जंक्शन, टर्मिनस आणि सेंट्रल यामध्ये काय आहे फरक, जाणून घ्या एका क्लिकवर
भारतात दररोज कोट्यावधी लोक प्रवास करणाऱ्या भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून प्रसिद्ध आहे. आपण प्रत्येकाने कधी ना कधी रेल्वेने प्रवास केला आहे. या रेल्वे स्टेशनची एक खासियत तुमच्या लक्षात आली आहे का कधी. काही रेल्वे स्थानकांच्या नावापुढे जंक्शन, सेंट्रल किंवा टर्मिनस असं लिहिलेलं असतं. या शब्दांचा अर्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबई : भारतात फिरण्यासाठी लोक रेल्वेने प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे ही स्वस्त आणि सोयीची पडते. भारतात रेल्वेचे मोठं जाळं पसरलं आहे. आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते. काही शहरातील रेल्वे स्टेशनला जंक्शन, काही टर्मिनल तर काही सेंट्रल असं म्हटलेलं असतं. यात नेमका फरक काय ते आज आपण पाहूयात. भारतीय रेल्वे स्थानकांची चार विभागात विभागणी करण्यात आली आहे. स्टेशन, जंक्शन, टर्मिनस, सेंट्रल असे चार विभाग आहेत. या चार विभागाचे महत्त्व जाणून घेऊयात.
जंक्शन – ज्या रेल्वे स्थानकातून दोन किंवा अधिक मार्ग निघतात अशाला जंक्शन असं म्हणतात. उदाहरणात जर एखाद्या स्टेशनवरुन तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत असाल तर त्याला जंक्शन म्हणतात. भारतात 300 पेक्षा जास्त जंक्शन असून मथुरा हे सगळ्यात मोठे जंक्शन आहे. मथुरामधून रेल्वेचे सात मार्ग निघतात.
सेंट्रल – सेंट्रल हे त्या शहरातील सर्वात जुने आणि प्रमुख रेल्वे स्टेशन असतं. या ठिकाणी अनेक रेल्वे गाड्या येतात आणि जातात. हे सेंट्रल सर्वात व्यस्त असं स्टेशन असतं. भारतात फक्त 5 सेंट्रल आहेत. मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल.
टर्मिनस – ज्या ठिकाणी रेल्वे गाड्या पुढे जाऊ शकत नाही असं रेल्वे स्टेशनमध्ये टर्मिनस. जसं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. या ठिकाणी रेल्वे गाड्या येऊन थांबतात म्हणजे हे शेवटचं स्टेशन असतं. भारतात एकूण 27 टर्मिनस आहेत. एकट्या मुंबईत दोन टर्मिनस आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं लोकमान्य टिळक टर्मिनस.
स्टेशन हे असं ठिकाण आहे जिथे रेल्वे गाड्या येत जात असतात. काही वेळासाठी रेल्वे थांबली जाते. प्रवासी आणि सामान्यांची ये-जा केली जाते ते म्हणजे स्टेशन. भारतात असे अनेक स्टेशन आहेत. मुंबईकरांसाठी लोकल ही त्यांची लाईफलाईन आहे. त्यामुळे मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वे स्टेशनचाच उपयोग होतो.
इतर बातम्या –
मानवी शरीराचे दोन अवयव, अखेरच्या श्वासापर्यंत वाढतच राहतात, कारण अत्यंत इंटरेस्टिंग
Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?