जगातील सर्वात शक्तिशाली फळ कोणते? द्या उत्तर!
तुम्ही एखाद्या डिबेटला जात असाल तर त्यावर बोलू शकता. सामान्य ज्ञान आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुढे नेण्याचे काम करते. सामान्य ज्ञानाचे एखाद्या व्यक्तीने धडे का घ्यावेत, ते का महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नांची चर्चा करणार आहोत.
मुंबई: सामान्य ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामी येते. मग तुम्ही एखाद्या कॉलेज मध्ये प्रवेशासाठी मुलाखत देणार असाल किंवा सरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी मुलाखत देणार असाल, तुम्हाला याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. किंबहुना तुम्हाला वेगवेगळ्या मुद्द्यांवर समज व्हावी, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल यासाठी सामान्य ज्ञान आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या डिबेटला जात असाल तर त्यावर बोलू शकता. सामान्य ज्ञान आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुढे नेण्याचे काम करते. सामान्य ज्ञानाचे एखाद्या व्यक्तीने धडे का घ्यावेत, ते का महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नांची चर्चा करणार आहोत.
प्रश्न : शरीरात असा कोणता भाग आहे ज्यात रक्त नसते?
उत्तर: कॉर्निया
प्रश्न : कोणत्या देशाला ‘सापांचा देश’ म्हणतात?
उत्तर: ब्राझीलला ‘सापांचा देश’ म्हटले जाते, कारण इथे इतके साप आहेत, जगात इतरत्र कुठेही सापडणार नाहीत.
प्रश्न : गाईचे आयुष्य किती असते?
उत्तर: 16 वर्षापर्यंत.
प्रश्न : पूर्व पाकिस्तान हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे?
उत्तर: बांगलादेश
प्रश्न : श्रीलंकेचे जुने नाव काय आहे?
उत्तर: सीलोन
प्रश्न : लाय डिटेक्टरचे/ खोटं पकडणाऱ्या यंत्राचे नाव काय आहे?
उत्तर: पॉलीग्राफ
प्रश्न : मी अन्न खात नाही, पाणी पित नाही पण माझ्या बुद्धीसमोर कुणाचाच निभाव लागत नाही. मला सांगा मी कोण आहे?
उत्तर: संगणक
प्रश्न: शेतात हिरवा, बाजारात काळा आणि घरात लाल, सांगा मी कोण आहे?
उत्तर: चहा पत्ती
प्रश्न : मी प्रश्न विचारतोय, उत्तर काय आहे?
उत्तर: दिशान (उत्तर एक दिशा आहे)
प्रश्न : जगातील सर्वात शक्तिशाली फळ कोणते?
उत्तर: किवी