PM Security Breach | काय असते एसपीजीची Blue Book? जिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं गृहमंत्रालय म्हणतंय!

पंतप्रधानांची सुरक्षा सध्या चर्चेत आहे, पंजाबमध्ये पीएम नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासोबत झालेल्या घटनेनंतर ब्लू बुकच्या नियमांचे पालन न झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आपल्याला हे जाणून घेणं गरजेचे आहे की नेमकं काय असते हे ब्लू बुक..

PM Security Breach | काय असते एसपीजीची Blue Book? जिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं गृहमंत्रालय म्हणतंय!
PM MODI IN PUNJAB
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 3:01 PM

ब्लू बुक (Blue Book) हे एकप्रकारचे गाईडलाइन्स (Guidelines) यादी आहे, ज्यामध्ये कोणत्याही वीवीआईपीच्या (VVIP) सुरक्षेला घेऊन फॉलो करण्यात येणाऱ्या नियमांची (Rules) माहिती लिहिलेली असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते, जिथे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यामुळे त्यांना १५- २० मिनिटे एका जागी अडकून राहावे लागले. याला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा समजला जात आहे, आणि यावरून देशातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत यानंतर गृहमंत्रालयाने पंजाब पोलिसांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे तसेच पंजाब पोलिसांनी ब्लू बुकच्या नियमांचे पालन न केल्याचे देखील गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

अशातच आता अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, हे ब्लू बुक नेमके काय आहे. ज्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हे ब्लू बुक काय असते आणि त्यात काय लिहिलेले असते. ज्याचे पालन पंजाब पोलिसांनी केले नाही..

ब्लू बुक म्हणजे नेमकं काय?

ब्लू बुक एक प्रकारची गाईडलाईनचा समुह आहे, ज्यामध्ये वीवीआईपीच्या (VVIP) सुरक्षेसंबंधी फॉलो केल्या जाणाऱ्या नियमांसंबंधी माहिती लिहिलेली असते. आता पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे (SPG) आहे आणि ब्लू बुकमध्ये दिल्यानुसार पीएम सुरक्षेची काळजी घेतली जाते. यामध्ये पीएम यांच्या सुरक्षेमध्ये फॉलो केली जाणारी गाईडलाईनची संपूर्ण माहिती लिहिलेली असते, त्यानुसार प्रोटोकॉल ठरवले जातात.

उदाहरणार्थ, समजा पीएम एखाद्या ठिकाणी सभेसाठी जात आहेत, तर तिथे सुरक्षाव्यवस्था अशी असेल, पीएम रस्तेमार्गाने जाणार असतील तर त्या मार्गाची व्यवस्था अशी असेल, जर हवाईमार्गे जाणार असतील तर कोणकोणत्या नियमांचे पालन केले जाईल, याशिवाय एखाद्या इमारतीत जात असतील तर तेथील सुरक्षा कशी असेल, या सर्व गोष्टींची माहिती त्या बुकमध्ये लिहिलेली असते. तसेच त्या बुकमध्ये जवानांची संख्या आणि इतर प्रोटोकॉल यांची माहिती सुध्दा लिहिलेली असते. म्हणून हे ते बुक आहे ज्यामध्ये वीवीआयपी (VVIP) सुरक्षेसंबंधी असलेली सर्व माहिती लिहिलेली असते.

फक्त एसपीजीला नाही, तर राज्य पोलिसांना देखील याच्या माहितीनुसार व्यवस्था करावी लागते. आणि गाईडलाईननुसार पीएम (PM) यांचा कार्यक्रम ठरविला जातो. याकारणाने पंजाब पोलिसांवर याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यलो बुक (Yellow Book) सुध्दा असते –

ब्लू बुक (Blue Book) ऐवजी एक यलो बुक (Yellow Book) सुध्दा असते, ज्यामध्ये वीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेसंबंधी माहिती दिलेली असते. जसे की खासदार (MP) आणि मंत्र्यांना (Minister) कोणत्या प्रकारची सुरक्षा दिली जाईल आणि त्यांच्या सुरक्षेत काय आयोजन केले जाणार आहेत याची माहिती यलो बुक (Yellow Book) मध्ये असते.

पंजाब पोलिसांनी कोणकोणत्या नियमांचे पालन केले नाही याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लू बुक नुसार, स्टेट पोलिसांना कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत, ज्यापद्धतीची पंजाबमध्ये बघायला मिळाली, त्यावेळी एका तात्काळ स्वरूपाच्या मार्गाची व्यवस्था पहिल्यापासून करून ठेवावी लागते. त्यांनी सांगितले की, इंटेलिजेंस ब्यूरोचे अधिकारी सतत पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते आणि त्यांना आंदोनकर्त्यांबद्दल माहिती देण्यात आली होती. याबाबत पंजाब पोलिसांनी देखील सुरक्षेचे संपूर्ण आश्वासन दिले होते.

त्यांनी सांगितलं की, एसपीजीचे जवान पीएम यांच्या सभोवताली असतात मात्र बाकी सुरक्षेची जबाबदारी हि राज्य सरकारच्या हातात असते. अशा परस्थितीमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती राज्याची पोलीस यंत्रणा एसपीजीना देत असते आणि त्याच पद्धतीने काही बदल केले जातात.

इतर बातम्या –

Video | ‘हा तर निर्लज्जतेचा कळस’ फडणवीसांची टीका, ‘मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’

PM Security Breach: पंजाब पोलिसांकडून गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बुक नियमांकडे कानाडोळा; केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवलं बोट

PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.