कुठल्या जनावराच्या दुधाचं दही बनत नाही, तुम्हाला माहितीये उत्तर?
Gk Questions : जगात असे अनेक प्राणी आहेत जे दूध देतात. मानव देखील या दुधाचा वापर करतो. दुधापासूनच दही बनते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या प्राण्याच्या दुधापासून दही बनत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

GK in Marathi : सामान्य ज्ञान असणे आज काळाची गरज बनली आहे. स्पर्धा इतकी वाढली आहे की जगातील अनेक गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे झाले आहे. वेगवेगळ्या विषयाचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान हे आपल्याला पुस्तकातून तसेच वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्मातून मिळतं. जिज्ञाचा असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीतून ज्ञान मिळवू शकतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामुळे व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या जोरावर पुढे गेली आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, साहित्य याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नोकरीसाठी आता सामान्य ज्ञानाच्या जोरावर परीक्षा घेतल्या जात आहेत. चला तर मग आज आपल्या ज्ञानात आणखी भर पाडुयात.
जगातील सर्वोत्तम दूध कोणत्या प्राण्याचे आहे?
उत्तर – तज्ज्ञांचे मते गायीचे दूध हे नैसर्गिकरित्या मिळणारे सर्वोत्तम दूध आहे.
कोणता प्राणी सर्वाधिक दूध देतो?
उत्तर – साहिवाल गायीची दररोज 10-20 लिटरपेक्षा जास्त दूध देण्याची क्षमता आहे.
कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?
उत्तर – प्लॅटिपस आणि एकिडना. दोघेही सस्तन प्राणी आहेत परंतु मुले निर्माण करण्यासाठी ते अंडी घालतात.
कोणत्या प्राण्याच्या दुधाचा रंग गुलाबी असतो?
उत्तर – जगातील फक्त पाणघोडीचे दूध गुलाबी रंगाचे असते.
कोणत्या प्राण्याच्या दुधाचे दही होत नाही?
उत्तर – उंटाचे दूधाचे कधीही दही होत नाही.
कोणते दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो?
उत्तर- गाईचे दूध केवळ शरीरालाच बळ देत नाही तर मेंदूलाही तीक्ष्ण करते