‘या’ दहा देशांच्या चलनाची किंमत भारतापेक्षा कमी, एका रुपयात करु शकता भरपूर खरेदी
Tourism | जगात असे अनेक देश आहेत की, ज्या राष्ट्रांच्या चलनाची किंमत भारतीय रुपयापेक्षाही कमी आहे. त्यामुळे अशा देशांमधील पर्यटन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
नवी दिल्ली: पर्यटनाची आवड असलेले अनेक भारतीय दरवर्षी वेगवेगळ्या देशांना भेटी देत असतात. मात्र, अमेरिका, इंग्लंड यासारख्या विकसित देशांमधील पर्यटन अत्यंत महागडे असते. परंतु, जगात असे अनेक देश आहेत की, ज्या राष्ट्रांच्या चलनाची किंमत भारतीय रुपयापेक्षाही कमी आहे. त्यामुळे अशा देशांमधील पर्यटन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
1.व्हिएतनाम हा देश नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. भारत आणि व्हिएतनाममधील द्विपक्षीय संबंधही चांगले आहेत. डोंग हे व्हिएतनामचे राष्ट्रीय चलन आहे. भारताचा एक रुपया हा 314.42 डोंगच्या बरोबरीचा आहे
2. हिंद आणि प्रशांत महासागरामधील प्रदेशात असलेला इंडोनेशिया देशही पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. भारताचा एक रुपया हा इंडोनेशियाच्या 194.40 IDR च्या बरोबरीचा आहे.
3. कंबोडियातील 55.86 रियाल हे भारतातील एका रुपयाच्या बरोबरीचे आहेत. त्यामुळे याठिकाणी तुम्ही कमी पैशात पर्यटन करु शकता. कंबोडियातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध मंदिरे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
4. पॅराग्वेचे राष्ट्रीय चलन असलेल्या ग्वारानीची किंमतही भारतीय रुपयापेक्षा कमी आहे. एका भारतीय रुपयाच्या मोबदल्यात 91.72 ग्वारानी मोजावे लागतात. हा देश नैसर्गिक सौदर्यांने नटलेला आहे.
5. कोस्टा रिकातील पर्यटनही भारतीयांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. एका भारतीय रुपयासाठी 8.48 कोस्टारिकन कोलोन मोजावे लागतात. हा देश पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.
आणखी कोणत्या देशांमध्ये स्वस्तात पर्यटन करु शकता?
मंगोलियात भारताचा एक रुपया 39.10 मंगोलियन तुगरिकच्या बरोबरीचा आहे. हंगेरीचे 3.89 फॉरेंट हंगरी भारतीय रुपयाच्या बरोबरीचे आहेत. तर श्रीलंकन आणि भारतीय रुपयाच्या विनिमय दरात 2.72 रुपयांची तफावत आहे. भारतीय रुपयाची किंमत श्रीलंकन चलनाच्या तुलनेत जास्त आहे. तर पाकिस्तानी रुपयाची किंमतही भारतीय रुपयापेक्षा 2.13 रुपयांनी कमी आहे. वन्यजीव पाहण्याची आवड असलेले लोक झिम्बाम्वेत जाऊ शकतात. 4.95 झिम्बाम्ब्वे डॉलर्स एक रुपयाच्या बरोबरीचे आहेत.