कधी विचार केलंय? एवढे वजनदार असूनही ढग पडत का नाही बुवा खाली? कारण इंटरेस्टिंग आहे!
तुम्हाला माहित आहे का ढगांचे खूप वजन असते आणि याची यांची विशेष गोष्ट म्हणजे एवढे वजन असून सुद्धा ते कधीच जमिनीवर पडत नाहीत, चला तर मग जाणून घेऊया यामागचे नेमके कारण आहे तरी काय.
जेव्हा पावसाळा ऋतु येतो तेव्हा सर्वत्र आपल्याला ढग (Clouds) पसरलेले पाहायला मिळतात. या ढगांमध्ये पाणी असते आणि ते पावसाच्या रूपाने जमीनीवर पडत असते. हे ढग दिसायला खूप हलके आणि अगदी कापसाप्रमाणे असतात मात्र त्यांचे वजन (Cloud Weight) खूप अधिक असते, हे वजन इतके अधिक असते की ते (Cloud Rain) किलोमध्ये नाहीतर टनाच्या हिशोबाने असते. मात्र कधी विचार केला आहे का, एवढे वजनदार असून सुद्धा कधी खाली का पडत नाहीत आणि हवेमध्ये ते पुढे पुढे कसे सरकतात. काय आहे याच्या मागे असलेले विज्ञान जे ढगांना खाली पडू देत नाहीत.
तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अखेर ढग किती वजनाचे असतात आणि ढगांमध्ये वजन असून सुद्धा ते खाली का पडत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया ढग तयार होण्यापासून त्याचे वजन आणि ढगातून पाऊस पडेपर्यंतची संपूर्ण कहानी जी खूप मजेदार आहे..
कसे तयार होतात ढग?
डीडब्लूच्या एका व्हिडिओनुसार, हवेत सगळीकडे बाष्प म्हणजेच गॅसच्या स्वरूपात पाणी असते म्हणून उघड्या डोळ्यांनी आपण याला पाहू शकत नाही. मात्र जेव्हा हि बाष्प अधिकाधिक उंचीवर जाते तेव्हा ती थंड होवू लागते. तेव्हा यामध्ये जमा झालेले पाणी थेंबाचे आकार घेऊ लागतात. यापासून ढग तयार होतात.
किती वजनाचे असतात ढग?
जेव्हा आपण जमिनीवरून या ढगांकडे पाहतो तेव्हा आपल्याला सहज हे समजते की ते खूप हलके आहेत आणि अगदी सहज ते हवेसोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. मात्र आपण जेवढे हलके त्यांना समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांचे वजन असते. एका रिपोर्टनुसार एखाद्या ढगाचे वजन हे कितीतरी टन असू शकते. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की एका ढगाचे वजन हे हजारो किलो असू शकते.
कसे समजते याचे वजन?
ढगांचे वजन कोणत्याही वजन मोजण्याच्या मशीनने समजत नाही. तर सॅटेलाइट टेक्नॉलॉजीच्या साह्याने याच्या वजनाचं आपल्याला समजू शकते. सॅटेलाइटचे रडार (satellite Radar) उपकरण त्यासंबंधी ढगांमध्ये काही किरणे पाठवून त्याचा अंदाज लावू शकतात. या किरणे (Rays) ढगांच्या आरपार पाठवले जातात आणि त्या हिशोबाने ढगांचे वजन आपल्याला समजत असते.
का खाली येत नाहीत?
पाण्याचे थेंब लहान असले की गरम हवा त्यांना अगदी सहजवरच्या दिशेने उचलून घेते. जर उदाहरणादाखल हे समजून घ्यायचे झाले तर एखाद्या भांड्यामध्ये गरम पदार्थ टाकल्यानंतर त्यातून जी वाफ तयार होते हे याचे एक उदाहरण आहे. आपण समजून घेऊ शकतो हे थेंब मोठे आणि जड नसतात तोपर्यंत हे वरती टिकून राहतात. मात्र जास्त मोठे थेंब झाल्यानंतर ते खाली येऊ लागतात म्हणजेच खाली तर येतात पण पावसाच्या रूपात.. बऱ्याचदा गारांच्या रुपाने सुध्दा हे खाली येताना दिसतात.
इतर बातम्या –
मानवी शरीराचे दोन अवयव, अखेरच्या श्वासापर्यंत वाढतच राहतात, कारण अत्यंत इंटरेस्टिंग
Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?