मानवाने केलेल्या जगातील सर्वात महागड्या चुका; नुकसान भरपाईसाठी शेकडो जन्म घ्यावे लागतील
या चुका इतक्या महागड्या होत्या की काही बाबतीत लोकांना अनेक हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. (The world's most expensive man-made mistakes; Hundreds will have to be born to compensate)
नवी दिल्ली : चुका माणसांकडूनच होतात, ही गोष्ट आपण बऱ्याचदा आणि बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल. आपण सर्वच जण बऱ्याचदा काही ना काही चुका करीत असतो. आपल्या चुकांकडे काही वेळेला लोक दुर्लक्ष करतात. त्या सर्वसाधारण चुका असल्याचे मानून लोक कानाडोळा करतात खरे, पण काही चुका आपल्याला फारच महागात पडणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही मानवी चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या मानवाने केलेल्या सर्वात महागडी चुका ठरलेल्या आहेत. या चुका इतक्या महागड्या होत्या की काही बाबतीत लोकांना अनेक हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. (The world’s most expensive man-made mistakes; Hundreds will have to be born to compensate)
बर्लिन विमानतळ
जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ब्रांडेनबर्ग विमानतळ देशाच्या इतिहासात कायम लक्षात राहील. हे विमानतळ बनवण्याची तयारी सुरू होती, त्याचवेळी अधिकाऱ्यांनी असा दावा केला की हे जगातील सर्वात आधुनिक विमानतळ असेल. परंतु नियोजन, तांत्रिक त्रुटी, भ्रष्टाचार यासारख्या अनेक कारणांमुळे या विमानतळाचे उद्घाटन नऊ वर्षे उशिराने म्हणजेच गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले. हे विमानतळ तयार करण्यासाठी सुमारे 7 अब्ज डॉलर्स इतका खर्च झाला आहे. वास्तविक हे विमानतळ उभारण्यावर जवळपास 2 अब्ज डॉलर्स रुपये इतकाच खर्च करण्याचा प्रस्ताव होता. मात्र मानवी चुकांमुळे जर्मनीला सुमारे 7 अब्ज डॉलर्सच्या खर्चाचा भार पेलावा लागला आहे.
वासा युद्धनौका
स्वीडनचा राजा गुस्ताव द्वितीय अॅडॉल्फ यांनी 1624 मध्ये महाकाय स्वरुपाची युद्धनौका बांधण्याचे आदेश दिले. वासा नावाच्या या युद्धनौकेत 68 मीटरच्या 64 तोफा होत्या. त्यावेळी ही युद्धनौका जगातील सर्वात शक्तिशाली युद्धनौका होती. परंतु, मानवी चुकांमुळे या अभिमानाचा बोजवारा उडाला आहे. खराब अभियांत्रिकी आणि डिझाईनमुळे युद्धनौकेचा पहिला प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनी युद्धनौका बुडाली. या अपघातात 30 लोकांचा मृत्यूही झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वासा युद्धनौका बनवण्यासाठी 2 लाख रेक्स डॉलर खर्च करण्यात आले होते. असे म्हणतात की त्यावेळची 2 लाख रेक्स डॉलरची किंमत म्हणजेच आजची जवळपास 25 अब्ज डॉलर्स इतकी किंमत आहे.
अलास्काची विक्री
आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले अलास्का राज्य एकेकाळी रशियाचा भाग होते. अलास्काचे खरे सत्य माहित होण्यापूर्वी ते चहा आणि बर्फासाठी प्रसिद्ध होते. तथापि, सन 1867 च्यादरम्यान रशियाचा राजा अलेक्झांडर द्वितीय यांना अलास्काकडून काही विशेष फायदा मिळाला नव्हता. अलास्काचे हवामानदेखील शेतीसाठी योग्य नव्हते. त्यानंतर रशियाने अमेरिकेला अलास्काला 7.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. अलास्का विकत घेतल्यानंतर अमेरिकेलासुद्धा सुरुवातीला वाटले की ही जागा फायदेशीर नाही. तथापि, 1896 च्यादरम्यान अलास्काच्या युकोनमध्ये सोन्याचा एक प्रचंड भांडार सापडले. केवळ सोनेच नाही तर अमेरिकन लोकांना अलास्कामध्ये तेल आणि वायूदेखील सापडला. अर्थतज्ज्ञांच्या मते अलास्कामधील तेल आणि वायू साठ्यांचे मूल्य जवळपास 200 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. याशिवाय सोन्याच्या साठ्यांचे मूल्य वेगळेच आहे. आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, रशियाच्या राजाने अलास्का विकून कशी मोठी चूक केली होती. (The world’s most expensive man-made mistakes; Hundreds will have to be born to compensate)
RRC Western Railway Recruitment 2021: अप्रेंटिसच्या 3591 पदांच्या भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी#RRCWesternRailwayRecruitment2021 #WesternRailway #RailwayRecruitmentCell #ApprenticepostRecruitment2021https://t.co/sLWAvEXoSC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 28, 2021
इतर बातम्या
PHOTO | हा आहे सर्वात दुर्मिळ रक्त गट ! जगभरात फक्त 43 लोकांचा आहे हा ग्रुप