मुलींच्या लग्नाचं वय किती असावं? जगभरातील देशात असलेले एकापेक्षा एक कायदे

मुलींच्या लग्नाचे वय वाढवणे किती योग्य आहे, जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाच्या वयाबदद्ल आपल्याला वेगवेगळे कायदे बघायला मिळतात. कायद्याने मान्यता नसली तरी सुध्दा बालविवाहांच्या अनेक केसेस आजही आपल्या समोर येतात. अनेक ठिकाणी तर बालविवाहाला कायदेशीर मान्यता देखील आहे.

मुलींच्या लग्नाचं वय किती असावं? जगभरातील देशात असलेले एकापेक्षा एक कायदे
Marriage
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 3:40 PM

सध्या देशात मुलाच्या लग्नाचे वय २१ वर्ष तर मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्ष आहे. पण हे वय आता एकसमान करण्याबाबत तयारी सुरु असल्याचे दिसुन येते. यातही गावखेड्यात आणि शहरांमध्ये अगदीच भिन्न मतप्रणाली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आजच्या काळात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात, तर मग लग्नाच्या वयाबाबत सुध्दा एकसमानता असावी अशा स्वरुपाचा एक मतप्रवाह सुध्दा आपल्याला पाहायला मिळतो. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी १८ वर्षांची अट असताना लग्नासाठीच २१ वर्ष का असे सवाल देखील उपस्थित होताना दिसतात.

हे झाले आपल्या देशातील लग्नासंबंधीच्या कायद्यांचे..आता जरा जगभरातील इतर देशांबद्दलही जाणून घेवूयात..

या ६ देशांमध्ये लग्नाच्या वयाबद्दल कोणताही कायदा नाही- १९८ देशांना घेवून प्यू रिसर्चने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे नमुद करण्यात आले आहे कि १९२ देशांमध्ये लग्नाच्या वयासंबंधी कायदे आहेत. तर १९८ पैकी इक्वेटोरियल गीनिया, गाम्बिया, सऊदी अरब, सोमालिया, साउथ सूडान और यमन हे ६ देश असे आहेत कि ज्यामध्ये लग्नाच्या वयाबद्दल कोणताही कायदा नाही. यातही विचार करण्याची गोष्ट म्हणजे काही देशांत कायद्यात सुट दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते, आणि १४ वर्ष वयात सुध्दा लग्न करण्याची कायदेशीर परवानगी असल्याचे दिसुन येते. या पध्दतीची सुट एकट्या दुकट्या देशात नाही तर तब्बल ११७ देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उपलब्ध आहे.

हि दुनिया रंगीबेरंगी, कायदे सुध्दा विविधतेने भरलेले- सगळ्यात मजेशीर गोष्ट हि आहे कि जगात जवळपास ३८ असे देश आहेत जिथे मुले आणि मुलींच्या लग्नाचे वय वेगवेगळे आहे. जसे कि बांगलादेशात मुलींच्या लग्नाचे वय १८ तर मुलाचे २१ वर्ष आहे. सुडान या देशात मुलीचे लग्न १० आणि मुलाचे १५ व्या वर्षी लग्नाला मंजूरी देण्यात आली आहे. जर ते शारिरीकदृष्ट्या परिपक्व असतील तर, फिलिपींसमध्ये १५ वर्ष असताना लग्नाला मंजूरी आहे. टांजानियात मुस्लिम आणि हिंदू मुला मुलींना १२ वय वर्ष असताना लग्नाची मंजूरी आहे पण ते वय वर्ष १५ होईपर्यंत सोबत राहू शकत नाहीत.

आपल्या शेजारच्या देशात काय आहेत कायदे – आपल्या शेजारच्याच देशात लनासंबंधी अनेक कायदे आपल्याला पाहायला मिळतात, यात मुलीचे वय १६ वर्ष तर मुलाचे वय १८ वर्ष निर्धारीत करण्यात आले आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना १ महिन्याचा तुरुंगवास किंवा १ हजारांपर्यंतचा दंड अशी तरतूद आहे.

पाकिस्तानात बालविवाहावर बंदी असली तरी त्याच्या अनेक केसेस पाहायला मिळतात. २०१३ साली पाकिस्तानच्या प्लानिंग असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार एकूण लग्नांपैकी ३० टक्के लग्न हे बालविवाह असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागात गरीबिशी झगडणारे पालक आपल्या मुलींना वयाने मोठे असलेल्या पुरुषांकडे विकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर दुसरीकडे अफाणिस्तानमध्येही आपल्याला अशीच परिस्थिती पाहायला मिळते.

सेंट्रल अमेरिकी देश असलेल्या अल सल्वाडोरमध्ये लग्नाचे वय १८ वर्ष आहे, मात्र मुलगा व मुलगी दोघेही शारिरीक दृष्ट्या विकसित असतील, याशिवाय मुलगी गरोदर असेल किंवा त्यांना अपत्य असेल तर अशा स्थितीत कायद्यानुसार १४ वर्ष सुध्दा लग्नासाठी ग्राह्य धरण्यात येण्या संबंधी तरतूद करण्यात आली आहे. या देशतसुद्धा आपल्याला १५ वर्षांखालील विवाहास मान्यता असल्याचे पाहायला मिळते, पण यासाठी सुध्दा न्यायालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. इथे मुलींच्या लग्नाची मर्यादा १३ वर्ष वय असतानाची आहे.

ऑस्ट्रेलियात सुध्दा मुलामुलींच्या लग्नाचे वय १८ वर्ष असले तरी न्यायालयाच्या परवानगीने १६ व्या वर्षी सुध्दा लग्न करता येवू शकते. तर इराक, जमैका आणि उरुग्वे या देशांत पालकांच्या परवानगीने मुलांच्या लग्नाला परवानगी देण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या: 

New Home Isolation Guidelines : Omicronच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनसाठी नवी नियमावली, काय म्हटलं आरोग्य मंत्रालयानं? मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात… Sanjay Raut| गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा ही राहुल-प्रियांका यांची इच्छा, पण…; संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.