पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर

शासकीय कागदपत्रांमध्ये पासपोर्टच्या हिंदी नावाचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी पासपोर्टच लिहिले जाते. पासपोर्टला हिंदीमध्ये 'पारपत्र' म्हटले जाते. याचा अर्थ कोणतीही वस्तू बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले पत्र.

पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर
पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हणतात, तो कसा बनवतात? जाणून घ्या याचे उत्तर
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 5:19 PM

नवी दिल्ली : जेव्हा कोणालाही परदेशात जायचे असेल तेव्हा एक कागदपत्र नेहमी कामाला येते, ते म्हणजे आपला पासपोर्ट. पासपोर्टशिवाय आपण देशाबाहेर जाऊ शकत नाही आणि दुसर्‍या कोणत्याही देशाच्या पासपोर्टशिवाय आपण त्या देशामध्ये प्रवेश करू शकत नाही. पासपोर्ट एक ओळखीचा पुरावा म्हणूनही काम करते. पासपोर्टमध्ये आपल्या छायाचित्रासहित अनेक माहिती लिहिलेले असते. त्या माहितीचा अनेक ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला पासपोर्टबद्दल बरीच माहिती असेल. परंतु कधी तुम्ही हा विचार केला आहे का पासपोर्टचे हिंदीमध्ये नाव काय आहे. (What is passport called in Hindi, how is it made, know the answer)

पासपोर्टची हिंदी नाव काय आहे?

जेव्हा पासपोर्टला हिंदीमध्ये काय म्हटले जाते, याबाबत इंटरनेटवर शोध घेतो, त्यावेळी आपल्याला इंटरनेटवर बरीच नावे पाहायला मिळतात. हिंदी नावांमध्ये पारपत्र, अभय पत्र, अनुमती पत्र, राहदारी, गमनपत्र, आज्ञापात्र इत्यादींचे वर्णन पाहायला मिळते. परंतु, हिंदीमध्ये पासपोर्टची खरे नाव काय आहे? याबाबत दिल्ली पासपोर्ट सेवा केंद्रच्या सीपीआईओंनी टीव्ही 9 ला अधिक माहिती दिली. शासकीय कागदपत्रांमध्ये पासपोर्टच्या हिंदी नावाचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी पासपोर्टच लिहिले जाते. पासपोर्टला हिंदीमध्ये ‘पारपत्र’ म्हटले जाते. याचा अर्थ कोणतीही वस्तू बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले पत्र.

तीन रंगाचे पासपोर्ट

आपला पासपोर्ट निळ्या रंगाचा असतो, परंतु भारत सरकार आणखी दोन रांगांमध्ये पासपोर्ट जारी करते. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. निळ्या रंगाचा पासपोर्ट सर्वसामान्यांसाठी असतो. या पासपोर्टच्या मदतीने कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला परदेशी जाणे शक्य आहे. याशिवाय पांढऱ्या रंगाचाही पासपोर्ट असतो, जो सरकारी कामकाजासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी असतो. याव्यतिरिक्त मरून रंगाचाही पासपोर्ट असतो. हा पासपोर्ट भारतीय डिप्लोमॅट्स आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी असतो.

भारताच्या पासपोर्टची रँकिंग

वर्ष 2021 साठी जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये जपान पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर सिंगापूरचा दुसरा आणि जर्मनी व दक्षिण कोरियाचा संयुक्तरित्या तिसरा क्रमांक लागतो. या सूचीत भारताला झटका बसला असून भारताचा पासपोर्ट 90 व्या स्थानावर आहे. पासपोर्ट रँकिंग भारत 2020 सालच्या तुलनेत सहा क्रमांकांनी खाली येऊन 90 व्या स्थानावर पोहोचला आहे. 58 देश भारतीय नागरिकांना व्हिजा फ्री प्रवेश करण्याला परवानगी देतात. 2020 मध्ये भारत 84 व्या स्थानावर होता. त्यावेळीही जगभरातील 58 देश भारतीय नागरिकांना वीजाशिवाय प्रवेश देत होते.

पासपोर्ट कसा बनवता येतो?

आपण तीन पद्धतीने पासपोर्ट बनवू शकतो. यात ई-फॉर्म सबमिशन, ऑनलाईन फॉर्म सबमिशन आणि वैयक्तिकरित्या पासपोर्ट बनवण्याच्या पद्धतीचा समावेश आहे. घरबसल्या कुठल्याही दगदगीशिवाय पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पासपोर्ट बनविणे शक्य आहे. याचे बरेचसे काम घरीच करावे लागेल, फक्त एक दिवस पासपोर्ट ऑफिसला जावे लागेल. ऑनलाईन माध्यमातून पासपोर्ट बनवण्यासाठी सुरुवातीला एक फॉर्म भरावा लागेल आणि एक दिवस पासपोर्ट सेवा केंद्राची अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. तेथे जाऊन तुम्हाला फोटो क्लिक करावा लागेल आणि कागदपत्रे दाखवावी लागतील. त्यानंतर एका व्हेरिफिकेशन प्रक्रियेनंतर तुमचा पासपोर्ट बनेल. (What is passport called in Hindi, how is it made, know the answer)

इतर बातम्या

मागासवर्गीय उद्योजकांसाठी टास्क फोर्स स्थापन करणार, त्यांचे प्रश्न सोडवणार; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची ग्वाही

Raigad Landslide : रायगडमधील दरड कोसळून मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.