‘या’ शापित खुर्चीत जो जो बसला त्याचा मृत्यू झाला, वाचा काय आहे भानगड
ही शापित खुर्ची ३०० वर्षे जुनी आहे. असे म्हटले जाते की ज्याने त्यावर बसण्याचा प्रयत्न केला त्याचा वेदनादायक मृत्यू झाला आहे. सध्या ही खुर्ची एका संग्राहलायत ठेवण्यात आली आहे जेणेकरून त्यावर कोणी बसणार नाही...

ही कथा यूकेमधील यॉर्कशायरमधील थर्स्क गावातील पबभोवती फिरते. हे गाव १७ व्या शतकातील खुनी थॉमस बस्बी आणि त्याच्या कथित शापित खुर्चीमुळे प्रसिद्ध झाले होते. १७०२ सालामध्ये मृत्युमुखी पडलेल्या थॉमस बस्बीचा आत्मा या ठिकाणी फिरत असल्याचे मानले जाते, त्यानंतर पबला ‘बस्बी स्टूप’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार, थॉमस बसबी हे त्यांचे सासरे डॅनियल ऑटी यांच्यासोबत बनावट नाण्यांचा बेकायदेशीर व्यवसाय चालवत होते. सासरे आणि जावई दोघेही एकमेकांवर मित्रांसारखे हक्क गाजवायचे. कामानंतर जेव्हा ते थर्स्कमधील त्यांच्या आवडत्या पबमध्ये ड्रिंकसाठी बसायचे, तेव्हा थॉमसला नेहमीच एका खुर्चीवर बसणे आवडायचे. त्याला या खुर्चीची इतकी ओढ लागली की एके दिवशी जेव्हा डॅनियल त्यावर बसला तेव्हा तो इतका संतापला की त्याने त्याला मारून टाकले.
थॉमसने त्याच पबमध्ये त्याच्या सासऱ्याची हत्या केली होती. यानंतर, जेव्हा त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा त्याने त्याच खुर्चीवर बसून शेवटचे जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, निघताना, त्याने लोकांना इशारा दिला की जो कोणी त्याच्या खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करेल तो मरेल.
खुर्चीवर बसलेल्या लोकांचा झाला मृत्यू
कालांतराने, या खुर्चीवर बसलेल्या लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याच्या अनेक कथाही समोर आल्या, ज्यामुळे खुर्चीची कीर्ती आणखी वाढली. अहवालानुसार, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, दोन पायलट पबमध्ये आले आणि थॉमसच्या शापित खुर्चीवर बसले. यानंतर, ते पबमधून बाहेर पडताच त्यांचा अपघात झाला आणि दोघांचाही मृत्यू झाला. त्याचप्रमाणे, खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत आणखी एका व्यक्तीचा गूढ मृत्यू झाला. यानंतर, ही खुर्ची थर्स्क संग्रहालयाला या अटीवर दान करण्यात आली की ती भिंतीवर टांगली पाहिजे, जेणेकरून कोणीही त्यावर बसू शकणार नाही.
संग्रहालयात दान करण्यात आली खूर्ची
2008 मध्ये, वेड रॅडफोर्ड नावाच्या भूत शिकारीने पबची चौकशी केली आणि थॉमसचा आवाज रेकॉर्ड केल्याचा दावा केला. हा अनुभव वेडसाठी खूप भयानक होता आणि त्याने तो त्याच्या एका पुस्तकात लिहिला आहे. जरी, आता या पबचे भारतीय रेस्टॉरंटमध्ये रूपांतर झाले आहे, परंतु थॉमस आणि त्याच्या खुर्चीची कहाणी अजूनही लोकांना खूप रंजक वाटते.