No shave November: नोव्हेंबर महिन्यात जगभरातील पुरुष दाढी का करत नाही? काय आहे ही मोहीम?
No Shave November: नोव्हेंबर महिन्यात लोक दाढी करत नाही. केसही कापत नाही. त्यातून वाचलेले पैसे 'मॅथ्यू हिल फाउंडेशन'ला देतात. मग 'मॅथ्यू हिल फाउंडेशन' कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांपर्यंत ते पैसे पोहचवते. आता सोशल मीडियामुळे No Shave November हा कॉन्सेप्ट जगभर पोहचला आहे.
नोव्हेंबर महिना सुरु होताच जगभरात अनेक पुरुष दाढी करत नाही. या महिन्यात दाढी न करण्याचे कारण पुरुषांना विचारले तर उत्तर मिळते No shave November. जगभरातील पुरुष ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ का साजरा करतात? त्यामागील कारण काय? याबाबत माहिती अनेकांना नसते. कधी ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सुरु झाली. कोणी ‘नो सेव्ह नोव्हेंबर’ मोहीम सुरु केली, जाणून घेऊ या…
काय आहे ही मोहीम
‘नो सेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम कर्करोग (कॅन्सर) रुग्णांसाठी आहे. कॅन्सर विरोधात राबण्यात येणारे जगभरात सुरु असलेले हे कॅम्पेन आहे. कर्करोगासंदर्भात जागृकता निर्माण करणे आणि कर्करुग्णांना मदत करणे, यासाठी 2007 मध्ये अमेरिकेत ही मोहीम सुरु झाली. या मोहिमे दरम्यान दाढी वाढवली जाते. त्याचा उद्देश फक्त दाढी वाढवणे नाही तर कॅन्सरसंदर्भात एकजुटता दाखवणे आहे.
रुग्णांना कशी मिळणार मदत
अभियानामुळे कॅन्सर रुग्णांना कशी मदत मिळणार? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे. खरंतर या महिन्यात दाढी करण्यावर जो खर्च आपण करतो तो खर्च कॅन्सर रुग्णांसाठी दान केला जातो. त्यामुळे कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी पैसे मिळतात, तसेच त्या लोकांना तुमच्यासोबत इतर अनेक जण असल्याचा विश्वास मिळतो.
का सुरु झाली ही मोहीम
वर्ष 2007 मध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये राहणारे मॅथ्यू हिल यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आठ मुलांनी कॅन्सरसंदर्भात जागृकता निर्माण करण्यासाठी कॅम्पेन सुरु केले. सन 2009 त्यांनी ‘मॅथ्यू हिल फाउंडेशन’ नावाची संस्था बनवली. त्या माध्यमातून कॅन्सरबाबत जगजागृकता आणि कॅन्सर रुग्णांना मदत करणे सुरु केले.
नोव्हेंबर महिन्यात लोक दाढी करत नाही. केसही कापत नाही. त्यातून वाचलेले पैसे ‘मॅथ्यू हिल फाउंडेशन’ला देतात. मग ‘मॅथ्यू हिल फाउंडेशन’ कॅन्सरसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांपर्यंत ते पैसे पोहचवते. आता सोशल मीडियामुळे No Shave November हा कॉन्सेप्ट जगभर पोहचला आहे. परंतु अनेकांना त्याचे खरे कारण माहीत नाही. नोव्हेंबरमध्ये फक्त गंमत म्हणून केस आणि दाढी कापू नका, असे सांगितले जाते.