Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये किसान विकास पत्राचाही समावेश आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात

Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:52 PM

येत्या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणूक योजनांमध्ये  तुम्ही गुंतवणूक करू शकता. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Small Savings Scheme) तुम्हाला हमखास परताव्याची संधी मिळते. तसेच या गुंतवणुकीवर कसली ही जोखीम नाही. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी (Return) या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. बँक दिवाळखोरीत गेली तर ग्राहकाला किती ही गुंतवणूक केली असली तरी केवळ 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. पोस्ट खात्यात दिवाळखोरीचा कोणताच विषय नसल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. किसान विकास पत्र योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत वार्षिक 6.9 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची रक्कम 14 महिन्यांत म्हणजे 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतील.

गुंतवणुकीची रक्कम

किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्हाला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

खाते कोण उघडू शकेल?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक प्रौढ आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.

कालावधी

या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करणे

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

Black pepper काळ्या मिऱ्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

Viral Video : सिंहाकडून हरणाची शिकार, नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “सर्वात चपळ शिकारी!” parineeti chopra: शेतात पिकवलेल्या भाज्यांचे फोटो टाकत परिणीता चोप्राने केले वडिलांचे कौतुक

कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट.
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.