हृदयविकाराचा झटका सर्वाधिक हिवाळ्यात का येतो? जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ?

हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, असे मेयो क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात. शरीर थंड होऊ लागते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो.

हृदयविकाराचा झटका सर्वाधिक हिवाळ्यात का येतो? जाणून घ्या काय म्हणाले तज्ज्ञ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 6:13 PM

नवी दिल्ली : हिवाळ्यात हृदयावरील दाब वाढतो. दरवर्षी, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात. या ऋतूमध्ये डॉक्टर आपल्या रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांपर्यंत जास्त असतो.

सर्वाधिक अॅटॅक हिवाळ्यात का येतात?

हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, असे मेयो क्लिनिकचे तज्ज्ञ सांगतात. शरीर थंड होऊ लागते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे घडतात.

तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या मोसमात रक्त घट्ट होऊ लागते. परिणामी, गुठळ्या सहजपणे तयार होऊ लागतात. या गुठळ्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतात. परिणामी, रुग्णांना स्ट्रोकचा सामना करावा लागतो.

कोणती लक्षणे दिसल्यावर सतर्क रहावे?

जर तुम्हाला छातीत जळजळ जाणवत असेल, एक विशेष प्रकारचा दाब आणि वेदना होत असतील, तर सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय पाय सुजणे, जबड्यात दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. जर तुम्ही आधीच हार्टचे रुग्ण असाल तर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करा.

तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा

सकाळी लवकर चालणे टाळा

हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जाणे टाळा. विशेषत: जे आधीच हृदयविकाराशी झुंज देत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यात शिरा आधीच संकुचित होतात. अशा परिस्थितीत, सकाळी 6 किंवा 7 वाजता चालणे त्यांच्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे सूर्योदयानंतरच चालणे किंवा 9 वाजल्यानंतरच निघणे चांगले.

जेवणातून मिठाचे प्रमाण कमी करा

अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीरात अतिरिक्त पाणी साठणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाला आपले काम करण्यासाठी कमी कष्ट करावे लागतील. त्यामुळेच हृदयरोग्यांनी सकाळी लवकर जास्त पाणी पिऊ नये, असे सांगितले जाते. थंड वातावरणात अजिबात नाही.

उन्हात वेळ घालवा आणि व्यायामही करा

हिवाळ्यातील सूर्यप्रकाश अनेक बाबतीत उत्तम मानला जातो. यूएस हेल्थ एजन्सी, सीडीसीच्या म्हणण्यानुसार, सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन-डी मिळण्यासोबतच शरीर मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज देखील बनवते. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते. (Why do heart attacks occur most in winter, Know what the experts said)

इतर बातम्या

सौरभ कृपाल पहिले समलैंगिक जज होणार?; पण, LGBTQIA+ म्हणजे काय रे भाऊ?

Skin care Routine : निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी ‘हे’ स्किनकेअर रूटीन फाॅलो करा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.