जगातला सर्वात महागडा पदार्थ कोणता? 1 ग्राम खरेदीसाठी लहान-मोठे अनेक देशही विकावे लागतील….

What Is The Most Expensive Material In The World हा प्रश्न गूगलला विचारला तर उत्तर आणि पदार्थाची किंमत पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

जगातला सर्वात महागडा पदार्थ कोणता? 1 ग्राम खरेदीसाठी लहान-मोठे अनेक देशही विकावे लागतील....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 9:27 AM

नवी दिल्लीः जगात सर्वात महागडा पदार्थ (Most Expensive Material In The World)  कोणता, असं विचारलं असता आपल्यासमोर सोनं (Gold), चांदी, हिरे, प्लॅटिनम यापैकी काही चित्र डोळ्यासमोर येतात. पण यापेक्षाही एक महाग पदार्थ जगात अस्तित्वात आहे. आपल्या कल्पनेच्याही पलिकडे याची किंमत आहे. एखादी व्यक्ती हा पदार्थ खरेदी करू शकेल की नाही, हेही सांगता येत नाही. कारण हा 1 ग्राम पदार्थ खरेदी करण्यासाठी जगातले अनेक छोटे-मोठे देशही विकावे लागतील. इंटरनेटवर (Internet) अनेकांनी जगातील सर्वात महागडा पदार्थ कोणता, असा प्रश्न विचारला असता, आपण आतापर्यंत न ऐकलेलं उत्तर आलं.

तर हिरा आणि प्लॅटिनमपेक्षाही महाग असलेल्या या पदार्थाचं नाव आहे अँटीमॅटर म्हणजेच प्रतिपदार्थ. जगातील हा सर्वात मौल्यवान धातून आहे.

हा पदार्थ जगात सर्वात मौल्यवान मानला जातो. नासाच्या मते या धातूच्या 1  ग्राम तुकड्याचे वजन 62.5 ट्रिलियन डॉलर म्हमजेच भारतीय चलनानुसार जवळपास 5000 अब्ज रुपयांपेक्षाही जास्त आहे.

या धातूचं वैशिष्ट्य म्हणजे तो इतर धातूंप्रमाणे खाणीत किंवा वातावरणात इतरत्र सापडत नाही. तर प्रयोगशाळेत तयार होतो.

अंतराळात या पदार्थाचा शोध लागला. ब्लॅकहोलमध्ये ताऱ्यांचे दोन भाग झाल्याच्या घटनेतून या पदार्थाची निर्मिती झाली. या पदार्थात असामान्य ऊर्जा असते.

सर्न येथील प्रयोगशाळेत सर्वात आधी पदार्थ तयार केला गेला. पहिल्यांदा तो बनवला तेव्हा फक्त १० नॅनोग्राम एवढ्या वजनाचा तयार केला गेला. हा पदार्थ तयार करण्यासाठीची प्रक्रिया खूप खर्चिक आहे.

शास्त्रज्ञ सध्या या धातूवर संशोधन करत आहेत. याचा वापर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात. कँसरसारख्या आजारांमध्ये अँटीमॅटरचा वापर होऊ शकतो.

सामान्य इंधनाच्या तुलनेत अँटीमॅटरमधील ऊर्जा कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे रॉकेट फ्यूएलसाठी याचा वापर होऊ शकतो. पण हा पदार्थ बनवणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळेच तो सर्वसामान्यपणे खरेदी करता यावा, तो कमी खर्चात कसा बनवता येईल, त्याची ऊर्जा कुठे कुठे वापरता येईल, यावर सध्या शास्त्रज्ञांचं संशोधन सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.