इंदिरा गांधी यांनी सैन्याला रोखले नसते तर आज आज लाहौर भारतात असते

पाकिस्तानचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश निर्माण करण्याचे श्रेय इंदिरा गांधी यांना जाते. १९७१ च्या युद्धातील विजयादरम्यान इंदिरा गांधी यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना भारताने लाहौर काबीज करावे अशी इच्छा होती, परंतु इंदिरा गांधी यांनी तसे करण्यापासून सैनिकांना रोखले होते.

इंदिरा गांधी यांनी सैन्याला रोखले नसते तर आज आज लाहौर भारतात असते
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 6:50 PM

बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे काही महिन्यांपूर्वीच शेख हसीना यांचं सरकार पाडलं. त्यानंतर हिंदू आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु झाले आहेत. बांगलादेश हा स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणण्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मोठी भूमिका राहिली आहे. 1972 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. तेव्हा लाहोरचे भारतात विलीनीकरण होणार होते. पण यापासून इंदिरा गांधी यांना माघार घेतली होती. कारण भारतीय सैन्याने लाहोर काबीज करण्यापर्यंत मजल मारली होती. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनाही असे वाटत होते की आपण लाहोर ताब्यात घ्यावे. पण पण इंदिरा गांधी यांनी त्याला विरोध केला. त्यांनी युद्धविराम जाहीर करुन टाकला. इंदिरा गांधी यांचे सहाय्यक आणि काँग्रेस नेते यांनी याबाबत माहिती दिली.

31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. डॉ. रफिक झकेरिया यांनी त्यांच्याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. झकेरिया हे प्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि काँग्रेसचे खासदार होते. पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख याह्या खान यांनी झुल्फिकार अली भुट्टो यांच्यासोबत पूर्व पाकिस्तानमध्ये कसे अत्याचार केले याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर लाखो लोकं आपला जीव वाचवण्यासाठी भारतात आले होते. झकेरिया यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत अनेक समस्या असताना देखील इंदिरा गांधी यांच्यापुढे मोठं आव्हान तयार झाले होते. कारण पूर्व पाकिस्तानमधील 10 दशलक्षाहून अधिक निर्वासितांना भारतात यायचे होते. ज्यात बहुतेक लोकं हे हिंदू होते. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर ही मोठा परिणाम झाला असता.

इंदिरा गांधी यांना पश्चिम पाकिस्तानला खाली पडू द्यायचे नव्हते. इंदिरा गांधी यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना विजयी भारतीय सैन्याने लाहोर ताब्यात घेण्याची इच्छा होती. पण तरी देखील त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि युद्धबंदीचे घोषणा केली.

रफिक झकारिया पुढे लिहितात की, ‘लष्करी हुकूमशहा याह्या खान याने भुट्टोच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमध्ये दहशतीचे राज्य स्थापन केले. ज्याच्या विरोधात शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. हे बंड दडपण्यासाठी याह्याने बंगाली लोकांविरुद्ध नरसंहार केला. तसेच भारतावर देखील हल्ले केले. त्यानंतर मग पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली.

झकेरिया यांनी लेखात पुढे लिहिले की, इंदिरा ‘गांधी यांना पश्चिम पाकिस्तानचा पराभव करू द्यायचा नव्हता आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना लाहोर काबीज करण्याची इच्छा होती पण इंदिरा गांधी यांनी यासाठी परवानगी नाही दिली.

1971 च्या भारत-पाक युद्धात अमेरिका आणि चीनने भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. पण इंदिरा गांधी या डगमगल्या नाहीत. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. झकारिया यांनी सांगितले की, ‘युद्धादरम्यान अमेरिका आणि चीन या दोघांनीही भारताला बदला घेण्याची धमकी दिली होती.

Non Stop LIVE Update
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, काय कारण?.
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्....
भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस मैदानात, मॅरेथॉन बैठका अन्.....
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'
शायना यांच्या आरोपानंतर दादा म्हणाले, 'माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..'.
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार
अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार.
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
पंचवटी एक्सप्रेसचा 49वा वाढदिवस, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन.
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'
सरवणकरांची माघार नाहीच, 'ठासून सांगतो...विधानसभा लढणार आणि जिंकणार'.
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?
शायना एनसींना माल संबोधल आता स्पष्टीकरण दिल, काय म्हणाले अरविंद सावंत?.
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.