Rajmata Jijau: आजचाच तो दिवस जेव्हा राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, देश महाराष्ट्रात सोहळा
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार 424 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे मोठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मॉं साहेब जिजाऊ जमोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची (Rajmata Jijabai) तारखेनुसार 424 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा (Sindkhed Raja) येथे मोठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मॉं साहेब जिजाऊ जमोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात प्रजेचे हाल सुरू होते. सातत्याने मुस्लीम आक्रमणे होत असत. या य़ुद्धाची झळ ही प्रजेला अधिक बसत होती. पिकाने बहरेली शेतजमीन उद्धवस्त होत होती. मात्र शिव जन्मानंतर हे चित्र हळूहळू पटलू लागले. जिजाऊंच्या (Jijau Birth Anniversary) संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
जिजाऊंचा जीवनप्रवास
राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला. शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले.
छत्रपती संभाजी महाराजांवर जिजाऊंच्या विचारांचा पगडा
गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. 1655 साली जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे विजापूरतर्फे लढताना मरण पावले. त्यानंतर 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतर देखील जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जीद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.
टीप : राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भातील वरील सर्व माहिती ही विविध वृत्तसंस्थांच्या संकेत स्तळांवरून तसेच विकिपीडियावरून घेतली आहे.
संबंधित बातम्या
कोणी निर्माण केले होते आताचे सोमनाथ मंदिर? वाचा अनेकदा उध्वस्त केलेल्या या मंदिराच्या वैभवाची कहाणी
118 वर्षानंतर कोणार्क मंदिराचे उघडतील गर्भद्वार, इतके वर्ष द्वार बंद होण्यामागे होते हे कारण…