नवरीमुलीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद! यापेक्षाही एका डेंजर प्रथेला वधूला सामोरं जावं लागतं! काय असते ती?

Weird Wedding Rituals: केन्या येथील एका जमाती मध्ये लग्नाच्या वेळी जेव्हा नवरी मुलगी सगळ्यांचा निरोप घेते तेव्हा नवरी मुलीचे वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर थुंकून चक्क आशीर्वाद दिला जातो.

नवरीमुलीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद! यापेक्षाही एका डेंजर प्रथेला वधूला सामोरं जावं लागतं! काय असते ती?
नवरीमुलीच्या डोक्यावर थुंकून आशीर्वाद!
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली : जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा तिच्या घरातील सर्व आनंदात असतात आणि मुलीचे वडील मुलगी सासरी आनंदात नांदावी म्हणून आशीर्वाद देत असतात आणि तिच्या सुखासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे यासाठी वडील जिवाचे रान करतात परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक आगळीवेगळी परंपरा(Ritual) वेगवेगळे कारण सांगणार आहोत आणि हे कारण तुम्हाला थक्क करणारे आहेत. मुलीच्या डोक्यावर आणि ब्रेस्टवर थुंकून (Spitting) आशीर्वाद देण्याची आहे ही प्रथा. अनेक आदिवासी जमाती आपली संस्कृती परंपरा या सर्वांच्या कारणामुळे अनेकदा चर्चेमध्ये राहतात. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या जमातीच्या आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल (Weird Rituals) सांगणार आहोत आणि यंदा आम्ही तुम्हाला केन्या येथील एका आदिवासी जमातीबद्दल (Kenya Tribes) सांगणार आहोत. या जमातीमध्ये लग्नाच्या वेळी एक विशेष परंपरा पार पाडली जाते त्याबद्दल जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही चक्क आश्चर्य व्यक्त कराल. ज्या पद्धतीने भारतामध्ये जेव्हा लग्न होते तेव्हा नवरी मुलगी सगळ्यांचा निरोप घेऊन सासरी जाते तर त्यावेळी अनेक परंपरा पार पाडल्या जातात तशीच परंपरा येथे सुद्धा आहे परंतु ही परंपरा अतिशय आगळी- वेगळी आहे

खरेतर या जमातींमध्ये जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते आणि जेव्हा मुलगी सासरी जात असते तेव्हा नवरी मुलीचे वडील आपल्या मुलीच्या तोंडावर थुंकतात, ते आपल्या मुलीच्या तोंडावर थुंकून मुलीला आशीर्वाद देतात. हे तुम्हाला वाचण्यात आणि ऐकण्यात जरी विचित्र वाटत असले तरी ही गोष्ट अतिशय सत्य आहे. या जमातींमध्ये अशाच प्रकारे आशीर्वाद दिला जातो त्याचबरोबर या जमातीतील लोक अनेक प्रकारच्या वेगळ्या भयंकर परंपरा सुद्धा जपत आहेत आणि या परंपरा सगळ्या आपल्यासारख्या व्यक्तींना हैराण करणाऱ्या आहेत चला तर मग आपण जाणून घेऊयात या नेमक्या परंपरा कोणत्या आहेत आणि या कशा पद्धतीने पार पाडल्या जातात

कोठे पार पाडली जाते ही परंपरा ?

ही परंपरा केन्या आणि तनजानिया जमातीतील लोक पार पाडतात ज्याचे नाव आहे मासई (Maasai) आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी मासाई लोक प्रामुख्याने ओळखले जातात. कारण की या लोकांमध्ये अशा अनेक परंपरा आहेत ज्या आगळ्या वेगळ्या आणि खूपच भयंकर आहेत…

नेमकी काय आहे परंपरा

जर आपल्याला या परंपरेबद्दल बोलायचे झाल्यास तरी या परंपरेमध्ये नवरी मुलीला विशेष प्रकार निरोप दिला जातो.मिडीयम वर प्रकाशित झालेल्या एका आर्टिकल नुसार महिलांचे जेव्हा लग्न होते तेव्हा निरोपाच्या वेळी नवरी मुलीचे वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर आणि ब्रेस्ट वर थुंकतात. भारतामध्ये अशी परंपरा क्वचितच कुठे तरी पाहायला मिळत असेल.मुलीचे वडील लग्नाच्या दिवशी आपल्या मुली सोबतच ही परंपरा पार पाडत असतात. मासाईच्या लोकांमध्ये आपल्या जवळच्या व्यक्ती बद्दल प्रेम व्यक्त करण्याची ही अशी विचित्र परंपरा आहे.

ते आपल्या कुटुंबातील लोकांवर थुंकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीवर हे लोक थुंकतात त्या व्यक्तीला असे केल्याचा राग सुद्धा येत नाही आणि त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे वाईट सुद्धा वाटत नाही उलट त्या व्यक्तीला आनंद होतो.

या जमातीतील लग्न परंपरेमध्ये नवरी मुलीचा जो काही हुंडा असतो तो नवरदेवाच्या कुटुंबीयांना दिला जातो त्यानंतर नवरी मुलीचे मुंडन केले जाते आणि यावेळेस या जमातीतील अनेक ज्येष्ठ मंडळी सुद्धा या परंपरेत सहभागी असतात. त्यानंतर नवरी मुलगी आपल्या वडिलांच्या समोर जाऊन गुडघ्यांवर बसते. आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेते. अशा वेळी घरातील सर्व ज्येष्ठ मंडळी नवरी मुलीला आशीर्वाद देताना तिच्या ब्रेस्ट वर थुंकतात. असे मानले जाते की थुंकण्याची ही परंपरा नवरी मुलीसाठी शुभ मानले जाते. ही परंपरा फक्त नवरी मुली सोबत होते असे नाही तर जेव्हा एखादे नवीन बाळ जन्माला येते तेव्हा सुद्धा ही परंपरा पार पाडली जाते व जन्माला आलेला बाळासोबत सुद्धा असेच कृत्य केले जाते.

खरे तर एकमेकांवर थुंकणे ही परंपरा काही लोकांना खूपच विचित्र वाटते परंतु मासाई लोकांसाठी ही परंपरा म्हणजे एक सन्मान आहे. येथे थुंकणे म्हणजे बहुमान मानला जातो. जेव्हा यांच्याकडे एखादा विदेशी व्यक्ती जरी आला तरी त्या व्यक्तीचा सन्मान व स्वागत हे लोक अशाच पद्धतीने करतात. आणि त्या व्यक्तीचा सन्मान करताना त्या व्यक्तीच्या हातावर थुंकतात. असे म्हटले जाते की या प्रजातीमध्ये जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा मुलगी सासरी जाताना तिला मागे वळून बघण्यास सांगितले जात नाही. जर मुलीने असे केले तर तर ती भविष्यात दगड बनते अशी मान्यता आहे.

इतर बातम्या

अचानक आग लागल्यानंतर काय करावं? कोणाला, कधी, कसा संपर्क साधावा..?

मुलांमुळे सतत चिडचिड होतेय? सारखं त्यांच्यावर रागवता का? वाचा, ओव्हर पॅरेंटिंग कसं घातक ठरू शकतं? 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.