तुमच्या 30 पिढ्या होतील, पण ‘ही’ वनस्पती सूकणार नाही; उष्ण वातावरणातही राहते हिरवीगार

शास्त्रज्ञांच्या मते, वेल्विचिया वाळवंट प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती 3000 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की वाळवंटातील अत्यंत कडक हवामानाने या वनस्पतीला दीर्घ आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली आहे.

तुमच्या 30 पिढ्या होतील, पण ‘ही’ वनस्पती सूकणार नाही; उष्ण वातावरणातही राहते हिरवीगार
तुमच्या 30 पिढ्या होतील, पण ‘ही’ वनस्पती सूकणार नाही
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली : नवीन संशोधनासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना आश्चर्यकारक यश मिळाले आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांच्या वयाला मर्यादा आहे. यामध्ये झाडे आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींचादेखील समावेश आहे. झाडे-वनस्पतीही एका ठराविक काळानंतर मरण पावतात. हे सगळे सांगण्याचा साधा अर्थ असा आहे की काही काळानंतर सर्व झाडांचे आणि वनस्पतींचेही आयुष्य संपते. त्यांच्यामध्ये जीवन राहत नाही. पण शास्त्रज्ञांनी अशा वनस्पतीचा शोध लावला आहे, ज्याच्या वयाबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. होय, या वनस्पतीचे नाव आहे ‘वेल्विचिया’. या वनस्पतीचे आयुर्मान हजारो वर्षे आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या 30 पिढ्या निघून जातील, पण ही वनस्पती सुकणार नाही अर्थात तिचे सदाबहार चैतन्य मावळणार नाही. (येथे आपण मानवाचे सरासरी वय 100 वर्षे गृहीत धरले आहे) पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही वनस्पती वाळवंटात आढळते, जिथे हवामान अत्यंत कोरडे आणि गरम असते. (This plant stays green even in hot climates, know the deatil about it)

वेल्विचिया वनस्पती 3000 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकते

शास्त्रज्ञांच्या मते, वेल्विचिया वाळवंट प्रदेशात आढळणारी वनस्पती आहे. ही वनस्पती 3000 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की वाळवंटातील अत्यंत कडक हवामानाने या वनस्पतीला दीर्घ आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी वेल्विचिया वनस्पतीच्या पेशी विभाजन प्रक्रियेदरम्यान तत्कालीन हवामान आणि दुष्काळाने त्याच्या अनुवांशिक संरचनेवर इतका परिणाम झाला होता की या वनस्पतीमध्ये अमर राहणारे गुणधर्म भरले गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळचे हवामान खूप कोरडे आणि गरम होते. ज्याने वेल्विचियाला कठोर हवामानातही जगण्याची क्षमता दिली.

दक्षिण अंगोला आणि नामिबियामध्ये आढळते वेल्विचिया

वेल्विचियाचे वय लक्षात घेता, या वनस्पतीचे पृथ्वीवरील सर्वाधिक काळ जिवंत राहणारी वनस्पती म्हणून वर्णन केले जात आहे. सध्या अशी कोणतीही वनस्पती नाही जी वेल्विचियापेक्षा जास्त काळ जगू शकते. वेल्विचिया प्रामुख्याने दक्षिण अंगोला आणि नामिबियामध्ये आढळते. याठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दक्षिण अंगोला आणि नामिबियाचे हवामान खूप कडक आहे, जेथे बराच काळ कोरडे आणि गरम हवामान असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की येथे सापडलेल्या वेल्विचियाच्या अनेक वनस्पती 3000 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधील एक वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ, जे सर्वात जुनी वनस्पती शोधण्यासाठी अभ्यासात सहभागी झाले होते. वेल्विचिया ही एक वनस्पती आहे जी सतत वाढते, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

कडक हवामानामुळे जनुकांमध्ये विकसित झाले अमरत्व

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, 1859 साली, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ फ्रेडरिक वेलविच यांनी सर्वात जुन्या वनस्पतींचा अभ्यास करण्याचा विचार केला. हे पाहता, या वनस्पतीला फ्रेडरिक वेलविचच्या नावाने वेल्विचिया हे नाव मिळाले आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की वेल्विचियाच्या दीर्घायुष्यामागे असलेली अनुवांशिक रचना ही अत्यंत कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे विकसित केली गेली. या संशोधनाच्या आधारावर अशा प्रकारची काही पिकेदेखील विकसित केली जाऊ शकतात, जी कठोर हवामानातही दीर्घकाळ टिकू शकतात, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (This plant stays green even in hot climates)

इतर बातम्या

सूडबुद्धीच्या कारवाईला घाबरत नाही, 9 तारखेला गावागावात निदर्शने करणार, रामशेठ ठाकूरांचा इशारा

Maharashtra Flood : राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा, नुकसानग्रस्तांना कशाप्रकारे मदत दिली जाणार? वाचा सविस्तर

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.