No Smoking Day : धूम्रपान सोडल्याने वजन वाढतं, नैराश्य येतं? जाणून घ्या काय खरं? काय खोटं?

No Smoking day : आज नो-स्‍मोकिंग डे आहे. प्रत्येक वर्षी मार्चच्या दुसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे लोकांच्या मनामध्ये धूम्रपानाविषयी जनजागृती करणे तसेच याप्रसंगी धूम्रपान सोडल्यानंतर अनेक अशा काही अफवा पसरवल्या जातात ज्या अफवांबद्दल लोकांच्या मनात जनजागृती करणे हा एक हेतू असतो.

No Smoking Day : धूम्रपान सोडल्याने वजन वाढतं, नैराश्य येतं? जाणून घ्या काय खरं? काय खोटं?
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:00 PM

मुंबई : आज नो स्मोकिंग डे (No Smoking Day) आहे. प्रत्येक वर्षी मार्चच्या दुसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा केला जातो. हल्ली आपण आजूबाजूला पाहतो की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सगळेजण सिगारेट ओढत असतात. सिगारेट ओढणे ही अत्यंत घाणेरडी सवय आहे. बहुतेक वेळा मित्रमैत्रिणींच्या सोबत टाईमपास म्हणून सवय लागून जाते परंतु या सवयीचे रूपांतर नंतर व्यसनांमध्ये होते. जर आपल्याला सिगारेटचे व्यसन (habbit) लागले तर ही सवय लवकर सुटत नाही. ही सवय सोडण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. बाजारामध्ये अशी काही उत्पादने आहेत ज्या उत्पादनांच्या सहाय्याने आपण सिगारेटची सवय सोडू शकतो तसेच बाजारामध्ये निकोटीन नावाचा पदार्थ आपल्याला उपलब्ध होतो. या पदार्थाबद्दल अनेकांना माहिती आहेच. या पदार्थाच्या वापराने अनेकदा सिगारेट सहजच सोडता येते परंतु आपल्या समाजामध्ये आणि आजूबाजूला सिगारेट ओढणे हा विषय व सिगारेट सोडल्यानंतर वेगवेगळ्या अफवा देखील पसरवल्या जातात. या अफवांमुळे व्यक्ती सिगारेट सोडण्याऐवजी सिगारेटच्या अधिक आहारी जातो. सिगारेट, बिडी सोडल्यानंतर वजन कमी होते किंवा चालण्या फिरण्यास आपल्याला त्रास होतो. व्यक्ती ताण तणावामध्ये जातो? त्याचबरोबर वारंवार खोकला उद्भवतो? अशा अनेक अफवा (Rumors) धूम्रपान सोडण्याबाबत लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेले असतात. परंतु यामागील सत्य तर वेगळे काहीतरी आहे.

धूम्रपानाशी संबंधित असलेल्या काही अफवा आणि त्यामागील सत्यता

अफवा : स्मोकिंग सोडल्यानंतर वजन वाढून चालण्या-फिरण्यास त्रास होतो?

सत्य : ही सर्वात मोठी अफवा आहे. या विधानावर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे असे म्हणणे आहे की, धूम्रपान सोडल्यानंतर काही प्रमाणात आपले वजन वाढते परंतु या वजनाला नियंत्रित देखील करता येते. आपले वजन इतके ही वाढत नाही की व्यक्तीला चालण्या फिरण्यास त्रास होऊ शकतो. एव्हरीडे हेअर रिपोर्टनुसार धूम्रपान सोडल्यानंतर जे वजन वाढते ते स्मोकिंग च्या तुलनेत वाईट नसते.

अफवा : धूम्रपान सोडल्यानंतर व्यक्ती दीर्घ कालावधीसाठी ताण-तणाव मध्ये जातो?

सत्य : सायकोसोशल ऑन्‍कोलॉजीचे डायरेक्‍टर रॉबर्ट गार्डनर यांचे म्हणणे आहे की, काही लोकांना वारंवार सिगारेट, बिडी ओढण्याची सवय लागून जाते. या सवयीचे रुपांतर कालांतराने व्यसनामध्ये होते म्हणूनच बिडी-सिगारेट सोडल्यानंतर अनेकदा व्यक्तींचा मूड स्विंग होतो यामुळे ताण तणावाची परिस्थिती निर्माण होते. जर एखादी व्यक्ती आधीपासूनच तणावामध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये व्यक्ती सिगारेट सोडत असेल तर तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. या परिस्थितीवर योग्य तो उपचार देखील करता येतो. प्रत्येक घटनांमध्ये ताणतणावच व्यक्तीला होईल अशी शक्यता उद्भवत नसते.

अफवा : धूम्रपान सोडल्यानंतर सातत्याने खोकल्याची समस्या उद्भवते?

सत्य : तज्ज्ञ मंडळींच्या मते हीसुद्धा लोकांमध्ये एक अफवा पसरलेली आहे. त्यांच्या मते जर बिडी सिगारेट सोडली तर त्यांना सातत्याने खोकल्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल परंतु या अश्या प्रकारच्या अफवांमध्ये कोणती ही सत्यता व तथ्ये नाही.

अफवा : सिगारेट सोडून ई – सिगारेट पिणे सुरक्षित आहे?

सत्य : तजज्ञ मंडळीच्या मते, लोकांना हेच वाटते परंतु या अफवांमध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नाही. अमेरिकन डॉक्टरांच्या मते ई-सिगारेट मध्ये असे काही केमिकल आणि हेवी मेटल असतात जे तुमच्या फुप्फुसांपर्यंत पोहोचतात आणि तुमच्या फुप्फुसांना डॅमेज करतात. म्हणूनच सिगारेट सोडल्यानंतर ई-सिगारेटचा पर्याय सांगणे चुकीचे आहे.

अफवा : वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर धूम्रपानाच्या धोक्यापासून वाचवू शकतो?

सत्य : बाजारामध्ये वेगळ्या प्रकारचे सिगारेट उपलब्ध असतात. काही लाईट सिगारेट सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात. अनेकदा दावा केला जातो की, यामध्ये फिल्टर पेपर आणि तंबाखूचा वापर केला गेलेला असतो जो थेट फुप्फुसांना हानी पोहोचवत नाही. अशा प्रकारच्या लाईट सिगारेटवर रिसर्च सुद्धा केले गेले आहेत. केले गेलेल्या रिसर्च नुसार काही निष्कर्ष समोर आले ते म्हणजे की, लाईट सिगारेट मानवी शरीरासाठी निरोगी नाही व ई-सिगारेट कोणत्याही प्रकारचा धोका कमी करत नाही म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.

इतर बातम्या

असे युद्ध ज्यात 5 कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले, जाणून थक्क व्हाल युद्धामागील रक्तरंजित कहाणी

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !

हक्काच्या कारमध्ये बसून दारू पिणं का ठरतं बेकायदेशीर? ‘हे’ आहे यामागचं नेमकं कारण!

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....