पाऊस पडल्यावर मातीतून सुगंध का येतो, त्यामागील नेमके कारण काय?
एका जुन्या रिपोर्टनुसार बॅक्टेरिया सोबतच झाडातून निघणारे तेल सुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधास कारणीभूत ठरते. या रिपोर्टला सहमती दर्शवणारे अनेक रिपोर्ट आतापर्यंत समोर आले आहेत.
Smell of Soil After Rain : पाऊस (Rain) पडतो तेव्हा तुम्ही कच्च्या रस्त्यावर, बागेत किंवा शेतामध्ये तसेच आजुबाजूस माती असणाऱ्या परिसरामध्ये असाल तर एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल की, जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा वातावरणामध्ये मातीमुळे एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. अशावेळी तुमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला असेल की पाऊस पडल्यानंतर या मातीचा सुगंध (Smell of Soil) वातावरणामध्ये का दरवळत असतो? यामागे नेमके कारण काय आहे की ज्यामुळे संपूर्ण वातावरणच आल्हाददायक आणि प्रसन्न होऊन जाते. खरेतर जेव्हा उन्हाळा संपून पावसाळा (Rainy Season) सुरू होण्याची चाहूल लागते, जेव्हा पावसाचे आगमन होण्याची चिन्हे दिसू लागतात तेव्हा पहिल्या सरीवेळी पावसाचे थेंब मातीवर पडतात आणि अश्यावेळी येणारा सुगंध हा कोणत्याही अत्तरापेक्षा वरचढ असतो.
पावसाचे थेंब पडल्यानंतर मातीमधून एका विशिष्ट प्रकारच्या सुगंधाची निर्मिती होते जेव्हा पाण्याचे थेंब जमिनीवर पडतात तेव्हा हवेचे छोटे छोटे बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे फुटले की ते आधी वरच्या दिशेने पुढे सरकतात आणि हवेमध्ये छोट्या छोट्या कणाना बाहेर काढत असते ज्याला एरोसॉल असे म्हणतात. हा सुगंध का येतो? कुठून येतो आणि हा सुगंध नेमका कसा तयार होतो? या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना त्यामागे अनेक कारणे सांगण्यात आलेली आहेत. यामागे वनस्पती शास्त्र सुद्धा आहे आणि जैवविज्ञान शास्त्र सुद्धा असल्याचे मानले जाते. चला तर मग आपण जाणून घेऊया सविस्तरपणे.
रिपोर्ट नेमका काय सांगतो?
science.org च्या रिपोर्ट नुसार, पाऊस पडल्यानंतर मातीतून सुगंध येतो त्या सुगंधास ‘पेट्रिकोर’ असे म्हटले जाते. पेट्रिकोर या शब्दाची निर्मिती ग्रीक भाषेतील शब्द पेट्रा द्वारे झाली आहे याचा अर्थ आहे स्टोन किंवा आईकर. द टाइम्स च्या रिपोर्ट आधारे त्यांनी आपल्या वेबसाइट मध्ये याबाबत लिखाण केले आहे की, पेट्रीकोर नावाचा हा सुगंध मातीत असणाऱ्या सूक्ष्म स्ट्रेप्टोमाइसेट बॅक्टेरियाचे उपउत्पादन आहे, ज्यामुळे जियोस्मिन नावाचे संयुग तयार होते.
IANS च्या एका रिपोर्ट नुसार बॅक्टेरिया सोबत झाडातून निघणारे तेल सुद्धा मातीतून येणाऱ्या सुगंधाचे कारण बनते. केंब्रिज मधील मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे मॅकेनिकल इंजीनियरिंगचे असिस्टंट प्रोफेसर कुलेन बुई यांच्या मते झाडाद्वारे उत्सर्जित केले गेलेल्या काही तरल पदार्थ आणि बॅक्टेरिया द्वारा निघणारे काही विशेष रसायन यांची पावसाच्या थेंबा सोबत रिअॅक्शन होते ज्यामुळे अशा प्रकारचा सुगंध वातावरणामध्ये तयार होतो.
बॅक्टेरिया पसरवतो बीजाणू
एका रिपोर्टनुसार मातीमध्ये उपलब्ध असणारे बॅक्टेरिया एक्टिनोमाइसेट्स (Actinomycetes) किंवा स्ट्रेप्टोमाइसीट याच्या सुगंधाचे कारण सुद्धा बनते.वैज्ञानिकांच्या अनुसार मातीमध्ये सापडणारे बॅक्टेरिया वेळे सोबतच काही बीजाणूना मातीमध्ये पसरवून देतो यासोबतच काही झाडे, वनस्पती उन्हाळ्यात पाणी न मिळण्याच्या कारणामुळे सुकून जातात.
या झाडांच्या द्वारे सुद्धा एक प्रकारचा तरल पदार्थ बाहेर निघतो आणि तो मातीमध्ये मिसळून जातो पाऊस पडल्यानंतर जसे मातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पडते तेव्हा तो तरल पदार्थ क्लोरीन गॅस आणि मातीच्या जिवाणू पाणी सोबत मिसळून एक केमिकल रिएक्शन(chemical reaction) तयार करतात ,या कारणामुळेच मातीतून सुगंध येऊ लागतो.
ओझोनच्या कारणामुळे वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो
पाऊस पडल्यानंतर मातीतून येणार्या सुगंधाचे एक कारण फ्रेश सुगंध सुद्धा सांगितले जाते खरंतर ओझोनच्या कारणामुळे वादळानंतर फ्रेश गंध येऊ लागतो. वैज्ञानिकाच्या अनुसार ओझोनमध्ये क्लोरीन गॅसमध्ये प्रमाणे तिखट आणि तेज गंध असतो पाऊस पडल्यानंतर जेव्हा वातावरणामध्ये उपलब्ध असणारा ओझोन गॅस काही प्रमाणा मध्ये पाण्यासोबत मिसळतो आणि यामुळेच वातावरणामध्ये सुगंध पसरू लागतो.
वेगवेगळ्या झाडांद्वारे निघणारे तेल सुद्धा एक कारण सांगितले जाते. रिपोर्टनुसार पर्यावरणामध्ये हे तेल जमा झालेले असते आणि पाऊस पडताच यासोबत काही केमिकल या तेलाला हवेमध्ये सोडून देतात आणि म्हणूनच पाऊस पडल्यावर वातावरणामध्ये सुगंध निर्माण होण्याचे हे कारण सुद्धा सांगितले जाते. असे सांगितले जाते की पावसाचे पाणी आणि माती यांच्यासोबत केमिकल रिएक्शन होते आणि म्हणूनच एक आगळा वेगळा सुगंध वातावरणामध्ये दरवळू लागतो.
इतर बातम्या
तुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा !!