कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी

गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या वैभवाची कहाणी खूप अद्भुत आहे, या मंदिरावर अनेकदा आक्रमणे झाली आणि अनेकदा हे मंदिर उध्वस्त करण्यात आले, मात्र आजही हे मंदिर तितकेच दिमाखात उभे आहे.

कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी
सोमनाथ मंदिर
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:36 PM

सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले मंदिर आहे. सोमनाथ मंदिराची (Somnath Temple) जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा एका गोष्टीची नेहमीच चर्चा होत असते. ती म्हणजे अनेकदा हे मंदिर आक्रमण करून लुटण्यात आले तरी सुद्धा आजच्या घडीला या मंदिराचे वैभव कायम आहे. तसे पाहिले तर मंदिरावर (Somnath Temple History) आक्रमणाला घेवून अनेक रिपोर्ट आणि तथ्य आहेत, असे सांगितले जाते की सोमनाथ मंदिराला 17 वेळा उध्वस्त करण्यात आहे आणि प्रत्येकवेळी याचे पुनर्निर्माण करण्यात आले. आज सुद्धा या मंदिराची चर्चा होत आहे कारण आजच्याच दिवशी 1026 साली सुल्तान महमूद गजनवी (Mahmood Ghaznavi) ने सोमनाथ मंदिर लुटून ते नष्ट केले होते.

अशातच आज या मंदिराची कहाणी पुन्हा आठवली जात आहे, या निमित्ताने आम्ही या मंदिराच्या वैभवाची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. हे सोमनाथ मंदिर कोणी बनवले होते, यातून तुम्हाला समजेल की कितीदा सोमनाथ मंदिराने हल्ले पचवले आणि पुन्हा नव्याने ते उभे राहिले. चला तर मग जाणून घेऊया सोमनाथ मंदिराशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी.

मंदिराचे असलेले पौराणिक महत्त्व

12 ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिर हे प्रथम ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत, शिवपुराण सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये असल्याचे आढळते. एका सरकारी वेबसाईटवर या मंदिरासंबंधी देण्यात आलेल्या माहितीत असा उल्लेख आहे, शिवपुराण आणि नंदी उपपुराणात भगवान शिवांनी सांगितले आहे की मी सर्वत्र विशेषतः ज्योतिर्लिंगाच्या सर्व स्थानांवर उपस्थित राहील. सोमनाथ याच पवित्र स्थानांपैकी एक आहे..

मंदिराचा इतिहास

एका रिपोर्ट नुसार असे मानले जाते की, समुद्र किनारी असलेल्या या मंदिराचे चार चरणात म्हणजेच भगवान सोम ने स्वर्ण, रविने चांदी, भगवान श्रीकृष्णने चंदन आणि राजा भीमदेवने दगडांपासून तयार केले आहे. ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे ही माहिती मिळते की, 11 व्या शतकापासून ते 18 व्या शतकापर्यंत अनेक मुस्लिम आक्रमकांनी अनेकदा हल्ले केले. मात्र अनेकदा लोकांच्या पुनर्निर्माणच्या उत्साहामुळे हे मंदिर पुन्हा उभारण्यात आले.

बीबीसीच्या एका रिपोर्ट नुसार, गुजरातच्या वेरावल बंदरगाह येथे स्थित या मंदिराचे अरब यात्रेकरू अल बरूनीने त्याच्या यात्रा वृत्तांतामध्ये  याचा उल्लेख केला आहे. याने प्रभावीत होवून महमूद गजनवीने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. यानंतर गुजरातचे राजा भीम आणि मालवाचे राजा भोज यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. वर्ष 1297 मध्ये दिल्ली स्वारांनी गुजरातवर कब्जा केला आणि हे मंदिर उध्वस्त केले. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण आणि विनाशाचे सत्र सुरूच होते.

सोमनाथमध्ये दुसरे शिव मंदिर वल्लभीचे यादव राजांनी 649  मध्ये तयार केले. याशिवाय गुर्जर प्रतीहार वंशाचे राजा नागभट्ट द्वितीय, चालुक्य राजा मुलराज, राजा कुमारपाल, सौराष्ट्रचे राजा महीपाल यांसारख्या राजांनी याचे अनेकदा निर्माण केले तसेच गजनवी शिवाय सिंधचे गव्हर्नर अल – जुनैद, अलाउद्दीन खिलजी, औरंगजेब यांनी उध्वस्त केले होते. इतिहासकारांच्या माहितीनुसार सोमनाथ मंदिर हे तब्बल 17 वेळा नष्ट करण्यात आले होते आणि प्रत्येक वेळी याचे पुनर्निर्माण केले गेले.

आताचे मंदिर कोणी निर्माण केले?

आता जे मंदिर उभे आहे, त्याला भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 नंतर बनवले होते आणि पहील्यांना 1995 साली भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी राष्ट्राला समर्पित केले. या मंदिराचा प्रस्ताव घेऊन पटेल महात्मा गांधी यांच्याकडे गेले होते. या प्रस्तावाचे कौतुक करत गांधींनी जनतेकडून पैसे गोळा करण्याचा पर्याय सुचवला. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिराच्या पुनर्निर्माणचे काम एम मुंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णंत्वास आले. मुंशी त्यावेळी भारत सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते. या मंदिराचे निर्माण कैलास महामेरु प्रसाद शैलीनुसार केले गेले. या मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप आहेत. मंदिरावर असलेला कळस 10 किलो वजनाचा आहे आणि ध्वज दंड 27 फूट उंच असून 10 फूट परिघाचा आहे.

संबंधित बातम्या

खूपच भारी! 75 कोटींची ‘फेरारी ऑफ द सी’ घेतली, तर घर घ्यायची गरज नाही, पाहा फोटो!

पतीकडून बलात्कार हा लैंगिक अत्याचाराचा सर्वात मोठा प्रकार! दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद नेमका कशासाठी?

झोपेच्या स्थितीवरून ठरेल तुमचे आरोग्य, निरोगी हृदय आणि सुरक्षित गरोदरपणामध्ये घ्या झोपेची अश्या प्रकारे काळजी!!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.