ही जागा म्हणजे पृथ्वीवरील ‘नरकाचा दरवाजा’;धगधगती आग घेतेय लोकांचा जीव
पृथ्वीवरील हे ठिकाण म्हणजे 'नरकाचा दरवाजा' असं म्हटलं जातं. येथे कित्येक वर्षांपासून धगधगती आग जळत आहे. ही आग हळुहळु आजुबाजूंच्या स्थानिकांचा जीव घेत आहे. नक्की काय आहे हा नरकाचा दरवाजा पाहुयात .
या जगात स्वर्ग आणि नरक दोन्ही आहेत हे तुम्ही अनेकदा धार्मिक गुरू आणि ज्येष्ठांकडून ऐकले असेल. किंवा एखाद्या ग्रंथात वाचलं असेल. पण विचार केला तर खरंच स्वर्ग नरक अशा गोष्टी असतात का? आणि जर तुम्हाला असं कोणी असं सांगितलं की नरक आणि स्वर्ग पृथ्वीवरच अस्तित्वात आहेत त कोणाचा विश्वास बसणार नाही.
50 वर्षांपासून जळत आहे आग
पृथ्वीवर स्वर्ग आणि नरक अस्तित्वात आहे याचा अर्थ म्हणजे पृथ्वीवर काही ठिकाणांना स्वर्ग आणि नरकाची उपमा दिलेली आहे. नरकाचं दार म्हणून संबोधलेलं ठिकाण सर्वत्र प्रसिद्ध आहे. कारण पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे वर्षानुवर्षे सतत जळत असलेले मोठमोठे खड्डे आहेत, त्यांना ‘द गेट्स ऑफ हेल’असंही म्हटले जातं.
या ठिकाणी जवळपास 50 वर्षांपासून आग जळत असून ती कधीही विझली नसल्याचं म्हटलं जातं आणि आश्चर्य म्हणजे याठीकाणी लोकवस्ती पाहायला मिळते. आपल्या पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आपल्या कल्पनेपलीकडची आहेत. या ठिकाणाला पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा म्हणतात.
याला म्हणतात नरकाचा दरवाजा
नरकाचा हा दरवाजा तुर्कमेनिस्तानमध्ये आहे जे प्रत्यक्षात मोठे खड्डा आहे. हे 230 फूट रुंद खड्डे गेल्या 50 वर्षांपासून सतत आगीने जळत आहेत. हे इतके मोठे आहेत की त्यांच्यामध्ये मोठी लोकसंख्या बसू शकते. खड्ड्यातून बाहेर पडणारे विषारी वायू हळूहळू शेजारी राहणाऱ्या लोकांचा जीव घेत आहेत. यामुळे त्यांची तब्येत खराब होत आहे. अश्गाबत शहरापासून सुमारे 160 मैलांवर असलेल्या काराकुम वाळवंटात हे मोठे विवर आहे. अग्नी सतत जळत असल्यामुळे याला ‘माउथ ऑफ हेल’ किंवा ‘गेट ऑफ हेल’ असेही म्हणतात.
या वर्षाच्या सुरुवातीला तुर्कमेनिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्दिमुहामेदोव्ह यांनी हे खड्डे झाकून ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली. त्यांनी यासाठी आदेश दिले आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांना जगातील सर्वात मोठे तज्ञ शोधण्यास सांगितले आहे जे हा खड्डा बंद करण्यास सक्षम आहेत. आग विझवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण लोंकांना यात अपयश आले.
खड्यात आग कशी लागली?
हा विशाल खड्डा येथे नेहमीच उपस्थित नव्हते. दुस-या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनची परिस्थिती चांगली नव्हती असे मानले जाते. त्यांना तेल आणि नैसर्गिक वायूची नितांत गरज होती. त्यावेळी शास्त्रज्ञांनी वाळवंटात खोदकाम करून तेलाचा शोध सुरू केला. त्यांना नैसर्गिक वायू सापडला, पण जिथे त्यांना तो सापडला, तिथे जमिनीत गुरफटले होते आणि त्याजागी एक मोठा खड्डा तयार झाला होता.
खड्ड्यांतून मिथेन वायूचीही झपाट्याने गळती झाली. वातावरणाचे जास्त नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी खड्ड्यात आग लावली. गॅस संपला की आगही विझेल असे त्यांना वाटले, पण तसे झाले नाही आणि 50 वर्षांनंतरही गॅस सतत जळत आहे. मात्र, या दाव्याच्या सत्यतेचा कोणताही ठोस पुरावा नाही. स्त्रोतांवरून ही माहिती उपलब्ध असून हे ठिकाण आणि या ठिकाणाची कहाणी सर्वत्र प्रसिद्ध आहे.