Republic Day : 26 जानेवारीलाच आपले संविधान का लागू केले होते? जाणून घ्या इतिहास

संविधानाच्या अंमलबजावणीला 26 जानेवारीचाच दिवस निवडण्यामागेही काही पार्श्वभूमी आहे. 26 जानेवारीची निवड केली गेली. कारण 1930 मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा केली.

Republic Day : 26 जानेवारीलाच आपले संविधान का लागू केले होते? जाणून घ्या इतिहास
Republic Day
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

नवी दिल्ली : आपण भारतीय दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन(Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा करतो. संपूर्ण देशभर देशभक्तीचे वातावरण संचारलेले असते. यंदाही तोच उत्साह असेल. गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे संकट उभे आहे. मात्र या राष्ट्रीय सणातील आपला उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. यंदा आपण 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. 26 जानेवारी रोजी आपला भारत देश एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला. 1974 मध्ये भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना(Constitution) लागू झाली. हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आलो आहोत. (Republic Day : Why was your constitution implemented only on 26th January, Know the history)

संविधान अंमलात आल्यानंतर भारत स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक बनला. आपण भारतीय हा दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा करतो. धार्मिक भेदभाव न ठेवता राष्ट्रीय सण म्हणून आपण या दिवशी एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. सर्वांचे देशावरील निस्सिम प्रेम या राष्ट्रीय सणाला दिसून येते. देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये तसेच इतरही सार्वजनिक ठिकाणी आपल्या देशाचा तिरंगा फडकवला जातो. दरवर्षी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथावर एक भव्य परेडदेखील आयोजित केली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल आदी विविध रेजिमेंट्स भाग घेतात.

संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारीलाच का झाली?

संविधानाच्या अंमलबजावणीला 26 जानेवारीचाच दिवस निवडण्यामागेही काही पार्श्वभूमी आहे. 26 जानेवारीची निवड केली गेली. कारण 1930 मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा केली. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटीश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा, ज्यानंतर भारताला ब्रिटीश साम्राज्याखालील स्वायत्त राज्याचा दर्जा मिळताच भारत स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र घोषित करेल.

स्वातंत्र्यानंतर संविधान सभेचे कार्य सुरू

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सभेची घोषणा झाली. या संविधान सभेचे 9 डिसेंबर 1947 रोजी कार्य सुरू झाले. याच संविधान सभेच्या माध्यमातून 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांत भारतीय संविधान तयार करण्यात आले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे भारताचे संविधान सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला भारतीय संविधानाचा मसुदा

भारतीय संविधानाचा मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला होता. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हाताने लिहिलेल्या कायद्याच्या दोन प्रतींवर स्वाक्षरी केली. त्यानंतर दोन दिवसांनी 26 जानेवारी रोजी तो कायदा देशात लागू करण्यात आला. 26 जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी याच दिवशी भारताला लोकशाही ओळख देण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर भारताला एक लोकशाही देश म्हणून ओळख मिळाली. राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर आधीपासून अस्तित्वात असलेला ब्रिटीशांचा भारत सरकार कायदा (1935) भारतीय राज्यघटनेने भारताच्या शासनाचा दस्तऐवज म्हणून बदलला. म्हणूनच आपण भारतीय दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. (Republic Day : Why was your constitution implemented only on 26th January, Know the history)

इतर बातम्या

कोणाला दिला जातो शौर्य पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार कधीपासून प्रदान करण्यात येतोय?…तर परमवीर आणि महावीर चक्र पुरस्कारबद्दलही घ्या जाणून

गाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे? जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.