Earth | कधी विचार केलाय…. पृथ्वी एक सेकंदासाठी थांबली तर काय होईल?
आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. पण एकदा विचार करुन पहा, जर पृथ्वीने एका सेकंदासाठी फिरणे थांबवले तर काय होईल आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल, चला तर मग याची उत्तरे जाणून या...
मुंबई : पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. यामुळेच आपणास पृथ्वीवर दिवस (Days) आणि रात्र (Night) बदललेले दिसते. पृथ्वी (Earth) एका वर्षात सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळे ऋतू बदलतात. समजा पृथ्वी काही सेकंदासाठी थांबली (Earth Stop Rotation)तर काय होईल, जर पृथ्वीने एका सेकंदासाठी फिरणे थांबले तर पृथ्वीवर काही परिणाम होईल की ती नेहमीप्रमाणे धावत राहील. आज आपण काही संशोधनाच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पृथ्वीने आपले काम थांबवले म्हणजे एक सेकंद फिरणे बंद केले तर काय होईल. जर आपण पृथ्वीच्या फिरण्याबद्दल बोललो तर ही प्रक्रिया सतत चालू राहते आणि पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. पृथ्वी २४ तासांत एक परिक्रमा पूर्ण करते आणि पृथ्वीच्या फिरण्याचा वेग ताशी १००० मैल मानला जातो. दरम्यान, हा वेग मानवाला कळेलच असे नाही, कारण यासोबतच आपणही पुढे जात असतो. याला थांबवण्याबाबत अनेक संशोधने झाली आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
जीवसृष्टीवर परिणाम
एबीसीच्या अहवालानुसार, जर पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या ग्रहाचा बहुतांश भाग नष्ट होईल. अर्ध्या ग्रहाला सतत सूर्याच्या उष्णतेचा सामना करावा लागेल आणि अर्ध्या ग्रहाला अवकाशातील थंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे अर्ध्या भागावर एवढी उष्णता आणि एवढी थंडी पडेल, अनेक प्राण्यांना त्याचा फटका बसेल आणि त्याचे परिणाम फार वाईट होतील. त्यासोबत बाष्पीभवन इत्यादी प्रक्रियेवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून त्यावेळी काय होईल याची कल्पनाही करणे दुर्मिळ आहे.
हाहा:कार माजेल
शास्त्रज्ञ नील डीग्रास टायसन यांच्या मुलाखतीच्या आधारे डीएनएच्या अहवालात असे म्हटले आहे की, जर पृथ्वी अचानक थांबली तर अशा भीषण घटनेत सर्वांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. टायसन म्हणाला, ‘ते विनाशकारी असेल. आपण सर्व पृथ्वीसह पूर्वेकडे 800 mph वेगाने जात आहोत. त्याच वेळी, जर पृथ्वी थांबली, तर तुम्ही 800 मैलांच्या वेगाने पुढे पडाल आणि तुम्हाला पृथ्वीवर एक भयानक दृश्य पहायला मिळेल. असे मानले जाते की या स्थितीत पृथ्वीवरील प्रत्येकजण मरेल. लोक खिडक्यांमधून बाहेर फेकले जाउ शकतात.
इतर बातम्या :
हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण
सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड