21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गुजरातमध्ये भूकंप झाला होता, ज्यात हजारो ठार झाले! 26 जानेवारीच्या नोंदी
26 जानेवारीला भारतीय संविधान लागू करण्यात आला होता. देशाला 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र मिळाला. पण 26 जानेवारी 1950 मध्ये भारतला लोकशाही प्रजासत्ताकची घोषित करण्यात आलं.
26 जानेवारीला 2001 ला देश आपला 52 प्रजासत्ताक दिन साजरा करत होता. अशातच गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भूजमध्ये (Bhuj, Gujrat) सकाळी 8.45 वाजता भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपामध्ये जवळपास 20 हजार लोकांना जीव गेला होता. तर हजारो लोकं जखमी झाले होते. या भूकंपाची तीव्रता येवढी होती की भूकंपाचे झटके अहमदाबाद आणि इतर शहरांना पण बसले. पण या भूकंपात भूजचं सर्वात मोठं नुकसान झालं आणि लाखो लोक बेघर झाले. भूकंपाचा (Gujrat Earth Quake) प्रभाव जवळपास 8 हजार गावात पाहिला मिळाला. आज देश प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. मात्र भूज भूकंपाची आठवण झाल्यावर मन सुन्न होऊन जातं. पण भारत हा वैविध्यपूर्ण, धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. या देशात रोज कुठला ना कुठला सण साजरा केला जातो. प्रत्येक धर्माचा असा एक खास सण असतो. आणि परंपरेने भारतात सगळ्या धर्माचे सण साजरे केले जातात. पण 26 जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आदराचा आणि आपुलकीचा सण आहे. हा देशाचा राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक भारतीय अभिमानाने साजरा करतो. यादिवशी प्रत्येक भारतीय एकाच रंगात रंगले असतात.
26 जानेवारीला भारतीय संविधान लागू करण्यात आला होता. देशाला 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांकडून स्वतंत्र मिळाला.पण 26 जानेवारी 1950 मध्ये भारतला लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं. तर राजधानी दिल्लीत राजपथावर 26 जानेवारीला भारतीय संस्कृती आणि शक्तीचं प्रदर्शन केलं जातं. त्याशिवाय 26 जानेवारी म्हटलं की अजून कुठल्या घटना आठवतात त्यावर एक नजर टाकुयात
1. 1556 – मुघल बादशाह हुमायू यांची पायांवरून पडून मृत्यू
2. 1930 – ब्रिटीश राजवटीत भारताने पहिला स्वराज दिन साजरा केला
3. 1931 – ‘सविनय कायदेभंग चळवळ’ दरम्यान ब्रिटीश सरकारसोबत वाटाघाटी करण्यासाठी महात्मा गांधींना सोडण्यात आले.
4. 1950 – स्वतंत्र भारतात भारतीय संविधान लागू करण्यात आलं. आणि लोकशाही प्रजासत्ताकची घोषित करण्यात आली. आणि तेव्हापासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
5. 1950 – सी. गोपालाचारी यांनी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरलचे पद सोडले. तर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.
6. 1950 – अशोक स्तंभाला राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता
7. 1950 – 1937 मध्ये स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाला भारताचे सर्वोच्च न्यायालय म्हणून घोषणा करण्यात आली.
8. 1957 – जम्मू आणि काश्मीरची भारतीय बाजूला औपचारिकपणे भारताचा भाग म्हणून मान्यता मिळाली.
9. 1963 – मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं.
10. 1972 – राष्ट्रीय स्मारक अमर जवान ज्योतीचे दिल्लीच्या इंडिया गेटवर अनावरण.
11. 1981 – वायुदूत विमान कंपनीला सुरुवात.
12. 1982 – भारतीय पर्यटकांना ट्रेनमधून शाही आणि सुखद अनुभव मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन सुरु केली.
13. 2001 – गुजरातमधील भुजमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.
14. 2008 – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी परेडची सलामी स्विकारली. तर एन.आर नारायण मूर्ती यांना फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ आवर’ बहाल करण्यात आला.
15. 2010 – भारताने मीरपूरमध्ये दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर 10 गडी राखून मालिका 2-0 ने जिंकली.