मुघलांचे वंशज सध्या भारतात कुठे राहतात आणि काय करतात? जाणून घ्या
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमामुळे सध्या सगळीकडे मुघलांची चर्चा सुरु आहे. मुघलांचे वंशज भारतात कुठे राहतात आणि काय करतात? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसला होता. या चित्रपटानंतर अनेकांना औरंगजेबाचे वंशज भारतात आहेत का? ते कुठे राहतात? काय करतात असे अनेक प्रश्न पडले आहेत. चला जाणून घेऊया औरंगजेबाच्या वंशजांविषयी…
जेव्हा भारतातील मुघलांचे साम्राज संपले तेव्हा त्यांच्या वंशजांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी सर्वसामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांच्या भीतीमुळे त्यांना आपल्या जीवची काळजी वाटू लागली होती. आज, भारतातील विविध शहरांमध्ये अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे ते जीवन व्यतीत करत आहेत.
भारतात सध्या मुघलांचे दोन वंशज राहत आहेत. भारतातील सर्वात शेवटचा सम्राट बहादूर शाह जफर यांच्या पणती सुलताना बेगम या आजही भारतात आहेत. त्या ६० वर्षांच्या आहेत. सुलताना या शाही घराण्यातील असूनही आज अगदी गरिबीत जीवन जगत आहेत. त्या कोलकाता जवळील एका झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. त्यांना उदर्निवाह करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना मूलभूत पेन्शवर उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी हा शेवटचा मुघल सम्राट. ते बहादूर शाह जफरच्या घराण्यातील सहाव्या पिढीतील स्वयंघोषित वंशज आहे. ते मुघलांचे कायदेशीर वंशज मानले जातात. तसेच अमीर तैमूरचे २३वे वंशज आणि झगहीरुद्दीन मोहम्मद बाबरचे १८ वे वशंज म्हणून राजकुमार याकूब हबीबुद्दीन तुसी ओळखले जातात. ते एक मोठे व्यावसायिक आहेत. ते हैदराबादमधील कांचनबाग डिफेन्स परिसरात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. त्यांना पाच मुले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर भारतातील मुघलांचे वंशज हे संपत आले आहेत.