ती तारीख वेगळीच होती. अनेक वर्षानंतर कॅलेंडरमध्ये बदल झाला. त्यानंतर 1 जानेवारीपासून नव वर्ष साजरं करण्यात येऊ लागलं.

हे सुद्धा वाचा

नवीन वर्ष साजरं करण्याची सुरुवात 15 ऑक्टोबर 1585 पासून सुरू झाली. त्याआधी नवीन वर्षाची सुरुवात मार्चपासून व्हायची. एका माहितीनुसार, रोमचा राजा नूमा पोंपिलसने नंतर रोमन कॅलेंडरमध्ये आवश्यक ते बदल केले. त्यानंतर कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्याची भर पडली आणि जानेवारीपासून नवीन वर्ष साजरं करण्याचा पायंडा पडला.

पूर्वीच्या कॅलेंडरमध्ये फक्त दहाच महिने होते. मार्चपासून डिसेंबरपर्यंत हे महिने होते. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचा समावेश नव्हता. किंबहूना हे दोन महिनेच अस्तित्वात नव्हते. त्याकाळी 310 दिवसाचं वर्ष असायचं. मात्र, जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरुवात रोमन सम्राट जूलियस सीजरने केली.

काही खगोल शास्त्रज्ञांची जूलियस सीजर यांनी भेट घेतली होती. त्यावेळी या खगोल शास्त्रज्ञांनी त्यांना सूर्यमालेचं रहस्य सांगितलं. पृथ्वीला सूर्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी 365 दिवस आणि सहा तास लागतात, असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं.

त्यामुळे दहा महिन्यांऐवजी 12 महिने करणअयात आले. तसेच वर्षाचे दिवस वाढवून 365 करण्यात आले. उरलेल्या 6 तासांना चार वर्षाला जोडून हे दिवस 366 करण्यात आले. त्याला लीप इयर म्हटलं जातं.

1582 मध्ये पोप ग्रेगरी यांना ज्यूलियस कॅलेंडरमधील लीप इयरमध्ये गडबड असल्याची माहिती मिळाली. तेव्हाचे धर्म गुरु सेंट बीड यांनी सांगितलं की, एक वर्ष 365 दिवस 6 तासे नाही तर 365 दिवस 5 तास आणि 46 सेंकदाचा आहे.

हे लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा कॅलेंडरमध्ये बदल केला गेला. रोमन कॅलेंडरमध्ये हा बदल करून नवीन कॅलेंडर तयार केलं गेलं आणि 1 जानेवारीपासून नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.