पपई चांगली असते, पण ती कधी खाऊ नये? वाचा
इतके फायदेशीर फळ असूनही काही परिस्थितीत पपई खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये.
पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन्स, फायबर असे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदय व्यवस्थित काम करते. पोटाची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही पपईचा उपयोग केला जातो. इतके फायदेशीर फळ असूनही काही परिस्थितीत पपई खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी पपई अजिबात खाऊ नये.
साखरेची कमी पातळी
ज्या लोकांमध्ये साखरेची पातळी कमी आहे त्यांनी पपई अजिबात खाऊ नयेत. असे केल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. ज्यांना मधुमेह आहे त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपई खाऊ नये.
गर्भधारणेच्या अवस्थेत
गरोदरपणात पपई खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. यात असलेले पॅपेन शरीरातील पेशींच्या पडद्याचे नुकसान करू शकते. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणूनच गर्भवती महिलांना पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो.
त्वचेची ॲलर्जी
ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी पपई खाणे टाळावे. याचे सेवन केल्याने शरीरावर लाल पुरळ, डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू शकतात. सूज देखील येऊ शकते. ज्या लोकांना लेटेक्सची ॲलर्जी आहे त्यांनीही पपई खाऊ नये.
पपईनंतर औषध घेणे
काही लोक पपई खाल्ल्यानंतर लगेचच औषध खाऊन चूक करतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर पपई आणि औषधं मिळून कॉकटेल तयार होऊ शकतं जे कॉकटेल शरीरातील रक्त पातळ करतं. ज्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे असे करू नये.
(इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)