तुम्ही मनातलं ओळखू शकता? बागेश्वर बाबा दावा करतात ती माइंड रिडिंग काय?; सायंटिफिक माहिती घ्या जाणून
माइंड रिडिंग विज्ञानावर अवलंबून आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र, माइंड रिडिंग ही तंतोतंतपणे विज्ञानावर आधारित नाही. प्रत्येकवेळी तुम्ही योग्यच माहिती देऊ शकाल असं नाही. एखाद्यावेळी तुमची माइंड रिडिंग चुकू शकते.
नवी दिल्ली: दिव्यदृष्टीने आपण लोकांच्या मनातील ओळखतो, अनोळखी व्यक्तीचे नाव, पत्ता आणि त्यांच्या नातेवाईकांबाबत जाणतो, असा दावा बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. हा चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबांना दिलं आहे. या आव्हानावरून आता बाबा आणि समितीत तू तू मै मै सुरू झाली आहे. मात्र, या निमित्ताने मनातील खरच ओळखता येतं का? असा सवाल केला जात आहे. माइंड रिडिंगमुळे काही गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात, असं सांगितलं जातं. त्यामुळे ही माइंड रिडिंग काय आहे? यावर टाकलेला हा प्रकाश.
माइंड रिडिंग काय असतं?
एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललं हे जाणता येणं म्हणजे माइंड रिडिंग होय. कोणत्याही साधनांशिवाय एखाद्याच्या मनातील ओळखणं याला माइंड रिडिंग म्हणतात.
मनातलं कसं ओळखतात?
या क्रियेत व्यक्ती सजग होऊन आणि आपल्या मेंदूला ताण देऊन समोरच्याची फिलिंग समजतो. काही मनोवैज्ञानिक टेक्निकद्वारा दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूत काय चाललं? हे ओळखता येतं. मनोवैज्ञानिक त्याला साहनुभूती निकटता असं म्हणतात. समोरच्या व्यक्तिच्या मेंदूत काय चाललं याचा थोडाफार अंदाजा येतो.
किती वेळा अभ्यास?
माइंड रिडिंग करणारे याचा सातत्याने अभ्यास करतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, हे जाणून घेण्याचा दिवसातून दोन तीन वेळा हे लोक प्रयत्न करत असतात असं सांगितलं जातं. या लोकांमध्ये एकाग्रता असते. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ऐकण्यासाठी ही एकाग्रता अधिक महत्त्वाची असते.
जाणकार काय सांगतात?
माइंड रिडिंग विज्ञानावर अवलंबून आहे, असं अनेकांना वाटतं. मात्र, माइंड रिडिंग ही तंतोतंतपणे विज्ञानावर आधारित नाही. प्रत्येकवेळी तुम्ही योग्यच माहिती देऊ शकाल असं नाही. एखाद्यावेळी तुमची माइंड रिडिंग चुकू शकते. कारण माइंड रिडिंग करताना प्रासंगिक गोष्टींवरूनच ती केली जाते, असं जाणकार सांगतात.
माइंड रिडिंगसाठीच्या गोष्टी
माइंड रिडिंग करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. समोरच्या व्यक्तीचे हावभाव कसे आहेत, त्या व्यक्तीचे डोळे कसे आहेत? त्याची मुद्रा कशी आहे? त्याच्या चेहऱ्याचे हावभाव काय सांगतात? तो कशा पद्धतीने बोलतो? यावरून माइंड रिडिंग करता येते.